circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- इफिसकरांस ४:९सुमारे इ.स. ६४
“त्यांचे आरोहण झाले” याचा अर्थ काय? की ते खाली पृथ्वीच्या अधोभागात उतरले होते.
- इफिसकरांस ४:१०सुमारे इ.स. ६४
जे अधोभागात उतरले त्यांनी पूर्ण सृष्टी भरून जाण्याच्या उद्देशाने स्वर्गाच्या उच्च स्थानापर्यंत सन्मानाने आरोहण केले.
- इफिसकरांस ४:११सुमारे इ.स. ६४
म्हणून ख्रिस्ताने स्वतः मंडळीला काही प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक म्हणून दिले,
- इफिसकरांस ४:१२सुमारे इ.स. ६४
हे यासाठी की त्यांच्या लोकांना सेवेच्या कार्यात सिद्ध करून ख्रिस्ताचे शरीर सुसज्ज व्हावे.
- इफिसकरांस ४:१३सुमारे इ.स. ६४
जोपर्यंत आपण सर्व विश्वास आणि परमेश्वराच्या पुत्राच्या ज्ञानामध्ये एकता, परिपक्वता व ख्रिस्ताची परिपूर्णता यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत हे दिले आहे.
- इफिसकरांस ४:१४सुमारे इ.स. ६४
आता यापुढे आपण बाळांसारखे असू नये, आणि तर्हेतर्हेच्या शिक्षणरूपी वार्याने, मनुष्यांच्या धूर्तपणाने व कपटाने फसविले जाऊन लाटांनी इकडे तिकडे वाहणारे व हेलकावे खाणारे होऊ नये.
- इफिसकरांस ४:१५सुमारे इ.स. ६४
त्याऐवजी प्रीतीमध्ये सत्य बोलत असताना, आपण प्रत्येक गोष्टींमध्ये ख्रिस्त ज्यांचे मस्तक आहेत, त्यांचे परिपक्व शरीर होण्यासाठी वाढत जावे.
- इफिसकरांस ४:१६सुमारे इ.स. ६४
त्यांच्यापासून संपूर्ण शरीर प्रत्येक सांध्याशी एकत्र जोडून धरले जाते, प्रत्येक अवयव आपले कार्य करतो व प्रीतीमध्ये शरीराची वाढ व बांधणी होते.
- इफिसकरांस ४:१७सुमारे इ.स. ६४
प्रभूच्या वतीने मी तुम्हाला आग्रहाने सांगतो की तुम्ही येथून पुढे ज्यांचे विचार भ्रष्ट झाले आहेत अशा गैरयहूदीयांसारखे जगू नका.
- इफिसकरांस ४:१८सुमारे इ.स. ६४
कारण त्यांचे विचार व बुद्धी अंधकारमय झाली असून, ते त्यांच्या हृदयाच्या कठीणपणामुळे अज्ञानी झाले आहेत व परमेश्वराच्या जीवनापासून दूर गेले आहेत.
- इफिसकरांस ४:१९सुमारे इ.स. ६४
सर्वसाधारण अकलेचा त्यांना गंध राहिला नाही, त्यांनी स्वतःला कामुकता व सर्व अशुद्धतेच्या स्वाधीन केले असून ते लोभाने भरलेले आहेत.
- इफिसकरांस ४:२०सुमारे इ.स. ६४
पण अशाप्रकारे जीवनाचा मार्ग तुम्ही शिकला नाही तर,
- इफिसकरांस ४:२१सुमारे इ.स. ६४
जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबद्दल ऐकले आणि येशूंमध्ये जे सत्य आहे त्याबद्दल तुम्ही शिकला आहात;
- इफिसकरांस ४:२२सुमारे इ.स. ६४
फसवणुकीच्या इच्छेने भ्रष्ट होत आलेला जुना मनुष्य काढून टाकणे, हे तुम्ही शिकला आहात;
- इफिसकरांस ४:२३सुमारे इ.स. ६४
तुमची मनोवृत्ती नवी केली जावी;
- इफिसकरांस ४:२४सुमारे इ.स. ६४
आणि खरे नीतिमत्व व पवित्रता यामध्ये परमेश्वरासारखा उत्पन्न केलेला नवा स्वभाव तुम्ही परिधान करावा.
- इफिसकरांस ४:२५सुमारे इ.स. ६४
यास्तव तुम्ही प्रत्येकजण एकमेकांशी लबाडी करण्याचे सोडून, आपल्या शेजार्यांशी सत्य बोला, कारण आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत.
- इफिसकरांस ४:२६सुमारे इ.स. ६४
“तुम्ही रागावले असला तरी पाप करू नका.” तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका.
- इफिसकरांस ४:२७सुमारे इ.स. ६४
आणि सैतानाला पाय ठेवण्यास जागा देऊ नका.
- इफिसकरांस ४:२८सुमारे इ.स. ६४
चोरी करणार्यांनी चोरी न करता आपल्या हातांनी चांगले व उपयोगी असे काम करावे, म्हणजे गरजवंत लोकांना देण्याकरिता त्यांच्याजवळ काहीतरी असेल.
- इफिसकरांस ४:२९सुमारे इ.स. ६४
आपल्या मुखाद्वारे अपायकारक शब्द बाहेर पडू देऊ नका. परंतु प्रसंगाला अनुसरून ऐकणार्यांसाठी उपयुक्त व त्यांच्या वृद्धीसाठी कारणीभूत होईल असे बोला.
- इफिसकरांस ४:३०सुमारे इ.स. ६४
परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण त्याच्याद्वारे तुम्ही खंडणीच्या दिवसासाठी शिक्का मारलेले आहात.
- इफिसकरांस ४:३१सुमारे इ.स. ६४
सर्वप्रकारचा कडूपणा, संताप आणि राग, भांडणे आणि निंदानालस्ती याबरोबरच सर्वप्रकारचा द्वेषभाव सोडून द्या.
- इफिसकरांस ४:३२सुमारे इ.स. ६४
एकमेकांना दयाळू व कनवाळूपणे वागवा; जशी परमेश्वराने तुम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा केली, तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा.
- इफिसकरांस ५:१सुमारे इ.स. ६४
परमेश्वराची प्रिय लेकरे या नात्याने तुम्ही परमेश्वराचा कित्ता गिरवावा.