मुख्य मजकुरावर जा

The Punishment of the Wicked बद्दल बायबलमधील वचने

157 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे लोक कोरड्या झर्‍यांसारखे, वादळाने उडविलेल्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यासाठी काळाकुट्ट अंधार राखलेला आहे.

  2. त्याच प्रकारे सदोम आणि गमोरा आणि शेजारच्या गावांनी स्वतःच्या देहाला लैंगिक व्यभिचार आणि भ्रष्टतेमध्ये वाहवून घेतले. त्यांना अनंतकाळाच्या अग्नीची शिक्षा सहन करावी म्हणून उदाहरणादाखल पुढे ठेवले आहे.

  3. ते समुद्राच्या लज्जास्पद फेस आणणार्‍या बेबंद लाटेसारखे; भटकलेल्या तार्‍यांसारखे, ज्यांच्यासाठी सर्वकाळचा काळाकुट्ट अंधार राखून ठेवलेला आहे.

  4. ज्याला ऐकावयास कान आहेत तो आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको, जो विजय मिळवितो त्याला दुसर्‍या मरणाची बाधा होणारच नाही.

  5. त्या प्रत्येकाला परमेश्वराच्या क्रोधाचा द्राक्षमद्याचा प्याला, त्याची तीव्रता कमी न करता प्यावा लागेल. पवित्र देवदूत व कोकरा यांच्यासमक्ष या सर्वांचा जळत्या गंधकाने छळ करण्यात येईल.

  6. त्यांच्या छळाचा धूर युगानुयुग वर चढत राहील आणि त्यातून त्यांची रात्री किंवा दिवसा कधीच सुटका होत नाही. कारण त्यांनी त्या पहिल्या पशूला व त्याच्या मूर्तीला नमन केले, आणि त्याच्या नावाची सांकेतिक खूण गोंदून घेतली.

  7. परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड—अशा माणसांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.”