- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Trees बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
(हीरामच्या सेवकांनी आणि शलोमोनच्या सेवकांनी ओफीर येथून सोने आणले; त्यांनी चंदन आणि मोलवान रत्ने ही सुद्धा आणली.
शलोमोनने याहवेहच्या मंदिरात व राजवाड्यात पायर्या बनवण्यासाठी व वादकांसाठी वीणा व सतारी बनविण्यास चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला. यहूदीयामध्ये त्यासारखे कधीही पाहण्यात आले नव्हते.)
त्यांनी तटबंदीची शहरे आणि सुपीक जमिनी काबीज केल्या; सर्व चांगल्या वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेल्या विहिरी, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे व विपुल फळझाडे हस्तगत केली. मग ते खाऊन तृप्त व उत्तमरित्या पोषित झाले; आणि तुमच्या महान चांगुलपणाचा त्यांनी आनंद साजरा केला.
“झाडाला देखील आशा असते: की त्याला कापून टाकले तरी ते पुन्हा फुटणार, आणि त्याच्या नवीन फांद्या कोमेजणार नाहीत.
कमलिनीखाली तो पडून राहतो, लव्हाळ्याच्या बेटात व दलदलीत तो लपून असतो.
धन्य ते लोक, जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत, किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत, आणि थट्टा करणार्यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.
पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.
ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्या जलप्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.
मी एक वाईट व क्रूर मनुष्य पाहिला आहे. तो सुपीक जमिनीतील हिरव्यागार झाडासारखा पसरलेला होता.
दाट वृक्षांना कुर्हाडीने उद्ध्वस्त करणार्या माणसांसारखे ते वागले.
त्यांनी गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा आणि उंबराच्या झाडांचा बर्फाने नाश केला.
याहवेहने लावलेल्या लबानोनाच्या गंधसरू वृक्षास भरपूर पाणी पुरवठा असतो.
त्यावर पक्षी आपली घरटी करतात व करकोचा त्याचे घरटे देवदारू वृक्षावर बांधतो.
अहो पर्वतांनो व सर्व टेकड्यांनो, फळझाडे व समस्त गंधसरू,
जे तिला धरून राहतात त्यांना ती जीवनीवृक्षाप्रमाणे आहे; जे तिला घट्ट धरून राहतात, ते आशीर्वादित होतील.
नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो सुज्ञ आहे तो आत्मे जिंकतो.
सांत्वन करणारी जीभ जीवनदायी वृक्ष आहे, पण विकृत जीभ आत्म्याला चिरडते.
मी बागा आणि उद्याने बनवून त्यामध्ये प्रत्येक प्रकारची फळझाडे लावली.
जेव्हा लोकांना उंच ठिकाणांची आणि वाटेतील धोक्याची भीती वाटते; जेव्हा बदामाची झाडे फुलतात आणि नाकतोडा त्याबरोबर फरफटत जातो आणि कोणतीही अभिलाषा जागृत होत नाही. तेव्हा लोक आपल्या सनातन घराकडे जातात आणि शोक करणारे रस्त्यावर येतात.
जसे जंगलातील इतर झाडांमध्ये सफरचंदाचे झाड, तसा इतर तरुणांमध्ये माझा प्रियकर आहे. त्याच्या छायेत बसणे मला आनंददायी आहे, आणि त्याचे फळ मला चवीला गोड लागते.
ही कोण आहे जी वाळवंटातून आपल्या प्रियकरावर टेकून येत आहे? नायिका जिथे तुझ्या आईने गर्भधारण केले ज्या सफरचंदाच्या झाडाखाली; तिथे तुझ्या मातेला प्रसूती वेदना होऊन तिने तुला जन्म दिला, त्या ठिकाणी मी तुला उत्तेजित केले.
तुम्ही पाने कोमेजून गेलेल्या एलावृक्षासारखी, पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल.
आणि भूमीवर एक दशांश जरी राहिला तरी, तो पुन्हा उद्ध्वस्त होईल. परंतु जसे एला आणि अल्लोन जेव्हा कापून टाकल्यावर बुंधा उरतो, त्याचप्रमाणे पवित्र बियाणे हे भूमीमध्ये बुंध्याप्रमाणे होईल.”
आता दावीदाच्या वंशजांना असे सांगण्यात आले, “अरामने एफ्राईमशी युती केली आहे;” तेव्हा जंगलातील झाडे जशी वाऱ्याने हादरली जातात तशीच आहाज आणि त्याच्या लोकांची मने हादरली.
आणि त्याच्या जंगलातील राहिलेली झाडे इतकी कमी असतील की, एखादे लहान बालकही त्याची नोंद करेल.