Skip to content

The Rich बद्दल बायबलमधील वचने

145 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दुर्जन धुळीसारखा धनाचा साठा करतो व चिखलाप्रमाणे वस्त्र गोळा करून ठेवतो,

  2. जे काही तो साठवून ठेवतो, तरी न्यायी ती वस्त्रे पांघरतील, आणि निरपराधी त्याचे रुपे आपसात वाटून घेतील.

  3. त्याने बांधलेले घर पतंगाच्‍या कोशाप्रमाणे आहे, पहारेकर्‍याच्या झोपडीप्रमाणे ते आहे.

  4. धनवान व्यक्ती म्हणून तो रात्री झोपी जातो; पण सकाळी उठून पाहिले तेव्हा काही उरलेले नसते.

  5. संकटे पुराप्रमाणे त्याला गाठतात; रात्रीचे तुफान त्याच्यापासून सर्वकाही हिसकावून घेते.

  6. पूर्वेचा वारा त्याला वाहून घेऊन जातो आणि तो नाहीसा होतो; त्याच्या स्थानातून तो उडवून टाकला जातो.

  7. तो त्याच्या सामर्थ्यापासून पळ काढण्याचा बेत करतो तरी त्याच्यावर दया न होता तो दूर फेकला जाईल.

  8. टाळ्या वाजवित पूर्वेचा वारा त्याची निंदा करेल आणि तिरस्काराने आपल्या ठिकाणातून तो हुसकून टाकला जाईल.”

  9. “जर मी सोन्यावर भरवसा ठेवला असेन किंवा शुद्ध सोन्याला म्हटले असते की, ‘तू माझा रक्षक आहेस,’

  10. जर मी माझे मोठे धन, आणि आपल्या हाताने मिळवलेल्‍या संपत्तीमध्‍ये आनंद बाळगला असेल,

  11. तर या पापांचा सुद्धा न्याय झाला पाहिजे, कारण याप्रकारे सर्वोच्च परमेश्वराशी माझे अविश्वासूपण असते.

  12. जेव्हा इतर लोक श्रीमंत होतात, त्यांच्या घराचे वैभव वाढेल, तेव्हा भेदरून जाऊ नका.

  13. कारण जेव्हा ते मरण पावतात, तेव्हा ते सोबत काहीही नेत नाहीत; त्यांचे वैभव त्यांच्या मागोमाग जाणार नाही.

  14. जेव्हा तो जिवंत होता, तेव्हा त्याने प्रशंसा प्राप्त केली— कारण मनुष्य समृद्ध झाल्यावर त्याची प्रशंसा केलीच जाते—

  15. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे मासकील. हा त्यावेळचा संदर्भ आहे, ज्यावेळी एदोमी दवेगने शौलाला कळविले की दावीद अहीमेलेखच्या घरी आहे. हे बलवान पुरुषा, दुष्ट कृत्यांची बढाई का मारतोस, तू दिवसभर कशाचा अभिमान बाळगतोस, तू जो परमेश्वराच्या दृष्टीने निंदनीय आहेस?

  16. तू जो फसव्या कृतीत गुंतलेला आहे, दिवसभर तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्‍यासारखी विनाशाची योजना करीत असते.

  17. तुला चांगल्यापेक्षा दुष्टपणा, सत्य बोलण्यापेक्षा असत्य अधिक प्रिय आहे. सेला

  18. अगे कपटी जिभे, अपायकारक बोलणे तुला प्रिय आहे!

  19. परंतु परमेश्वर तुला शाश्वत विनाशाकडे आणतील; तुझ्या डेर्‍यातून तुला ओढून बाहेर काढतील आणि जिवंतांच्या भूमीतून समूळ नष्ट करून तुला दूर नेतील. सेला

  20. नीतिमान लोक भयचकित होऊन पाहतील; ते त्याला हसतील व म्हणतील:

  21. “पाहा, हा असा मनुष्य आहे ज्याने परमेश्वराला आपले आश्रयस्थान बनविले नाही तर आपल्या विपुल संपत्तीवर विश्वास ठेवला आणि दुसर्‍यांचा नाश करून तो बलवान झाला!”

  22. कारण दुष्टांची समृद्धी पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो होतो.

  23. होय, आयुष्यभर त्यांचा मार्ग पीडारहित असतो; ते निरोगी आणि सुदृढ असतात.

  24. इतर मनुष्यांसारखी त्यांच्यावर सहसा संकटे येत नाहीत आणि इतरांप्रमाणे आजाराने पीडलेही जात नाहीत.

  25. अहंकार त्यांच्या गळ्यातील माळ; हिंसा त्यांची वस्त्रे आहेत.