मुख्य मजकुरावर जा

The Punishment of the Wicked बद्दल बायबलमधील वचने

157 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु स्वतः परमेश्वरच त्यांचा बाण मारतील; अचानक ते घायाळ होतील.

  2. कारण दुष्टांची समृद्धी पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो होतो.

  3. होय, आयुष्यभर त्यांचा मार्ग पीडारहित असतो; ते निरोगी आणि सुदृढ असतात.

  4. इतर मनुष्यांसारखी त्यांच्यावर सहसा संकटे येत नाहीत आणि इतरांप्रमाणे आजाराने पीडलेही जात नाहीत.

  5. अहंकार त्यांच्या गळ्यातील माळ; हिंसा त्यांची वस्त्रे आहेत.

  6. त्यांच्या संवेदनशून्य अंतःकरणातून अपराधच निघतात; त्यांच्या मनातील दुष्ट कल्पनांना मर्यादा नाही.

  7. ते उपहास करतात आणि वाईट गोष्टी बोलतात; गर्विष्ठपणामुळे ते दडपशाहीची धमकी देतात.

  8. ते प्रत्यक्ष स्वर्गावर दावा करतात आणि त्यांची जीभ पृथ्वीवर फुशारक्या मारीत फिरते.

  9. म्हणून त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात, आणि ते विपुल प्रमाणात पाणी पितात.

  10. ते असेही म्हणतात, “परमेश्वराला कसे समजणार? परात्पर परमेश्वराला सर्व गोष्टीचे ज्ञान आहे काय?”

  11. असे असतात दुष्ट लोक—नेहमी निश्चिंत; आणि त्यांची संपत्ती वाढतच जाते.

  12. माझे हृदय शुद्ध ठेऊन मला काय लाभ झाला आणि मी माझे हात व्यर्थच निर्दोष ठेवले.

  13. दिवसभर मी छळ सहन करीत आहे आणि दररोज सकाळी नवीन शिक्षा दिली जात आहे.

  14. जर हे उद्गार माझ्या मुखातून बाहेर पडले असते, तर मी तुमच्या प्रजेचा विश्वासघात करणारा ठरलो असतो.

  15. ही गोष्ट समजण्यासाठी मी विचार करू लागलो, तेव्हा त्याचे आकलन मला अत्यंत कठीण वाटू लागले.

  16. मग शेवटी मी परमेश्वराच्या पवित्रस्थानात गेलो, तेव्हा दुष्टांचा शेवट काय होतो हे मला कळून आले.

  17. निश्चित तुम्ही त्यांना निसरड्या भूमीवर ठेवले आहे; तुम्ही त्यांना सर्वनाशाकडे खाली लोटून द्याल.

  18. क्षणार्धात त्यांच्या नाश होईल, भयानकता त्यांच्या वाट्याला येईल.

  19. त्यांनी आपल्या क्रोधास मोकळी वाट करून दिली; त्यांनी त्यांचे जीव मृत्यूपासून वाचविले नाहीत, तर त्यांना पीडेच्या हवाली केले.

  20. तू केवळ आपल्या दृष्टीने निरीक्षण करशील, आणि दुष्टांना केलेली शिक्षा बघशील.

  21. दुष्ट लोक गवताप्रमाणे जरी भराभर उगवतात व त्यांची भरभराट होते, तरी त्यांच्यापुढे केवळ अनंतकालचा नाशच आहे.

  22. तेच त्यांच्या दुष्टतेचा सूड घेतील, आणि त्यांच्या दुष्टतेबद्दल त्यांचा नाश करतील; याहवेह आमचे परमेश्वर त्यांचा नायनाट करतील.

  23. आणि दुष्टांना त्यांच्या पातकाबद्दल शासन करण्यासाठी, त्यांच्या चांगल्या भूमीचे ते क्षारभूमीत रूपांतर करतात.

  24. याची खात्री असू दे: दुष्टाला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, परंतु जे नीतिमान आहेत त्यांची सुटका होईल.

  25. जर नीतिमान लोकांना पृथ्वीवरच प्रतिफळ मिळते, तर मग अनीतिमान व पापी लोकांना किती मोठ्या प्रमाणात मिळेल!