Skip to content

The Rich बद्दल बायबलमधील वचने

145 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. काही काळानंतर स्त्रीपुरुषांनी आपल्या यहूदी बांधवांविरूद्ध तक्रार करण्यास सुरुवात केली.

  2. काहीजण म्हणाले, “आम्ही व आमचे पुत्र व कन्या असे बरेच लोक आहोत आणि जिवंत राहण्यासाठी आम्हाला धान्याची गरज आहे.”

  3. दुसरे म्हणाले, “दुष्काळापासून जीव वाचवावा म्हणून धान्य मिळविण्यासाठी आम्हाला आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागली आहेत.”

  4. आणखी दुसरे काही म्हणाले, “आमची शेते आणि द्राक्षमळे यावरील राजाचा कर भरता यावा म्हणून आम्हाला कर्जाऊ पैसे काढावे लागले आहेत.

  5. आम्ही त्यांचेच बांधव आहोत आणि आमची मुले त्यांच्या मुलांबाळांसारखीच आहेत, तरीसुद्धा जगण्यासाठी पुरेसे पैसे मिळावेत म्हणून आम्हाला आमची मुले व मुली गुलाम म्हणून कामाला लावावी लागतात. आमच्या काही कन्या आम्ही आधीच गुलाम म्हणून विकलेल्या आहेत, पण आम्ही असमर्थ आहोत, कारण आमची शेते व द्राक्षमळेसुद्धा इतरांचे झाले आहेत.”

  6. जेव्हा मी त्यांचा हा आक्रोश व या तक्रारी ऐकल्या, तेव्हा मी अतिशय संतापलो.

  7. या परिस्थितीवर विचार केल्यानंतर मी या प्रतिष्ठितांना व अधिकार्‍यांना म्हणालो, “तुम्ही स्वतःच्याच देशबांधवांकडून व्याज गोळा करीत आहात!” मग त्यांचा समाचार घेण्यासाठी मी एक मोठी सभा बोलाविली.

  8. या सभेत मी त्यांना म्हणालो, “आम्ही गैरयहूद्यांना गुलामगिरीत विकलेल्या आपल्या यहूदी बांधवांना शक्य होईल तितक्यांना परत आणले आहे. आता तुम्ही मात्र तुमच्याच लोकांना विकून, त्यांना पुन्हा आम्हाला विकत आहात! त्यांची सुटका आम्ही किती वेळा करावी?” हे ऐकून ते स्तब्ध राहिले कारण त्यांना त्यावर उत्तरच सापडले नाही.

  9. मग मी पुढे म्हणालो, “तुम्ही जे करीत आहात, ते अयोग्य आहे. आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांमध्ये आपली निंदा होऊ नये म्हणून तुम्ही परमेश्वराचे भय बाळगू नये काय?

  10. मी व माझे बंधू, आणि माझे लोक कोणतेही व्याज न घेता पैसे आणि धान्य उसने देत आहोत. आपण हे व्याज घेणे बंद केले पाहिजे!

  11. त्यांची शेते, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे आणि घरे त्यांना लगेच परत करा व पैसे, धान्य, नवा द्राक्षारस व जैतुनाचे तेल यावरील एक टक्का जे व्याज म्हणून तुम्ही त्यांच्याकडून घेता ते सोडून द्या.”

  12. त्यांनी म्हटले, “आम्ही त्यांना सर्वकाही परत देऊ. आणि त्यांच्याकडून काहीही मागणी करणार नाही. तुम्ही म्हणता तसेच आम्ही करू.” मग मी याजकांना बोलाविणे पाठविले, प्रतिष्ठित व इतर अधिकाऱ्यांकडून त्यांनी जे वचन दिले होते, त्या शपथा घेण्यास लावल्या.

  13. व माझ्या अंगरख्याची दुमड धरून तो झटकून म्हटले, “जो कोणी या शपथेचे पालन करणार नाही, परमेश्वर त्याची घरे व त्याची संपत्ती असेच झटकून टाकेल. तर असा मनुष्य असाच झटकला जाऊन पूर्णपणे रिकामा होवो!” यावर सभेतील सर्व लोक म्हणाले, “आमेन” आणि त्यांनी याहवेहची स्तुती केली. सर्व लोकांनी आपल्या वचनाप्रमाणे केले.

  14. दुर्जनांना दीर्घायुष्य का मिळते, वयाने परिपक्व होऊन ते सशक्त का होतात?

  15. त्यांची मुले त्यांच्याभोवती स्थिर झालेली त्यांना दिसतात, आणि त्यांचे वंशज त्यांच्या दृष्टीपुढे असतात.

  16. त्यांची घरे भयविरहीत व सुरक्षित असतात; परमेश्वराचा दंड त्यांच्यावर नसतो.

  17. त्यांचा बैल निष्फळ असत नाही; त्यांच्या गाई वासरांना जन्म देतात आणि त्यांचा गर्भपात होत नाही.

  18. ते आपली मुले कळपासारखी बाहेर पाठवितात; आणि त्यांची लेकरे नाचत बागडतात.

  19. डफ आणि वीणा यांच्या तालावर ते गीते गातात; आणि बासरीच्‍या स्‍वरावर हर्षनाद करतात.

  20. ते आपला जीवनक्रम समृद्धीत घालवितात आणि शांतीने खाली कबरेत जातात.

  21. तरी ते परमेश्वराला म्हणतात, ‘आमच्यापासून दूर जा! तुमचे मार्ग जाणून घेण्याची आमची इच्छा नाही.

  22. हा सर्वसमर्थ कोण आहे, की आम्ही त्यांची सेवा करावी? त्यांच्याकडे विनंती करून आम्हाला काय मिळणार?’

  23. “दुष्टासाठी परमेश्वर जे नेमून देतात ते हेच आहे, कठोर मनुष्याला सर्वसमर्थाच्या हातून हाच वारसा मिळतो:

  24. त्याला कितीही मुलेबाळे असली, तरी त्यांचा शेवट तलवारीने होणार; त्याच्या संततीस कधीही पुरेसे अन्न मिळणार नाही.

  25. आणि त्यातून जे वाचतील, ते रोगाला बळी पडतील, आणि त्यांच्या विधवादेखील त्यांच्यासाठी शोक करणार नाहीत.