Skip to content

Trees बद्दल बायबलमधील वचने

132 वचने · 87 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पुष्कळ फांद्यांनी मी त्याला सुंदर बनविले, परमेश्वराच्या बागेतील, एदेन बागेतील झाडे त्याचा हेवा करीत असत.

  2. “ ‘यास्तव सार्वभौम याहवेह म्हणतात: मोठे देवदारू दाट झाडींच्या वर उंच झाले आणि त्याला त्याच्या उंचीचा गर्व झाला,

  3. झाडे त्यांची फळे देतील आणि भूमी तिचे पीक उपजवेल; लोक त्यांच्या देशात सुरक्षित राहतील. जेव्हा मी त्यांच्या जोखडाची बंधने तोडेन आणि ज्यांनी त्यांना गुलाम करून घेतले, त्यांच्या हातून त्यांना सोडवेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.

  4. तुमच्या झाडांची फळे व तुमच्या शेतातील पीक मी वाढवेन, यासाठी की तुम्ही दुष्काळामुळे राष्ट्रांमध्ये आणखी अपमान सहन करणार नाही.

  5. नदीच्या दोन्ही बाजूंना सर्वप्रकारच्या फळांची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत, ना त्यांची फळे संपतील. प्रत्येक महिन्यात ते फळे देतील, कारण त्यांच्याकडे पवित्रस्थानातून पाणी वाहते. त्यांची फळे खाण्यासाठी व त्यांची पाने आरोग्यासाठी वापरली जातील.”

  6. मी माझ्या बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले: पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष लावलेला मी पाहिले. तो प्रचंड उंचच उंच होता.

  7. तो वृक्ष वाढला आणि मजबूत झाला आणि त्याचा शेंडा आकाशापर्यंत पोहोचला; पृथ्वीच्या सीमेपासूनही तो दिसू शकत होता.

  8. त्याची पाने हिरवीगार होती, त्याला फळे भरपूर होती आणि त्यामध्ये प्रत्येकासाठी भोजन होते. त्याच्या खाली जंगली पशू विसावले होते, आणि त्याच्या फांद्यांमध्ये पक्षी राहत असत; त्यांनी आपली घरटी बांधली. त्यातून प्रत्येक प्राण्याला खायला मिळत असे.

  9. “मी बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले की, स्वर्गातून एक पवित्र, एक दूत खाली येत आहे.

  10. त्याने मोठ्याने ओरडून सांगितले ‘हे वृक्ष तोडून टाका, फांद्या कापून टाका; पाने ओरबाडून काढा आणि फळे विखरून द्या. त्याच्या खालचे पशू निघून जावोत आणि फांद्यांवरील पक्षी उडून जावोत.

  11. एफ्राईम नाश पावला आहे. त्यांची मुळे सुकून गेली आहेत. ते फळ देत नाही. जरी ते मुलांना जन्म देतील, तर मी त्यांचे प्रिय मूल मारून टाकेन.”

  12. द्राक्षवेल वाळून गेली आहे अंजिराचे झाड कोमेजले आहे; डाळिंब, खजुराचे आणि सफरचंदाचे झाड; शेतातील सर्व झाडे सुकून गेली आहेत. खचितच लोकांचा आनंद विरून गेला आहे.

  13. हे याहवेह, मी तुम्हाला हाक मारीत आहेत, कारण अग्नीच्या उष्णतेने कुरणे जाळून फस्त केली आहेत, आणि अग्नीने मैदानातील सर्व झाडे भस्मसात झाली आहेत.

  14. वन्य पशूंनो तुम्ही घाबरू नका, कारण रानातील कुरणे हिरवीगार होत आहेत. झाडे आपली फळे देत आहेत; अंजिराची झाडे आणि द्राक्षवेली पुन्हा आपले सत्व देत आहेत.

  15. आमोसने अमस्याहला उत्तर दिले, “मी तर संदेष्टा नाही आणि मी संदेष्ट्याचा पुत्रही नाही, मी तर मेंढपाळ आणि उंबरांच्या झाडांची निगा राखणारा होतो.

  16. रात्रीच्या वेळी मला एक दृष्टान्त मिळाला, एका तांबड्या घोड्यावर एक मनुष्य बसलेला मी पाहिला. तो एका खोऱ्यात मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता. त्याच्या पाठीमागे तांबडे, तपकिरी व पांढरे असे दुसरे घोडे होते.

  17. कुर्‍हाड झाडांच्या मुळावर आधी ठेवलेली आहे, आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि अग्नीत टाकण्यात येईल.”

  18. प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते आणि वाईट झाड वाईट फळ देते.

  19. चांगली झाडे वाईट फळे देणार नाहीत आणि वाईट झाडे चांगली फळे देणार नाही.

  20. या कारणामुळे चांगली फळे न देणारी झाडे तोडून टाकण्यात येतील व जाळून टाकली जातील.

  21. “जर झाड चांगले असेल तर त्याचे फळ देखील चांगले असते आणि जर झाड चांगले नसेल तर त्याचे फळ देखील चांगले नसते. झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते.

  22. तो सर्व दाण्यापैकी सर्वात लहान असला तरी जेव्हा ते वाढते तेव्हा ते बागेतील सर्वात मोठे झाड होते, मग त्याच्या फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी येऊन विसावा घेतात.”

  23. जवळच त्यांना अंजिराचे झाड दिसले. त्यावर काही अंजीर आहेत काय हे पाहण्यास ते झाडाजवळ गेले. त्या झाडावर त्यांना पानांशिवाय काही आढळले नाही. मग ते त्या झाडाला म्हणाले, “यापुढे तुला फलप्राप्ती होणार नाही.” आणि तत्काळ ते झाड वाळून गेले.

  24. तो धावत पुढे गेला आणि उंबराच्या झाडावर चढला, कारण येशू त्याच वाटेने येत होते.

  25. नंतर येशूंनी लोकांना हा दाखला सांगितला: “अंजिराच्या झाडाकडे आणि सर्व झाडांकडे पाहा.