मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इब्री ९:२६सुमारे इ.स. ६४

    तसे करणे आवश्यक असते, तर त्यांना जगाच्या स्थापनेपासून अनेकदा दुःख सहन करावे लागले असते. पण आता ते एकदाच युगाच्या समाप्तीस स्वयज्ञ करून प्रकट झाले आणि त्यांनी पापाची सत्ता नष्ट केली.

  2. इब्री ९:२७सुमारे इ.स. ६४

    जसे माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्यायाला तोंड देणे हे नेमून ठेवले आहे,

  3. इब्री ९:२८सुमारे इ.स. ६४

    तसेच अनेकांचे पाप वाहून नेण्यासाठी बली म्हणून ख्रिस्त एकदाच मरण पावले आणि ते दुसर्‍या वेळेस प्रकट होणार, ते पाप वाहण्यासाठी नाही, तर जे त्यांची धीराने वाट पाहतात, त्यांचे तारण आणण्यासाठी येतील.

  4. इब्री १०:१सुमारे इ.स. ६४

    नियमशास्त्र ज्या येणार्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची छाया आहे—त्याचे खरे स्वरूप नाही. या कारणासाठी ते प्रतिवर्षी नित्य अर्पण केल्या जाणार्‍या त्याच यज्ञांनी उपासनेसाठी येणार्‍यांना परिपूर्ण करण्यास केव्हाही समर्थ ठरत नाही.

  5. इब्री १०:२सुमारे इ.स. ६४

    तसे झाले असते, तर एकच अर्पण पुरेसे नव्हते काय? उपासक कायमचे शुद्ध झाले असते तर त्यांची दोषाची भावना नाहीशी झाली असती.

  6. इब्री १०:३सुमारे इ.स. ६४

    पण त्यांनी त्यांच्या पापांची प्रतिवर्षी त्यांना आठवण करून दिली.

  7. इब्री १०:४सुमारे इ.स. ६४

    कारण बैलांचे व शेळ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.

  8. इब्री १०:५सुमारे इ.स. ६४

    यास्तव, जेव्हा ख्रिस्त जगात आले तेव्हा ते म्हणाले, “यज्ञ किंवा अर्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही, परंतु तुम्ही माझ्यासाठी एक शरीर तयार केले;

  9. इब्री १०:६सुमारे इ.स. ६४

    होमार्पण व पापार्पण यांनी तुम्हाला संतोष झाला नाही.

  10. इब्री १०:७सुमारे इ.स. ६४

    मग मी म्हणालो, ‘मी येथे आहे; शास्त्रलेखात माझ्याविषयी लिहिले आहे, हे माझ्या परमेश्वरा तुमची इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’ ”

  11. इब्री १०:८सुमारे इ.स. ६४

    ते प्रथम म्हणाले, “बली आणि दाने, होमार्पणे आणि पापार्पणाची तुम्हाला इच्छा नाही व त्यात तुम्हाला संतोष नाही;” जरी ते नियमानुसार अर्पण करत होते.

  12. इब्री १०:९सुमारे इ.स. ६४

    नंतर ते म्हणाले, “हा मी येथे आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” दुसरी व्यवस्था स्थापन करून त्यांनी पहिली व्यवस्था रद्द केली.

  13. इब्री १०:१०सुमारे इ.स. ६४

    आणि त्या इच्छेद्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह बलिदानाद्वारे पवित्र केलेले आहोत.

  14. इब्री १०:११सुमारे इ.स. ६४

    प्रत्येक याजक प्रतिदिवशी धार्मिक कामे करत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो.

  15. इब्री १०:१२सुमारे इ.स. ६४

    परंतु या याजकाने पापांसाठी सार्वकालिक असे एकच बली अर्पण करून ते परमेश्वराच्या उजव्या हाताशी बसले आहेत.

  16. इब्री १०:१३सुमारे इ.स. ६४

    आणि त्या वेळेपासून त्यांचे शत्रू त्यांचे पायासन होईपर्यंत वाट पाहत आहेत.

  17. इब्री १०:१४सुमारे इ.स. ६४

    कारण एकाच यज्ञामुळे ज्यांना ते पवित्र करीत आहे, त्या सर्वांना त्यांनी परिपूर्ण केले आहे.

  18. इब्री १०:१५सुमारे इ.स. ६४

    याबाबत पवित्र आत्मा आपल्याला साक्ष देतो, प्रथम त्यांनी म्हटले:

  19. इब्री १०:१६सुमारे इ.स. ६४

    “मी त्यांच्याबरोबर करार करेन तो असा, प्रभू म्हणतात त्या वेळेनंतर, मी माझे नियम त्यांच्या मनात ठेवेन आणि ते मी त्यांच्या हृदयावर लिहेन.”

  20. इब्री १०:१७सुमारे इ.स. ६४

    मग पुढे ते म्हणतात, “त्यांची पापे व नियमबाह्य कृत्ये यापुढे मी स्मरणार नाही.”

  21. इब्री १०:१८सुमारे इ.स. ६४

    आणि जिथे क्षमा झालेली आहे, तिथे पापांसाठी आणखी यज्ञ करण्याची मुळीच गरज नाही.

  22. इब्री १०:१९सुमारे इ.स. ६४

    म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता येशूंच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानी आत्मविश्वासाने जाता येते.

  23. इब्री १०:२०सुमारे इ.स. ६४

    आपल्यासाठी हा नवा व जीवनदायी मार्ग पडद्याद्वारे म्हणजे त्यांच्या शरीराद्वारे उघडला आहे.

  24. इब्री १०:२१सुमारे इ.स. ६४

    आणि आपल्यासाठी परमेश्वराच्या घरावर एक महान याजक आहेत,

  25. इब्री १०:२२सुमारे इ.स. ६४

    म्हणून आपली हृदये शुद्ध करण्यासाठी शिंपडले, दोषी विवेकापासून मुक्त झालेले व शुद्ध पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने परमेश्वराजवळ येऊ.