circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- इफिसकरांस ५:२७सुमारे इ.स. ६४
आणि त्याने ती मंडळी गौरवी, डाग किंवा सुरकुती किंवा दोषरहित अशी आपणाला सादर करावी, ती पवित्र आणि निष्कलंक असावी.
- इफिसकरांस ५:२८सुमारे इ.स. ६४
याचप्रमाणे पतींनीही त्यांच्या पत्नीवर, त्या आपलेच शरीर आहेत, असे समजून प्रीती करावी. जो त्याच्या पत्नीवर प्रीती करतो, तो स्वतःवर प्रीती करतो.
- इफिसकरांस ५:२९सुमारे इ.स. ६४
कोणी कधीही स्वतःच्याच शरीराचा द्वेष केला नाही, परंतु ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे संगोपन करून काळजी घेतात त्याप्रमाणे करतो.
- इफिसकरांस ५:३०सुमारे इ.स. ६४
कारण आपण त्यांच्या शरीराचे अवयव आहोत.
- इफिसकरांस ५:३१सुमारे इ.स. ६४
“या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.”
- इफिसकरांस ५:३२सुमारे इ.स. ६४
हे गूढ रहस्य आहे, परंतु मी ख्रिस्ताबद्दल आणि मंडळीबद्दल बोलत आहे.
- इफिसकरांस ५:३३सुमारे इ.स. ६४
म्हणून तुम्ही प्रत्येकाने जशी आपणावर तशीच आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीनेही आपल्या पतीचा सन्मान करावा.
- इफिसकरांस ६:१सुमारे इ.स. ६४
लेकरांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे.
- इफिसकरांस ६:२सुमारे इ.स. ६४
“तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा” अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे.
- इफिसकरांस ६:३सुमारे इ.स. ६४
“यासाठी की तुमचे कल्याण व्हावे आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्याचा लाभ घेता यावा.”
- इफिसकरांस ६:४सुमारे इ.स. ६४
पित्यांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका; याउलट प्रभूच्या शिक्षणात व बोधवचनात त्यांना वाढवा.
- इफिसकरांस ६:५सुमारे इ.स. ६४
दासांनो, जसे आपण ख्रिस्ताचे आज्ञापालन करतो, तसेच खर्या मनाने आपल्या ऐहिक धन्याचा मान राखा व भय धरा व त्यांच्या आज्ञा पाळा
- इफिसकरांस ६:६सुमारे इ.स. ६४
केवळ त्यांची नजर तुमच्यावर असतानाच त्यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून त्यांचे आज्ञापालन करू नका, तर मनापासून परमेश्वराची इच्छा पूर्ण करणारे ख्रिस्ताचे दास असे व्हा.
- इफिसकरांस ६:७सुमारे इ.स. ६४
ही सेवा लोकांची म्हणून नाही परंतु पूर्ण मनाने आपण जशी प्रभूची करतो अशी समजून करा.
- इफिसकरांस ६:८सुमारे इ.स. ६४
तुम्ही दास किंवा स्वतंत्र असला, तरी प्रत्येक चांगल्या गोष्टीचे वेतन प्रभू तुम्हा प्रत्येकाला देईल, हे लक्षात ठेवा.
- इफिसकरांस ६:९सुमारे इ.स. ६४
आणि धन्यांनो, तुमच्या दासांशी तसेच वागा. त्यांना धमक्या देऊ नका. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमचा व त्यांचा दोघांचाही एकच धनी जे स्वर्गात असून त्यांच्याजवळ पक्षपात नाही.
- इफिसकरांस ६:१०सुमारे इ.स. ६४
सर्वात शेवटी प्रभूच्या बळामध्ये आणि त्यांच्या पराक्रमी सामर्थ्याने सज्ज व्हा.
- इफिसकरांस ६:११सुमारे इ.स. ६४
परमेश्वराची सर्व शस्त्रास्त्रे धारण करा, म्हणजे तुम्हाला सैतानाच्या योजनेविरुद्ध उभे राहता येईल.
- इफिसकरांस ६:१२सुमारे इ.स. ६४
कारण आपले युद्ध मांस आणि रक्त यांच्याविरुद्ध नाही, तर सत्ताधारी, अधिपतींविरुद्ध, अंधकाराच्या शक्तीविरुद्ध, आणि आकाशमंडळातील दुष्ट आत्मे यांच्याविरुद्ध आहे.
- इफिसकरांस ६:१३सुमारे इ.स. ६४
यास्तव वाईट दिवसांमध्ये तुम्हाला खंबीरपणे उभे राहता यावे आणि सर्वकाही केल्यानंतर टिकाव धरता यावा म्हणून परमेश्वराची शस्त्रसामुग्री धारण करा.
- इफिसकरांस ६:१४सुमारे इ.स. ६४
म्हणून सत्यरूपी कमरबंदाने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे ऊरस्त्राण घेऊन स्थिर उभे राहा.
- इफिसकरांस ६:१५सुमारे इ.स. ६४
परमेश्वराच्या शांतीची शुभवार्ता गाजविण्याची तत्परता ही पादत्राणे घालून तयार राहा.
- इफिसकरांस ६:१६सुमारे इ.स. ६४
या सर्व व्यतिरिक्त विश्वासरूपी ढाल घ्या, जिच्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाचे अग्निबाण विझवू शकाल.
- इफिसकरांस ६:१७सुमारे इ.स. ६४
तारणाचे शिरस्त्राण, आणि आत्म्याची तरवार म्हणजे परमेश्वराचे वचन हे देखील घ्या.
- इफिसकरांस ६:१८सुमारे इ.स. ६४
सर्वदा प्रार्थना करा. पवित्र आत्म्यामध्ये प्रत्येक प्रसंगी, सर्वप्रकारच्या प्रार्थनेने आणि विनवणीने, प्रभूच्या लोकांसाठी जागृत राहून अगत्याने प्रार्थना करीत राहा.