मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इफिसकरांस ५:२सुमारे इ.स. ६४

    ज्याप्रमाणे ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली आणि स्वतःला आपल्यासाठी सुगंधी अर्पण व यज्ञ म्हणून परमेश्वराला दिले त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीच्या मार्गाने चला.

  2. इफिसकरांस ५:३सुमारे इ.स. ६४

    तुमच्यामध्ये लैंगिक पापे, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा लोभ यांची अप्रत्यक्ष सूचना देखील असू नये, कारण या गोष्टी परमेश्वराच्या पवित्र लोकांसाठी अयोग्य आहेत.

  3. इफिसकरांस ५:४सुमारे इ.स. ६४

    आणि अश्लीलता, मूर्खपणाचे बोलणे, असभ्य विनोद यांचे तुम्हामध्ये स्थान नसावे, ते उचित नाहीत, त्याऐवजी उपकारस्तुती व्हावी.

  4. इफिसकरांस ५:५सुमारे इ.स. ६४

    तुम्ही या गोष्टीविषयी खात्री बाळगा: व्यभिचारी, अशुद्ध किंवा लोभी असा व्यक्ती मूर्तिपूजक आहे, त्यास ख्रिस्ताच्या आणि परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही.

  5. इफिसकरांस ५:६सुमारे इ.स. ६४

    पोकळ शब्दांनी कोणी तुम्हाला फसवू नये, या गोष्टींमुळे आज्ञाभंग करणार्‍यांवर परमेश्वराचा क्रोध भडकतो.

  6. इफिसकरांस ५:७सुमारे इ.स. ६४

    यास्तव तुम्ही त्यांचे भागीदार सुद्धा होऊ नका.

  7. इफिसकरांस ५:८सुमारे इ.स. ६४

    कारण पूर्वी तुम्ही अंधकार होता, परंतु आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहात. प्रकाशाच्या लेकरांसारखे जगा.

  8. इफिसकरांस ५:९सुमारे इ.स. ६४

    (प्रकाशाचे फळ सर्वप्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यामध्ये आहे.)

  9. इफिसकरांस ५:१०सुमारे इ.स. ६४

    प्रभू कशाने प्रसन्न होतात याचा शोध घ्या.

  10. इफिसकरांस ५:११सुमारे इ.स. ६४

    अंधकाराच्या निष्फळ कर्मांशी तुम्हाला काहीच करावयाचे नाही, त्याऐवजी ते उघडकीस आणा.

  11. इफिसकरांस ५:१२सुमारे इ.स. ६४

    अवज्ञा करणारे जे गुप्तपणे करतात, त्यांचा उल्लेख करणे देखील लज्जास्पद होईल.

  12. इफिसकरांस ५:१३सुमारे इ.स. ६४

    परंतु प्रकाशाद्वारे सर्वकाही उघड होते, ते दृष्टीस पडते आणि जे सर्वकाही प्रकाशित केलेले आहे ते प्रकाश असे होते.

  13. इफिसकरांस ५:१४सुमारे इ.स. ६४

    त्यामुळेच असे म्हटले आहे: “अरे निद्रास्ता, जागा हो, मेलेल्यामधून ऊठ म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशतील.”

  14. इफिसकरांस ५:१५सुमारे इ.स. ६४

    म्हणून तुम्ही अज्ञानी नव्हे तर ज्ञानी लोकांसारखे वागण्याची काळजी घ्या.

  15. इफिसकरांस ५:१६सुमारे इ.स. ६४

    दिवस कठीण आहेत, म्हणून प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या.

  16. इफिसकरांस ५:१७सुमारे इ.स. ६४

    मुर्खासारखे वागू नका, तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजून घ्या.

  17. इफिसकरांस ५:१८सुमारे इ.स. ६४

    मद्यपान करून धुंद होऊ नका, ज्यामुळे अनीती वाढते. त्याऐवजी आत्म्याने परिपूर्ण व्हा.

  18. इफिसकरांस ५:१९सुमारे इ.स. ६४

    आत्म्याने प्रेरित स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते गाऊन एकमेकांशी बोला. भजने गाऊन व संगीताद्वारे तुमच्या मनापासून प्रभूची स्तुती करा.

  19. इफिसकरांस ५:२०सुमारे इ.स. ६४

    आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आपले परमेश्वर आणि पिता यांचे प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी उपकार माना.

  20. इफिसकरांस ५:२१सुमारे इ.स. ६४

    ख्रिस्ताबद्दल असलेल्या आदरामुळे एकमेकांच्या अधीन राहा.

  21. इफिसकरांस ५:२२सुमारे इ.स. ६४

    पत्नींनो, जसे प्रभूच्या, तसेच तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असा.

  22. इफिसकरांस ५:२३सुमारे इ.स. ६४

    कारण ज्याप्रमाणे पती हा पत्नीचे मस्तक आहे, तर ख्रिस्त हा त्यांचे शरीर म्हणजे, मंडळीचे मस्तक, तिचा तो उद्धारकर्ता आहे.

  23. इफिसकरांस ५:२४सुमारे इ.स. ६४

    आता मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन राहते, तसेच पत्नींनी सुद्धा प्रत्येक बाबतीत त्यांच्या पतीच्या अधीन राहवे.

  24. इफिसकरांस ५:२५सुमारे इ.स. ६४

    पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे, ज्याप्रमाणे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती करून स्वतःस तिच्यासाठी अर्पण केले,

  25. इफिसकरांस ५:२६सुमारे इ.स. ६४

    जेणेकरून मंडळीला वचनरुपी पाण्याने धुवून शुद्ध करून तिला पवित्र करावे;