- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
The Rich बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
त्यांच्या संवेदनशून्य अंतःकरणातून अपराधच निघतात; त्यांच्या मनातील दुष्ट कल्पनांना मर्यादा नाही.
ते उपहास करतात आणि वाईट गोष्टी बोलतात; गर्विष्ठपणामुळे ते दडपशाहीची धमकी देतात.
ते प्रत्यक्ष स्वर्गावर दावा करतात आणि त्यांची जीभ पृथ्वीवर फुशारक्या मारीत फिरते.
म्हणून त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात, आणि ते विपुल प्रमाणात पाणी पितात.
ते असेही म्हणतात, “परमेश्वराला कसे समजणार? परात्पर परमेश्वराला सर्व गोष्टीचे ज्ञान आहे काय?”
असे असतात दुष्ट लोक—नेहमी निश्चिंत; आणि त्यांची संपत्ती वाढतच जाते.
माझे हृदय शुद्ध ठेऊन मला काय लाभ झाला आणि मी माझे हात व्यर्थच निर्दोष ठेवले.
दिवसभर मी छळ सहन करीत आहे आणि दररोज सकाळी नवीन शिक्षा दिली जात आहे.
जर हे उद्गार माझ्या मुखातून बाहेर पडले असते, तर मी तुमच्या प्रजेचा विश्वासघात करणारा ठरलो असतो.
ही गोष्ट समजण्यासाठी मी विचार करू लागलो, तेव्हा त्याचे आकलन मला अत्यंत कठीण वाटू लागले.
मग शेवटी मी परमेश्वराच्या पवित्रस्थानात गेलो, तेव्हा दुष्टांचा शेवट काय होतो हे मला कळून आले.
निश्चित तुम्ही त्यांना निसरड्या भूमीवर ठेवले आहे; तुम्ही त्यांना सर्वनाशाकडे खाली लोटून द्याल.
क्षणार्धात त्यांच्या नाश होईल, भयानकता त्यांच्या वाट्याला येईल.
जसे जागे होणाऱ्या मनुष्याला स्वप्न पडते; त्याचप्रमाणे हे प्रभू, तुम्ही जागे व्हाल तेव्हा त्यांचे दुस्वप्न तुच्छ जाणाल.
जेव्हा माझे हृदय दुःखित झाले आणि माझा आत्मा कटुतेने भरून गेला होता,
त्यावेळस मी मूर्ख आणि अज्ञानी होतो; मी तुमच्यापुढे जनावरासारखा होतो!
गरिबांना त्यांचे शेजारीसुद्धा टाळतात, परंतु श्रीमंतांना मात्र खूप मित्र असतात.
धनवानाचे धन त्यांचे तटबंदीचे नगर आहे; ते कल्पना करतात की त्या उंच भिंती चढण्यास दुष्कर आहेत.
गरीब दयेसाठी विनवण्या करतो आणि श्रीमंत त्याला क्रूरतेने उत्तर देतो.
श्रीमंत माणसे त्यांच्या दृष्टीने स्वतःला शहाणे समजतात; परंतु जो गरीब आणि विवेकी आहे तो पाहतो की श्रीमंत कसे भ्रमात पडलेले आहेत.
सूर्याखाली मी एक भयंकर गोष्ट पाहिली: जसे मालकाची हानी होण्यासाठी साठविलेली संपत्ती,
किंवा काही दुर्दैवी व्यवहारामध्ये तो सर्व पैसा गमावून बसतो आणि शेवटी मुलाबाळांकडे वारसाहक्काने मिळण्यास काहीही शिल्लक नसते.
आणि याशिवाय परमेश्वराने जर कोणा मनुष्याला संपत्ती आणि तिचा उपभोग घेण्यासाठी आरोग्य दिले असेल, तर त्यांनी त्या परिश्रमात आनंद करावा—हे त्यांना परमेश्वराचे दान आहे. आनंदाने काम करणे व जीवनात जे वाट्याला येईल त्यात समाधान मानणे, ही खरोखर परमेश्वराची देणगी आहे.
असे करणार्याला आपल्या भूतकाळाचे मनन करावे लागत नाही, कारण परमेश्वर त्याचे अंतःकरण आनंदाने भरून ठेवतो.
“मी तुम्हाला का क्षमा करू? तुमच्या मुलांनी माझा त्याग केला आहे आणि जे देव नाहीत त्यांची ते शपथ घेऊ लागले आहेत. मी त्यांच्या सर्व गरजांचा पुरवठा केला, तरी त्यांनी व्यभिचार केला वेश्यागृहात गर्दी केली.