मुख्य मजकुरावर जा

The Punishment of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: Death

7 वचने · 57 पैलू

Death बद्दल वचने

  1. एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण जगात आले; सर्व लोकांमध्ये मरण पसरले, कारण सर्वांनी पाप केले आहे.

  2. नियमशास्त्र देण्यापूर्वी पाप जगात होतेच; पण नियमशास्त्र अस्तित्वात नसल्यामुळे, कोणालाही पापाबद्दल दोषी ठरविता येत नव्हते.

  3. आदामापासून मोशेपर्यंत मृत्यूचे राज्य होते, कारण आदामासारखा आज्ञेचा भंग त्यांनी स्वतः कधीही केलेला नव्हता. आदाम, जो येणार होता त्याचे प्रतिरूप होता.

  4. तरी देणगी ही आज्ञाभंगासारखी नाही. कारण या एका मनुष्याने, म्हणजे आदामाने, आपल्या पापांमुळे अनेक मानवांवर मृत्यू आणला. परंतु परमेश्वराची कृपा व देणगी एका मनुष्याद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे अनेकांना प्राप्त झाली.

  5. परमेश्वराचे वरदान एका मनुष्याने केलेल्या पापाच्या परिणामासारखे नाही आणि एकाच्या पापामुळे न्याय दंड मिळाला, परंतु वरदान अनेक अपराधानंतर आले आणि आपल्याला नीतिमान गणण्यात आले.

  6. कारण जर एका मनुष्याच्या अपराधामुळे, त्याच मनुष्याच्या द्वारे मरणाने राज्य केले, तर ज्यांना कृपेची व नीतिमत्वाची विपुल दाने मिळाली आहेत, ते येशू ख्रिस्त जे एक मानव आहेत, त्यांच्याद्वारे जीवनात किती विशेषकरून राज्य करतील!

  7. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण परमेश्वराचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.