The Punishment of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: Persecuting
Persecuting बद्दल वचने
म्हणून अनाथोथच्या लोकांविषयी, जे माझा जीव घेण्याची धमकी देतात, ते म्हणतात “याहवेहच्या नावाने भविष्यवाणी करू नको, नाहीतर आमच्या हातून तुझा जीव जाईल;”
म्हणून सर्वसमर्थ याहवेहने मला असे उत्तर दिले: “मी त्यांना शिक्षा देईन. त्यांचे पुरुष तलवारीस बळी जातील, त्यांचे पुत्र व कन्या उपासमारीने मरतील.
यास्तव मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी आणि शिक्षक पाठवित आहे. काहींचा तुम्ही वध कराल आणि क्रूसावर द्याल; काहींना सभागृहात फटके माराल आणि नगरोनगरी त्यांच्या पाठीस लागाल.
नीतिमान हाबेलाच्या रक्तापासून मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये ज्याचा वध तुम्ही केला तो बरख्याचा पुत्र जखर्याहच्या रक्तापर्यंत, जे सर्व नीतिमान रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले त्याचा दोष तुम्हावर येईल.
मी तुम्हाला सत्य सांगतो की, तो याच पिढीवर येईल.