Skip to content

Doeg

5 वचने

Doeg चा उल्लेख असलेली वचने

  1. त्या दिवशी शौलाचा एक सेवक तिथे होता, ज्याला याहवेहसमोर थांबवून ठेवले गेले होते; तो शौलाचा मुख्य मेंढपाळ दवेग, एदोमी प्रांतातील होता.

  2. परंतु शौलाच्या अधिकार्‍यांबरोबर उभा असलेला दवेग एदोमी म्हणाला, “मी नोब येथे इशायच्या पुत्राला अहीतूब याचा पुत्र अहीमेलेख याच्याकडे येताना पाहिले.

  3. तेव्हा राजाने दवेगला आज्ञा केली, “तू मागे वळ आणि याजकांना मारून टाक.” तेव्हा एदोमी दोएग फिरला आणि त्यांना मारून टाकले. त्या दिवशी तागाचे एफोद वस्त्र घातलेल्या पंचाऐंशी पुरुषांना त्याने मारून टाकले.

  4. तेव्हा दावीद अबीयाथारला म्हणाला, “त्या दिवशी, एदोमी दवेग तिथे होता, मला माहीत होते की, तो नक्कीच शौलाला सांगेल. तुझ्या सर्व घराण्याच्या मृत्यूस मी जबाबदार आहे.

  5. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे मासकील. हा त्यावेळचा संदर्भ आहे, ज्यावेळी एदोमी दवेगने शौलाला कळविले की दावीद अहीमेलेखच्या घरी आहे. हे बलवान पुरुषा, दुष्ट कृत्यांची बढाई का मारतोस, तू दिवसभर कशाचा अभिमान बाळगतोस, तू जो परमेश्वराच्या दृष्टीने निंदनीय आहेस?