circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- फिलिप्पैकरांस १:२०सुमारे इ.स. ६४
याची मला खात्री व अपेक्षा आहे की मी यामुळे लज्जित होऊ नये, तर मला पुरेसे धैर्य प्राप्त व्हावे यासाठी की जगण्याने किंवा मरणाने, आता आणि सर्वदा, ख्रिस्त माझ्या शरीरात उंच केला जावा.
- फिलिप्पैकरांस १:२१सुमारे इ.स. ६४
कारण मला, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे!
- फिलिप्पैकरांस १:२२सुमारे इ.स. ६४
जर मला हे दैहिक जीवन जगायचे आहे, तर ते माझ्यासाठी श्रमाचे फळ ठरेल. मी काय निवडू? हे मला कळत नाही!
- फिलिप्पैकरांस १:२३सुमारे इ.स. ६४
मी दोन्ही गोष्टीसंबंधाने पेचात आहे: कारण येथून जाऊन ख्रिस्तासोबत असावे, अशी माझी तीव्र इच्छा आहे. तिथे असणे अधिक उत्तम आहे!
- फिलिप्पैकरांस १:२४सुमारे इ.स. ६४
परंतु मी शरीरात असणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे.
- फिलिप्पैकरांस १:२५सुमारे इ.स. ६४
मला माहीत आहे की, तुमची प्रगती आणि विश्वासातील तुमच्या आनंदासाठी मी येथे तुम्हाजवळ राहीन.
- फिलिप्पैकरांस १:२६सुमारे इ.स. ६४
मी तुम्हाला भेटण्यासाठी पुन्हा परत आलो म्हणजे ख्रिस्त येशूंमधील तुमचा माझ्यासंबंधीचा अभिमान भरून वाहू लागेल.
- फिलिप्पैकरांस १:२७सुमारे इ.स. ६४
पण काहीही झाले, तरी ख्रिस्ताच्या शुभवार्तेला साजेल असे तुमचे आचरण ठेवा, म्हणजे मी तुम्हाला पुन्हा येऊन भेटलो अथवा माझ्या अनुपस्थितीत मला तुमच्याबद्दल असे ऐकावयास यावे की तुम्ही एका आत्म्यात स्थिर आहात व विश्वासाच्या शुभवार्तेमध्ये एकत्र झटत आहात,
- फिलिप्पैकरांस १:२८सुमारे इ.स. ६४
पण तुमचे जे विरोधी आहेत त्यांना न घाबरता तुम्ही उभे आहात. कारण त्यांचा नाश हे त्यांना चिन्ह आहे, परंतु तुमचा उद्धार होईल व तोही परमेश्वराद्वारे होईल.
- फिलिप्पैकरांस १:२९सुमारे इ.स. ६४
केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, एवढेच नव्हे, तर त्यांच्यासाठी दुःखही सहन करावे हे दान तुम्हाला देण्यात आले आहे.
- फिलिप्पैकरांस १:३०सुमारे इ.स. ६४
पूर्वी मी कसे दुःख सहन केले, हे तुम्ही पाहिलेच आहे व जे मी आता सहन करीत आहे तेही तुम्ही आता ऐकत आहात, व तेच दुःख तुम्हीही आता सहन करीत आहात.
- फिलिप्पैकरांस २:१सुमारे इ.स. ६४
यास्तव ख्रिस्ताच्या ठायी ऐक्यता असल्यामुळे काही उत्तेजन, त्यांच्या प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, जर काही करुणा व कळवळा आहे,
- फिलिप्पैकरांस २:२सुमारे इ.स. ६४
तर तुम्ही एकमेकांशी सहमत होणारे, सारखीच प्रीती करणारे आणि एका आत्म्याचे व एकमनाचे होऊन माझा आनंद परिपूर्ण करा.
- फिलिप्पैकरांस २:३सुमारे इ.स. ६४
स्वार्थी महत्त्वाकांक्षा, किंवा बढाई मारण्याच्या हेतूंनी तुम्ही काहीही करू नये, तर प्रत्येकाने नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ मानावे.
- फिलिप्पैकरांस २:४सुमारे इ.स. ६४
तुम्ही केवळ स्वतःचेच हित नव्हे, तर इतरांचेही हित पाहावे.
- फिलिप्पैकरांस २:५सुमारे इ.स. ६४
ख्रिस्त येशूंमध्ये जी मनोवृत्ती होती, तीच वृत्ती तुम्ही एकमेकांच्या संबंधात बाळगा:
- फिलिप्पैकरांस २:६सुमारे इ.स. ६४
ते खुद्द परमेश्वराच्या स्वरुपाचे असूनही त्यांनी स्वतःस परमेश्वरासमान केले नाही व परमेश्वरासम असण्याचा लाभ त्यांनी घेतला नाही;
- फिलिप्पैकरांस २:७सुमारे इ.स. ६४
उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले आणि दासाचे स्वरूप घेऊन, मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले.
- फिलिप्पैकरांस २:८सुमारे इ.स. ६४
मानवी रूप धारण करून त्यांनी स्वतःस लीन केले, येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास, आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले.
- फिलिप्पैकरांस २:९सुमारे इ.स. ६४
म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले;
- फिलिप्पैकरांस २:१०सुमारे इ.स. ६४
यासाठी की येशूंच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली,
- फिलिप्पैकरांस २:११सुमारे इ.स. ६४
परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीभ कबूल करेल की येशू ख्रिस्त हेच प्रभू आहेत.
- फिलिप्पैकरांस २:१२सुमारे इ.स. ६४
यास्तव, प्रिय मित्रांनो, मी तिथे तुम्हाबरोबर असताना आणि याहीपेक्षा माझ्या अनुपस्थितीत तुम्ही नेहमीच आज्ञापालन केले आहे, म्हणून तुमच्या तारणाचे कार्य भयात व कापत साधून घ्या.
- फिलिप्पैकरांस २:१३सुमारे इ.स. ६४
कारण परमेश्वर आहेत, की ज्यांनी आपल्या उत्तम योजनेसाठी तुमच्यामध्ये इच्छा करणे व कृती करणे साधले आहे.
- फिलिप्पैकरांस २:१४सुमारे इ.स. ६४
जे काही कराल ते सर्व कुरकुर व वादविवाद न करता करा,