मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. फिलिप्पैकरांस ३:१०सुमारे इ.स. ६४

    मी ख्रिस्ताला आणि त्यांच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, व त्यांच्या दुःखसहनाची सहभागिता जाणून त्यांच्या मृत्यूशी अनुरूप व्हावे.

  2. फिलिप्पैकरांस ३:११सुमारे इ.स. ६४

    आणि कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान प्राप्त करून घ्यावे.

  3. फिलिप्पैकरांस ३:१२सुमारे इ.स. ६४

    मी सर्वकाही मिळविले किंवा माझ्या ध्येयाप्रत पोहोचलो आहे असे नाही, परंतु ते आपलेसे करण्यासाठी व घट्ट धरून ठेवण्यासाठी मी नेटाने पुढे जात आहे. कारण मला ख्रिस्त येशूंनी पकडून ठेवले आहे.

  4. फिलिप्पैकरांस ३:१३सुमारे इ.स. ६४

    बंधू व भगिनींनो, मी अजूनही ते प्राप्त केलेले नाही, परंतु मी एक गोष्ट करतो: मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे नेटाने लक्ष लावतो.

  5. फिलिप्पैकरांस ३:१४सुमारे इ.स. ६४

    ख्रिस्त येशूंमध्ये परमेश्वराच्या स्वर्गीय पाचारणासंबंधीचे पारितोषिक जिंकण्यासाठी मी त्या लक्ष्याकडे धावत आहे.

  6. फिलिप्पैकरांस ३:१५सुमारे इ.स. ६४

    आपण जे सर्व परिपक्व आहोत त्यांनीही हाच भाव ठेवावा. जर एखाद्या गोष्टीसंबंधाने तुमचे विचार वेगळे असतील तर परमेश्वर ती गोष्ट तुम्हाला स्पष्ट करतील.

  7. फिलिप्पैकरांस ३:१६सुमारे इ.स. ६४

    जसे येथवर आपण पोहोचलो आहोत त्याप्रमाणे चालत राहावे.

  8. फिलिप्पैकरांस ३:१७सुमारे इ.स. ६४

    प्रिय बंधू व भगिनींनो, माझे अनुकरण करणारे व्हा, जसा आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिला त्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.

  9. फिलिप्पैकरांस ३:१८सुमारे इ.स. ६४

    कारण मी हे पूर्वी तुम्हाला सांगितले आणि आताही रडत सांगतो की अनेक लोक असे जगतात जसे ते ख्रिस्ताच्या क्रूसखांबाचे शत्रू आहेत.

  10. फिलिप्पैकरांस ३:१९सुमारे इ.स. ६४

    त्यांचा शेवट तर विनाश आहे, कारण पोट हेच त्यांचे दैवत आहे; निर्लज्जपणा त्यांचे गौरव आहे आणि त्यांचे मन भौतिक गोष्टींकडे लागलेले आहे.

  11. फिलिप्पैकरांस ३:२०सुमारे इ.स. ६४

    परंतु आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे आणि तिथून आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या परतण्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत.

  12. फिलिप्पैकरांस ३:२१सुमारे इ.स. ६४

    जे त्या सामर्थ्याद्वारे सर्वकाही त्यांच्या नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे, ते आपली अशक्त शरीरे घेऊन व त्यांचे रूपांतर करून ती स्वतःच्या शरीरासारखी गौरवशाली शरीरे करतील.

  13. फिलिप्पैकरांस ४:१सुमारे इ.स. ६४

    यास्तव, बंधू व भगिनींनो, जो मी तुम्हावर प्रीती करतो व तुम्हाला भेटावयास उत्कंठित आहे व जे तुम्ही माझा आनंद, मुकुट आहात, प्रभूमध्ये अशाप्रकारे स्थिर राहा.

  14. फिलिप्पैकरांस ४:२सुमारे इ.स. ६४

    मी युवदीयेला विनंती करतो व सुंतुखेस विनंती करतो की प्रभूमध्ये एकमनाचे व्हा.

  15. फिलिप्पैकरांस ४:३सुमारे इ.स. ६४

    होय, माझ्या जिवलग मित्रा, मी तुलाही विनवितो की या भगिनींना साहाय्य कर; कारण शुभवार्तेसाठी माझ्या बरोबरीने, तसेच क्लेमेंत आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, अशा माझ्या इतर सहकार्‍यांबरोबर देखील त्यांनी श्रम केले आहेत.

  16. फिलिप्पैकरांस ४:४सुमारे इ.स. ६४

    प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. मी पुन्हा सांगतो आनंद करा.

  17. फिलिप्पैकरांस ४:५सुमारे इ.स. ६४

    तुमची सौम्यता प्रत्येकाला दिसून येऊ द्या. प्रभू समीप आहेत.

  18. फिलिप्पैकरांस ४:६सुमारे इ.स. ६४

    कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा.

  19. फिलिप्पैकरांस ४:७सुमारे इ.स. ६४

    आणि परमेश्वराची शांती, जी आपल्या सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे विचार आणि तुमची मने ख्रिस्त येशूंमध्ये राखील.

  20. फिलिप्पैकरांस ४:८सुमारे इ.स. ६४

    शेवटी, बंधू आणि भगिनींनो, जे काही सत्य, जे काही आदरणीय व जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही सुंदर, जे काही प्रशंसनीय, श्रवणीय आणि स्तुतिपात्र आहे त्याचा विचार करा.

  21. फिलिप्पैकरांस ४:९सुमारे इ.स. ६४

    माझ्यापासून तुम्ही जे सर्वकाही शिकला किंवा स्वीकारले किंवा ऐकले, किंवा मजमध्ये पाहिले त्यानुसार आचरण करा आणि शांती देणारे परमेश्वर तुम्हाबरोबर राहतील.

  22. फिलिप्पैकरांस ४:१०सुमारे इ.स. ६४

    मी प्रभूमध्ये स्तुती करतो की शेवटी तुम्हाला माझ्याविषयीची पुन्हा काळजी उत्पन्न झाली. तुम्ही खरोखर काळजी करीत होता हे मला माहीत आहे, पण ते तुम्हाला प्रकट करण्याची संधी मिळाली नाही.

  23. फिलिप्पैकरांस ४:११सुमारे इ.स. ६४

    मला गरज आहे म्हणून मी हे बोलतो असे नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहण्यास मी शिकलो आहे.

  24. फिलिप्पैकरांस ४:१२सुमारे इ.स. ६४

    मला गरजेमध्ये राहणे, विपुलतेमध्ये राहणे हे माहीत आहे. कोणत्याही परिस्थितीत व प्रत्येक परिस्थितीत भरल्यापोटी अथवा भुकेला, संपन्नतेत किंवा विपन्नतेत, समाधानी कसे राहावे हे मला माहीत आहे.

  25. फिलिप्पैकरांस ४:१३सुमारे इ.स. ६४

    जे मला शक्ती देतात त्यांच्याद्वारे सर्वकाही करण्यास मी समर्थ आहे.