Nob बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
दावीद नोब येथे अहीमेलेख याजकाकडे गेला. अहीमेलेख भीतीने कापत दावीदाला भेटला आणि विचारले, “तू एकटाच का आहेस? तुझ्याबरोबर कोणीच का नाही?”
दावीदाने अहीमेलेख याजकाला उत्तर दिले, “राजाने मला एका कामगिरीवर पाठवले आहे आणि मला सांगितले, ‘ज्या कामगिरीवर मी तुला पाठवित आहे त्याबद्दल कोणालाही माहीत होऊ नये.’ आणि माझ्या माणसांनी मला मी एका ठराविक ठिकाणी भेटावे असे मी त्यांना सांगितले आहे.
तर आता, तुझ्याजवळ काय आहे? मला पाच भाकरी दे किंवा तुझ्याजवळ जे काही असेल ते दे.”
परंतु याजकाने दावीदाला उत्तर दिले, “माझ्याजवळ कोणती साधारण भाकर नाही, तरीही काही पवित्र भाकर येथे आहे, जी माणसे तुझ्याबरोबर आहेत ती मात्र स्त्रियांपासून दूर राहिली पाहिजेत.”
दावीदाने याजकाला उत्तर दिले, “नक्कीच, नेहमीप्रमाणे मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा स्त्रियांना आमच्यापासून दूर ठेवतो. कामगिरी पवित्र नसताना सुद्धा माणसांची शरीरे पवित्र असतात. तर आज किती अधिक पवित्र असतील!”
तेव्हा याजकाने त्याला समर्पित समक्षतेची भाकर दिली, कारण समर्पित भाकरीशिवाय दुसरी भाकर तिथे नव्हती. जेव्हा ताजी भाकरी याहवेहच्या समक्षतेत ठेवली जात असे तेव्हा शिळी भाकर काढून टाकली जात असे.
त्या दिवशी शौलाचा एक सेवक तिथे होता, ज्याला याहवेहसमोर थांबवून ठेवले गेले होते; तो शौलाचा मुख्य मेंढपाळ दवेग, एदोमी प्रांतातील होता.
दावीदाने अहीमेलेखास विचारले, “येथे तुझ्याकडे एखादा भाला किंवा तलवार आहे काय? कारण राजाची कामगिरी इतकी तातडीची होती, मी माझी तलवार किंवा दुसरे कोणतेही शस्त्र आणलेले नाही.”
याजकाने उत्तर दिले, “ज्या पलिष्टी गल्याथाला तू एलाहच्या खोर्यात ठार मारलेस त्याची तलवार येथे आहे; ती कापडात गुंडाळून एफोदाच्या मागे ठेवलेली आहे. तुला पाहिजे तर ती तू घे; त्या शिवाय दुसरी तलवार येथे नाही.” दावीद म्हणाला, “तिच्यासारखी दुसरी तलवार नाही; ती मला दे.”
परंतु शौलाच्या अधिकार्यांबरोबर उभा असलेला दवेग एदोमी म्हणाला, “मी नोब येथे इशायच्या पुत्राला अहीतूब याचा पुत्र अहीमेलेख याच्याकडे येताना पाहिले.
अहीमेलेखने त्याच्यासाठी याहवेहकडे चौकशी केली; त्याने त्याला काही अन्नसामुग्री व पलिष्टी गल्याथाची तलवार सुद्धा दिली.”
तेव्हा राजाने अहीतूबचा पुत्र अहीमेलेख याजक आणि त्याच्या कुटुंबातील सर्व पुरुष, जे नोब येथे याजक होते यांना बोलाविणे पाठविले आणि ते सर्व राजाकडे आले.
त्याने याजकांचे शहर नोब, यातील पुरुष आणि स्त्रिया, लेकरे आणि तान्ही बालके, आणि तेथील गुरे, गाढवे आणि मेंढरे सुद्धा तलवारीने मारून टाकले.
माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले, परंतु याहवेह माझे आधार होते.
बिन्यामीन वंशातील लोक खालील ठिकाणी राहत होते: गेबा, मिकमाश, अय्याह, बेथेल, आणि त्यांच्या सभोवतालची गावे,
अनाथोथ, नोब, अनन्याह,
आज ते नोब येथे थांबतील; सीयोन कन्येच्या डोंगराकडे, यरुशलेमच्या टेकडीकडे ते त्यांच्या मुठी वळवतील.