Skip to content

Trees बद्दल बायबलमधील वचने

132 वचने · 87 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गहू व जव, द्राक्षमळे, अंजिरे व डाळिंबे, जैतुनाचे तेल व मध यांचा तो देश आहे;

  2. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीशेजारी तुम्ही अशेरा मूर्तीचे लाकडी स्तंभ उभारू नका,

  3. एखादा मनुष्य लाकडे तोडण्यासाठी आपल्या शेजार्‍याबरोबर अरण्यात गेला आणि झाड तोडत असता त्याने कुर्‍हाड चालविली व ती दांड्यातून निसटून उडाली व त्याच्या शेजार्‍याला ती लागली आणि तो मरण पावला, तर त्या मनुष्याने पळून जाऊन या तीन शहरांपैकी एका शहराचा आश्रय घेऊन सुरक्षित राहावे.

  4. तुम्ही एखाद्या शहराला बरेच दिवस वेढा द्याल आणि ते हस्तगत करण्यासाठी त्याच्याविरुद्ध युद्ध कराल, तेव्हा तेथील झाडांचा कुर्‍हाड चालवून त्यांचा नाश करू नये. झाडांवरील पाहिजे तेवढी फळे तुम्ही खावी; पण झाडे मात्र तोडू नयेत. झाडे मनुष्य आहेत का त्यांना तुम्ही वेढा घालावा?

  5. परंतु जी झाडे फळे न देणारी आहेत हे तुम्ही जाणता, त्यांचा वापर तुमच्याशी युद्ध सुरू असलेले शहर पडेपर्यंत वेढा बांधण्यासाठी करू शकता.

  6. जर एखाद्या मनुष्याने असा काही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला ज्याची शिक्षा मृत्युदंड आहे व त्याला मृत्युदंड देण्यात आला आणि त्याला झाडावर टांगण्यात आले असेल,

  7. तर त्याचा मृतदेह रात्रभर तिथे ठेवू नये, तर त्याच दिवशी त्याचे दफन करावे; कारण जो कोणी खांबावर टांगलेला असेल, त्याच्यावर परमेश्वराचा शाप असतो. म्हणून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जो देश वतन म्हणून देत आहे, तो तुम्ही भ्रष्ट करू नये.

  8. टोळधाड येऊन तुमच्या भूमीवरील वृक्षांचा आणि पिकांचा नाश करतील.

  9. नंतर यहोशुआने त्या राजांचा वध केला आणि त्यांची मृत शरीरे पाच झाडांवर संध्याकाळपर्यंत तशीच टांगून ठेवली.

  10. तिने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा आणि बेथेलमध्ये दबोराच्या खजूराच्या झाडाखाली न्यायसभा चालविली आणि इस्राएली लोक त्यांच्यातील वादाचा निर्णय घेण्यासाठी तिच्याकडे येत असत.

  11. म्हणून त्याने त्यांच्यासमोर मनोविकृत असल्याचे सोंग घेतले; व तो त्यांच्याबरोबर होता तेव्हा तो वेड्यासारखे वागू लागला, फाटकाच्या दारांवर ओरडू लागला आणि आपल्या दाढीवरून लाळ गाळू लागला.

  12. आता शौलाने ऐकले की, दावीद आणि त्याच्या माणसांचा शोध लागला आहे. तेव्हा शौल हातात भाला घेऊन, गिबियाह येथील टेकडीवर चिंचेच्या झाडाखाली बसला, त्याचे सर्व अधिकारी त्याच्या सभोवती उभे राहिले.

  13. तेव्हा दावीदाने याहवेहला विचारले आणि त्यांनी उत्तर दिले, “सरळ वरती जाऊ नको, परंतु त्यांच्यामागून वळसा घे आणि तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर.

  14. तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सैन्य चालत येण्याचा आवाज येताच, त्वरित पुढे निघा, त्यावरून पलिष्टी सैन्याचा नाश करण्यासाठी याहवेह तुमच्यापुढे गेले आहेत असे समज.”

  15. लबानोनातील गंधसरूपासून भिंतीतून उगविणार्‍या एजोबापर्यंत वनस्पती जीवनाविषयी तो बोलला. पशू व पक्षी, सरपटणारे जंतू व मासे याबद्दलही त्याने वर्णन केले.

  16. याप्रकारे हीरामाने शलोमोनला हवे तेवढ्या गंधसरू आणि देवदारू लाकडांचा पुरवठा केला.

  17. (त्याचप्रमाणे हीरामच्या गलबतांवर ओफीर येथून सोने व मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड व मोलवान रत्ने आणली.

  18. शलोमोनने याहवेहच्या मंदिरात व राजवाड्यात कठडे बनवण्यासाठी व वादकांसाठी वीणा व सतारी बनविण्यास चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला. तेव्हापासून आजपर्यंत हे चंदन ना कुठे आणले गेले ना ते कोणाच्या दृष्टीस पडले.)

  19. राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले.

  20. तो स्वतः एक दिवसाचा प्रवास करीत रानात गेला, तो रतामाच्या झुडूपाखाली आला आणि मरून जावे म्हणून तिथे बसून प्रार्थना केली. “हे याहवेह आता पुरे आहे, माझा प्राण घ्या, मी माझ्या पूर्वजांपेक्षा चांगला आहे असे नाही.”

  21. नंतर तो त्या रतामाच्या झुडूपाखाली पडून झोपी गेला. अचानक परमेश्वराच्या दूताने येऊन त्याला स्पर्श करीत म्हटले, “ऊठ आणि खा.”

  22. चला आपण यार्देन नदीवर जाऊ या, जिथे प्रत्येक आपल्यासाठी खांब घेईल; आणि भेटण्यासाठी आपण एक स्थान तयार करू या.” आणि तो म्हणाला, “जा.”

  23. तुझे दूत पाठवून तू प्रभूची चेष्टा केली. आणि तू म्हणतोस, ‘मी माझ्या अनेक रथांनी उंचच उंच पर्वतावर चढून गेलो, लबानोनच्या सर्वात उंच पर्वतावर गेलो. मी तिचे सर्वात उंच देवदारू तोडले, निवडक गंधसरू तोडले. मी तिच्या दुर्गम भागात पोहोचलो तिच्या अत्यंत उत्तम जंगलात गेलो.

  24. “याशिवाय लबानोनच्या जंगलातून गंधसरू, देवदारू व रक्तचंदन यांची लाकडे माझ्याकडे पाठवा. लाकडे कापून पाठविण्याच्या कामी तुमचे लोक निष्णात आहेत हे मी जाणतो. माझे कारागीर तुमच्या कारागिरांसह काम करतील.

  25. तुमच्या लाकूड तोडणाऱ्या सेवकांना मी वीस हजार कोर झोडलेला गहू, वीस हजार कोर जव, द्राक्षारसाचे वीस हजार बथ व वीस हजार जैतुनाच्या तेलाचे बथ देईन.”