Ahitub बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
त्यापैकी एक एफोद घातलेला अहीयाह होता. तो शिलोहमध्ये जो याहवेहचा याजक होता त्या एलीचा पुत्र फिनहास, याचा पुत्र ईखाबोद, याचा भाऊ अहीतूब याचा पुत्र होता. योनाथान गेला आहे, हे कोणालाही माहीत नव्हते.
परंतु शौलाच्या अधिकार्यांबरोबर उभा असलेला दवेग एदोमी म्हणाला, “मी नोब येथे इशायच्या पुत्राला अहीतूब याचा पुत्र अहीमेलेख याच्याकडे येताना पाहिले.
तेव्हा राजाने अहीतूबचा पुत्र अहीमेलेख याजक आणि त्याच्या कुटुंबातील सर्व पुरुष, जे नोब येथे याजक होते यांना बोलाविणे पाठविले आणि ते सर्व राजाकडे आले.
शौल म्हणाला, “अहीतूबच्या पुत्रा, ऐक.” तो उत्तरला, “होय, माझ्या धन्या.”
परंतु अहीतूबचा पुत्र अहीमेलेख याचा एक पुत्र अबीयाथार निसटून दावीदाकडे पळून गेला.
अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख हे याजक होते; आणि सेरायाह हा चिटणीस होता;
अहीतूबास सादोक, सादोकास अहीमाज,
अजर्याहास अमर्याह, अमर्याहास अहीतूब झाला,
अहीतूबास सादोक, सादोकास शल्लूम,
अजर्याह जो हिल्कियाहचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो सादोकाचा पुत्र, जो मरायोथाचा पुत्र व जो अहीतूबचा पुत्र, हा परमेश्वराच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी होता;
अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख याजक; शावेशा राजाचा चिटणीस होता.
आणि सादोकच्या घराण्यातील अजर्याह या मुख्य याजकाने उत्तर दिले, “लोकांनी याहवेहच्या मंदिरात त्यांची वर्गणी आणण्यास सुरुवात केली, तेव्हापासून आपल्याकडे खाण्यास पुरेसे आणि भरपूर असे उरले आहे, कारण याहवेहनी त्यांच्या लोकांना आशीर्वाद दिला आहे आणि हा मोठा भाग उरला आहे.”
सेरायाह, हा हिल्कियाहचा पुत्र, तो मशुल्लामाचा पुत्र, तो सादोकाचा पुत्र, तो मरायोथाचा पुत्र, जो अहीतूबाचा पुत्र होता. अहीतूब हा परमेश्वराच्या भवनाचा अधिकृत अधिकारी होता.