मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. फिलिप्पैकरांस २:१५सुमारे इ.स. ६४

    म्हणजे, “तुम्ही या दुष्ट आणि कुटिल आणि हेकेखोर पिढीत दोषरहित व शुद्ध राहून परमेश्वराची लेकरे” म्हणून त्यांच्यामध्ये आकाशातील तार्‍यांप्रमाणे चमकाल.

  2. फिलिप्पैकरांस २:१६सुमारे इ.स. ६४

    तुम्ही जीवनाचे वचन मजबूत धरून ठेवले आहे म्हणून ख्रिस्ताच्या दिवशी माझी धाव व श्रम व्यर्थ झाले नाही याचा मला अभिमान बाळगता येईल.

  3. फिलिप्पैकरांस २:१७सुमारे इ.स. ६४

    तुमच्या विश्वासाची सेवा आणि यज्ञ यावर मी स्वतः पेयार्पण म्हणून अर्पण केला जात आहे तरी मीही तुमच्याबरोबर आनंद करेन.

  4. फिलिप्पैकरांस २:१८सुमारे इ.स. ६४

    त्याचप्रमाणे तुम्हीही उल्हासित व्हावे आणि माझ्याबरोबर आनंद करावा.

  5. फिलिप्पैकरांस २:१९सुमारे इ.स. ६४

    मला प्रभू येशूंमध्ये आशा आहे की, मी लवकरच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन; म्हणजे तुमची बातमी ऐकून मीही उल्हासित होईन.

  6. फिलिप्पैकरांस २:२०सुमारे इ.स. ६४

    तुमचा खरा हितचिंतक तीमथ्यासारखा दुसरा कोणी नाही.

  7. फिलिप्पैकरांस २:२१सुमारे इ.स. ६४

    इतर प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी पाहतात, येशू ख्रिस्ताच्या नाही.

  8. फिलिप्पैकरांस २:२२सुमारे इ.स. ६४

    शुभवार्तेच्या कार्यात तीमथ्याने मला जसा पुत्र आपल्या पित्यास करतो, तसे साहाय्य करून स्वतःस सिद्ध केले हे तुम्हाला माहीत आहे.

  9. फिलिप्पैकरांस २:२३सुमारे इ.स. ६४

    माझ्या सर्वगोष्टी व्यवस्थित होताच, त्याला तुमच्याकडे लवकर पाठविता येईल अशी मला आशा आहे;

  10. फिलिप्पैकरांस २:२४सुमारे इ.स. ६४

    आणि मीही स्वतः लवकर येईन, असा प्रभूवर माझा भरवसा आहे.

  11. फिलिप्पैकरांस २:२५सुमारे इ.स. ६४

    मध्यंतरी मला वाटले की मी एपफ्रदीत हा माझा भाऊ, सहकारी, सहसैनिक आणि तुमचा संदेशवाहक याला तुमच्याकडे परत पाठवावे. माझ्या गरजेच्यावेळी मला साहाय्य करण्यासाठी तुम्ही त्याला पाठविले होते.

  12. फिलिप्पैकरांस २:२६सुमारे इ.स. ६४

    कारण त्याच्या आजाराची वार्ता तुम्ही ऐकली म्हणून तुम्हा सर्वांना भेटावयास तो उत्सुक व चिंताक्रांत झालेला आहे;

  13. फिलिप्पैकरांस २:२७सुमारे इ.स. ६४

    आणि खरोखरच तो आजारी पडला, अंदाजे मरणोन्मुख झाला होता, पण परमेश्वराने त्याच्यावर आणि माझ्यावरही दया करून मला दुःखावर दुःख होण्यापासून वाचविले.

  14. फिलिप्पैकरांस २:२८सुमारे इ.स. ६४

    म्हणूनच त्याला तुमच्याकडे परत पाठविण्यास मी अधिकच उत्सुक आहे. कारण त्याला पाहून तुम्हाला आनंद वाटेल आणि माझी चिंताही कमी होईल.

  15. फिलिप्पैकरांस २:२९सुमारे इ.स. ६४

    प्रभूमध्ये मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत करून त्याच्यासारख्यांचा सत्कार करा.

  16. फिलिप्पैकरांस २:३०सुमारे इ.स. ६४

    कारण ख्रिस्ताच्या सेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व त्याला अंदाजे मरण आलेच होते, माझ्यासाठी तुम्हाला ज्यागोष्टी करता आल्या नाहीत त्या त्याने केल्या.

  17. फिलिप्पैकरांस ३:१सुमारे इ.स. ६४

    बंधू व भगिनींनो, प्रभूमध्ये आनंद करा. त्याच गोष्टी तुम्हाला पुन्हा लिहिण्याचा मला त्रास होत नाही आणि हे तुमच्या संरक्षणासाठी आहे.

  18. फिलिप्पैकरांस ३:२सुमारे इ.स. ६४

    त्या कुत्र्यांपासून, दुष्ट कृत्ये करणारे, देहाची विच्छिन्नता करणार्‍यांपासून सावध राहावे.

  19. फिलिप्पैकरांस ३:३सुमारे इ.स. ६४

    कारण वास्तविक सुंता झालेले आपणच आहोत आणि जे आपणही आत्म्याद्वारे परमेश्वराची सेवा करतो व ख्रिस्त येशूंमध्ये अभिमान बाळगतो आणि देहावर भरवसा ठेवत नाही.

  20. फिलिप्पैकरांस ३:४सुमारे इ.स. ६४

    तरी देखील मला देहावर भरवसा ठेवण्यास कारणे आहेत. जर काहींना वाटते की त्यांना देहावर भरवसा ठेवण्यास कारणे आहेत, तर मला अधिक आहेत.

  21. फिलिप्पैकरांस ३:५सुमारे इ.स. ६४

    मी आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकातील, बन्यामीन वंशातील, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रानुसार परूशी असा होतो;

  22. फिलिप्पैकरांस ३:६सुमारे इ.स. ६४

    आणि आवेशाविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी दोषरहित होतो.

  23. फिलिप्पैकरांस ३:७सुमारे इ.स. ६४

    परंतु जो काही मला लाभ होतो, तो सर्व मी ख्रिस्तासाठी हानी समजलो आहे.

  24. फिलिप्पैकरांस ३:८सुमारे इ.स. ६४

    यापेक्षाही अधिक, ख्रिस्त येशू माझे प्रभू, यांच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानासाठी मी सर्वकाही हानी असे समजतो व त्यासाठी मी सर्वगोष्टी गमावल्या आहेत व मी त्या कचर्‍यासमान लेखतो यासाठी की ख्रिस्त मला प्राप्त व्हावे.

  25. फिलिप्पैकरांस ३:९सुमारे इ.स. ६४

    आणि मी त्यांच्यामध्ये सापडावे आणि नियमांद्वारे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, परंतु ख्रिस्तामधील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व परमेश्वरावरील विश्वासाने प्राप्त होते.