मुख्य मजकुरावर जा

The Punishment of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: Should be a warning to others

8 वचने · 57 पैलू

Should be a warning to others बद्दल वचने

  1. ज्यावेळी पृथ्वीने आपले तोंड उघडले आणि कोरह व त्याच्या अनुयायांना गिळून टाकले व त्यांच्यातील दोनशे पन्नास पुरुषांना अग्नीने भस्म करून टाकले. ते लोकांसाठी एक चेतावणीचे चिन्ह होते.

  2. आता ज्यागोष्टी घडल्या, त्या आपल्याला उदाहरणादाखल आणि आपण त्यांच्याप्रकारे आपली हृदये वाईट गोष्टींवर केंद्रित करू नयेत म्हणून घडल्या.

  3. त्यांच्यातील काही मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. असे लिहिले आहे: “लोकांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले.”

  4. त्याचप्रमाणे त्यांच्यातील काही लोकांनी लैंगिक अनीतीला वाव दिला, तसे आपण करू नये आणि एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले.

  5. आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये, जशी त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली आणि ते सर्पदंशाद्वारे मरण पावले.

  6. आणि कुरकुर करू नका, जशी त्यांच्यापैकी काहींनी केली आणि ते नाश करणार्‍या दूताच्या हातून मरण पावले.

  7. आता या गोष्टी त्यांच्यासाठी उदाहरणादाखल झाल्या आणि ज्या आपणावर युगाचा शेवट येऊन ठेपला आहे, त्या आपल्याला इशारा म्हणून लिहून ठेवण्यात आल्या आहेत.

  8. त्याच प्रकारे सदोम आणि गमोरा आणि शेजारच्या गावांनी स्वतःच्या देहाला लैंगिक व्यभिचार आणि भ्रष्टतेमध्ये वाहवून घेतले. त्यांना अनंतकाळाच्या अग्नीची शिक्षा सहन करावी म्हणून उदाहरणादाखल पुढे ठेवले आहे.