मुख्य मजकुरावर जा

The Rich बद्दल बायबलमधील वचने

145 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या श्रीमंत मनुष्याच्या मेजावरून खाली पडलेला चुरा मिळावा या आशेने तो तिथे पडलेला असताना कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.

  2. “अशी वेळ आली की तो भिकारी मरण पावला आणि दूतांनी त्याला अब्राहामाजवळ नेले. श्रीमंत मनुष्यही मरण पावला, तेव्हा त्याला पुरण्यात आले.

  3. आणि त्याचा आत्मा अधोलोकात गेला. तिथे तो यातना भोगीत असताना, तिथून त्याने दूर अंतरावर लाजराला अब्राहामाच्या जवळ असलेले पाहिले.

  4. त्याने त्याला हाक मारली, ‘हे पित्या अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठीव यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण या अग्निज्वालांमध्ये मी कासावीस झालो आहे.’

  5. “परंतु अब्राहामाने उत्तर दिले, ‘मुला, तुझ्या आयुष्यात तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, पण लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या, म्हणून तो आता सांत्वन पावत आहे आणि तू क्लेश भोगीत आहेस.

  6. आणि याव्यतिरिक्त, आमच्या आणि तुमच्यामध्ये एक मोठी दरी स्थापलेली आहे, जे येथून तुझ्याकडे जाण्याची इच्छा करतात ते जाऊ शकत नाहीत किंवा तिथून आम्हापर्यंत ती दरी ओलांडून कोणीही येऊ शकत नाही.’

  7. जेव्हा येशूंनी हे ऐकले, ते त्याला म्हणाले, “पण तू एका गोष्टीत उणा आहेस. तुझे आहे ते सर्वकाही विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.”

  8. जेव्हा त्याने हे बोलणे ऐकले, तेव्हा तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता.

  9. येशूंनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, “श्रीमंतांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे किती कठीण आहे!

  10. एखाद्या श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”

  11. ज्यांनी हे बोलणे ऐकले, त्यांनी विचारले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?”

  12. जगातील श्रीमंतांना निक्षून सांग की त्यांनी गर्विष्ठ आणि उद्धट होऊ नये; त्या धनावर विसंबून राहू नये. तर परमेश्वर जे आपल्या उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतात, त्याचा अभिमान बाळगा व त्यांच्यावर भरवसा ठेवा.

  13. त्यांना चांगले ते करण्यासाठी, सत्कर्माविषयी धनवान व गरजवंतांना औदार्याने देणे व परोपकारी असण्याविषयी आज्ञा द्या.

  14. अशाप्रकारे, ही संपत्ती त्यांच्या भावी युगाच्या पायाभरणीसाठी खर्च केली जाईल, जेणेकरून जे जीवन जगू शकतील ते वास्तव आहे.

  15. दीन परिस्थितीतील विश्वासू जणांनी आपल्या उच्च पदाबद्दल अभिमान बाळगावा.

  16. परंतु जे श्रीमंत आहेत त्यांनी आपल्या दीन अवस्थेबद्दल अभिमान बाळगावा; कारण ते रान फुलांसारखे नाहीसे होतील.

  17. जसा सूर्य प्रखर उष्णतेने उगवतो आणि रोप कोमेजून टाकतो; त्याचे फूल गळून पडते आणि त्याच्या सुदंरतेचा नाश होतो. त्याचप्रमाणे श्रीमंत ही आपला उद्योग करीत असतानाच कोमेजून जाईल.

  18. श्रीमंत लोकांनो, ऐका, जी आपत्ती तुमच्यावर येणार आहे त्यामुळे रडा आणि विलाप करा.

  19. तुमची संपत्ती सडली आहे व तुमच्या वस्त्रांना गंज लागला आहे.

  20. तुमचे सोने आणि चांदी याला गंज चढला आहे. त्यांचे गंजणे तुम्हाविरुद्ध साक्ष देईल आणि अग्नीप्रमाणे तुमचे मांस खाऊन टाकेल. शेवटच्या दिवसासाठी तुम्ही धनाचा साठा करून ठेवला आहे.