Trees बद्दल बायबलमधील वचने: Given as food to the animal creation
Given as food to the animal creation बद्दल वचने
मग परमेश्वर म्हणाले, “पाहा, भूतलावर बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि फळांमध्येच वृक्ष निर्माण करणारे बीज असलेले प्रत्येक फळझाड मी तुम्हाला दिले आहे. ती तुमचे अन्न होतील.
त्याप्रमाणे पृथ्वीतलावरील सर्व पशू, आकाशातील प्रत्येक पक्षी, तसेच जमिनीवर सरपटत जाणारा, जीवनाचा श्वास असलेला प्रत्येक प्राणी—यांना अन्न म्हणून मी हिरवी वनस्पती देत आहे” आणि तसे घडून आले.
तुम्ही एखाद्या शहराला बरेच दिवस वेढा द्याल आणि ते हस्तगत करण्यासाठी त्याच्याविरुद्ध युद्ध कराल, तेव्हा तेथील झाडांचा कुर्हाड चालवून त्यांचा नाश करू नये. झाडांवरील पाहिजे तेवढी फळे तुम्ही खावी; पण झाडे मात्र तोडू नयेत. झाडे मनुष्य आहेत का त्यांना तुम्ही वेढा घालावा?