मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इब्री ७:१७सुमारे इ.स. ६४

    हे असे जाहीर करते: “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहेस.”

  2. इब्री ७:१८सुमारे इ.स. ६४

    पूर्वीचा नियम बाजूला ठेवण्यात आला, कारण तो कमकुवत व निरुपयोगी होता.

  3. इब्री ७:१९सुमारे इ.स. ६४

    (कारण नियमशास्त्राने काहीही परिपूर्ण केले नाही), आणि अधिक चांगल्या आशेची ओळख झाली आहे, ज्याद्वारे आपण परमेश्वराजवळ जातो.

  4. इब्री ७:२०सुमारे इ.स. ६४

    आणि हे शपथेवाचून झाले नाही! दुसरे शपथ न घेता याजक झाले.

  5. इब्री ७:२१सुमारे इ.स. ६४

    परंतु तो शपथ घेऊन याजक झाला, जेव्हा परमेश्वर त्याला म्हणाले, “प्रभूने शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: ‘तू सदासर्वकाळचा याजक आहेस.’ ”

  6. इब्री ७:२२सुमारे इ.स. ६४

    कारण या शपथेमुळे, येशू अधिक चांगल्या कराराची हमी घेणारे झाले आहेत.

  7. इब्री ७:२३सुमारे इ.स. ६४

    आता असे पुष्कळ याजक होऊन गेले, जे मृत झाल्यामुळे त्यांची सेवा सातत्याने करू शकले नाहीत.

  8. इब्री ७:२४सुमारे इ.स. ६४

    पण येशू सदासर्वकाळ जिवंत आहेत; त्यांचे याजकपण युगानुयुगचे आहे.

  9. इब्री ७:२५सुमारे इ.स. ६४

    यास्तव त्यांच्याद्वारे परमेश्वराकडे येणार्‍या सर्वांचे पूर्णपणे तारण करण्यास ते समर्थ आहेत, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास ते सदासर्वदा जिवंत आहेत.

  10. इब्री ७:२६सुमारे इ.स. ६४

    असे महायाजक खरोखर आपल्या गरजा भागविण्यास समर्थ आहेत—ते पवित्र, निर्दोष, शुद्ध, आणि पापी माणसांपासून वेगळे केलेले, स्वर्गाहून अधिक उंच केलेले आहेत.

  11. इब्री ७:२७सुमारे इ.स. ६४

    त्यांना त्या महायाजकांप्रमाणे प्रथम स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी दिवसेंदिवस यज्ञ करण्याची गरज नाही; कारण त्यांनी त्यांच्या पापासाठी एकदाच यज्ञ करून स्वतःला अर्पण केले.

  12. इब्री ७:२८सुमारे इ.स. ६४

    नियमशास्त्र दुर्बलतेने भरलेल्या माणसांना महायाजक नेमते; पण नियमशास्त्रानंतर आलेली शपथ ती जो युगानुयुग परिपूर्ण आहे त्या पुत्राला नेमते.

  13. इब्री ८:१सुमारे इ.स. ६४

    आमच्या म्हणण्याचा मुख्य मुद्दा हाच आहे: आम्हाला असे एक महायाजक आहेत, जे स्वर्गामध्ये वैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे.

  14. इब्री ८:२सुमारे इ.स. ६४

    प्रभूने उभारलेला खरा मंडप जो केवळ मानवाद्वारे बांधलेला नाही, त्या मंदिरात ते सेवा करीत आहेत.

  15. इब्री ८:३सुमारे इ.स. ६४

    आणि ज्याअर्थी प्रत्येक महायाजक दाने व यज्ञार्पण करण्यासाठी नेमलेला असतो, म्हणून यांच्या जवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे आवश्यक आहे.

  16. इब्री ८:४सुमारे इ.स. ६४

    जर ते पृथ्वीवर असते, तर ते याजक झाले नसते, कारण येथे नियमशास्त्रानुसार दाने अर्पण करणारे याजक आधी नेमलेले असतात.

  17. इब्री ८:५सुमारे इ.स. ६४

    जे स्वर्गात आहे, त्याचे प्रतिरूप आणि छाया आहे त्या मंदिरात ते सेवा करतात. यामुळेच मोशे निवासमंडप उभारण्याची तयारी करीत असताना, “पर्वतावर दाखविलेल्या निवासमंडपाच्या नमुन्याप्रमाणेच ते सर्व काळजीपूर्वकपणे ठेवावे असे त्याला सांगितले होते.”

  18. इब्री ८:६सुमारे इ.स. ६४

    परंतु येशूंना मिळालेले सेवाकार्य त्यांच्यापेक्षा जेवढे श्रेष्ठ आहे तेवढेच ते जुन्या करारापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण अधिक चांगल्या अभिवचनांवर आधारित असलेल्या नवीन कराराचे ते मध्यस्थ आहेत.

  19. इब्री ८:७सुमारे इ.स. ६४

    जर पहिला करार निर्दोष असता तर त्याच्या जागी दुसरा करार स्थापण्याची काहीच आवश्यकता भासली नसती.

  20. इब्री ८:८सुमारे इ.स. ६४

    परंतु परमेश्वराला लोकांतील दोष दिसले आणि ते म्हणाले: “प्रभू जाहीर करून म्हणत आहेत, असे दिवस येतील जेव्हा, इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी मी एक नवीन करार करेन.

  21. इब्री ८:९सुमारे इ.स. ६४

    मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हा मी त्यांच्याशी केलेल्या कराराप्रमाणे हा करार नसेल. ते माझ्या कराराशी विश्वासू राहिले नाही, आणि मी त्यांच्यापासून दूर गेलो, असे प्रभू म्हणतात.

  22. इब्री ८:१०सुमारे इ.स. ६४

    परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार स्थापित करेन तो असा प्रभू जाहीर करतात, त्या वेळेनंतर मी माझे नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील.

  23. इब्री ८:११सुमारे इ.स. ६४

    कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही, किंवा ‘प्रभूला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही, कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण मला ओळखतील,

  24. इब्री ८:१२सुमारे इ.स. ६४

    मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.”

  25. इब्री ८:१३सुमारे इ.स. ६४

    त्यांनी या करारास “नवा” असे म्हणून जुना करार कालबाह्य ठरविला आहे; आणि जो कालबाह्य व जुना आहे तो लवकर नाहीसा होईल.