मुख्य मजकुरावर जा

The Ox बद्दल बायबलमधील वचने

111 वचने · 73 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनेक बैलांनी मला घेरले; बाशानातील दांडग्या बैलांनी मला घेरलेले आहे.

  2. मी तुमच्या गोठ्यातील बैल आणि मेंढवाड्यातील बोकड यज्ञपशू म्हणून घेणार नाही.

  3. हे परमेश्वरा, लव्हाळ्यात राहणार्‍या वनपशूंना, बैलांचा कळप आणि त्यांच्यासोबत त्यांच्या वासरांना धमकावा; खंडणीची तीव्र इच्छा बाळगणार्‍यांना पायाखाली तुडवा, आणि युद्धात आनंद मानणार्‍या राष्ट्रांची दाणादाण करा.

  4. यामुळे याहवेहला, बैलाच्या किंवा शिंगे आणि खुरे असलेल्या गोर्‍ह्याच्या यज्ञार्पणापेक्षा, अधिक आनंद होईल.

  5. परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल गवत खाणार्‍या बैलाच्या प्रतिमेशी केली.

  6. आमची सशक्त गुरे अवजड वाहने वाहतील. आमच्या तटबंदीला भगदाडे पडणार नाहीत, आम्ही पारतंत्र्यात जाणार नाही, आमच्या रस्त्यावर दुःखाच्या आरोळ्या ऐकू येणार नाहीत.

  7. जसा बैल कापणार्‍याकडे जातो, तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला, हरिण जसे दोर्‍यांच्या फासात पाय टाकते

  8. तिने तिच्याकडील मांसाहारी भोजन आणि तिचा द्राक्षारस तयार केला आहे; तिने तिचा मेजसुद्धा सजविलेला आहे.

  9. जिथे कुठे बैल नाहीत तेथील गोठा रिकामा राहतो, परंतु बैलाच्या शक्तीने विपुल धान्याचा उपज होतो.

  10. तिरस्काराने वाढलेल्या पुष्ट वासराच्या मेजवानीपेक्षा प्रीतीने वाढलेले थोडेसे शाकाहारी जेवण बरे.

  11. आपल्या कळपाच्या स्थितीची योग्य जाणीव ठेवा, तुमच्या पशूंकडे काळजीपूर्वक लक्ष द्या;

  12. बैल त्याच्या मालकाला ओळखतो, गाढव त्याच्या मालकाचा गोठा ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, माझ्या लोकांना समजत नाही.”

  13. एकेकाळी सर्व टेकड्या कुदळाने मशागत केल्या जात होत्या, तिथे आता तुम्ही काटेरी झुडपे आणि कुसळांच्या भीतीने कधीही जाणार नाही; जिथे गुरे मोकाट फिरतात आणि मेंढरे पळतात अशी ती ठिकाणे होतील.

  14. गाई अस्वलाबरोबर चरतील, त्यांची पिल्ले एकत्र झोपतील, आणि सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल.

  15. माझे मन मोआबसाठी रडते; तिचे पलायन केलेले लोक सोअरपर्यंत, एग्लाथ-शलीशियापर्यंत पळतात. ते लुहिथकडे टेकडीवर जातात, जाताना ते विलाप करतात; होरोनाईमच्या वाटेवर ते त्यांच्या नाशासाठी विलाप करतात.

  16. शेतात मशागतीचे काम करणारे बैल आणि गाढवे हे काटे आणि फावड्याने उफणलेला चारा आणि उकडलेले बटाटे खातील.

  17. तरी तुम्ही किती आशीर्वादित व्हाल, प्रत्येक झऱ्याजवळ तुमचे बीज पेराल, आणि तुमची गुरे आणि गाढवे मुक्तपणे चरतील.

  18. कारण तुझी लेकरे ग्लानी येऊन, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात पडली आहेत, हरिणाप्रमाणे ते जाळ्यात अडकलेले आहेत. याहवेहच्या क्रोधाने आणि तुमच्या परमेश्वराच्या धमकीने भरले आहेत.

  19. माझा शोध करणाऱ्या माझ्या लोकांसाठी शारोन त्यांच्या कळपांची कुरणे बनतील, आणि अखोरचे खोरे गुरांचे विश्रांतिस्थान होईल.

  20. कत्तलखान्याकडे चालविलेल्या अज्ञान कोकरासारखा मी भोळाभाबडा होतो; मलाच ठार मारण्याचा त्यांचा बेत होता याची मला जाणीवही नव्हती, ते म्हणाले, “झाडाचा त्याच्या फळांसहित नाश करू या; याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू या, म्हणजे याची नावनिशाणीही राहणार नाही.”

  21. “मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले: ‘तुम्ही मला अनावर वासराला लावावी तशी शिस्त लावली आहे, आणि मी ही शिस्त ग्रहण केली आहे. मला पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत आणा, म्हणजे मी पूर्ववत होईन, कारण तुम्ही याहवेह, माझे परमेश्वर आहात.

  22. “इजिप्त ही सुंदर कालवड आहे; परंतु उत्तरेकडून तिच्याविरुद्ध गांधीलमाशी येत आहे.

  23. तिच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक एखाद्या धष्टपुष्ट वासरांसारखे झाले आहेत. तेही वळून एकत्र पलायन करतील, ते भूमीवर टिकाव धरू शकणार नाही, कारण त्यांच्यावरील संकटाचा दिवस जवळ येत आहे, त्यांना शिक्षा मिळण्याचा हा समय आहे.

  24. “त्यांच्या आक्रोशाचा ध्वनी उंचाविला जात आहे हेशबोनपासून एलिआलेह आणि याहसापर्यंत, सोअरापासून होरोनाईम आणि एग्लाथ-शलीशियापर्यंत तो ऐकू येत आहे, निम्रीमाची कुरणेही आता शुष्क झाली आहेत.

  25. “तुम्ही जे माझे वतन लुटता, तुम्ही आनंद व उल्हास करतात, तुम्ही धान्य मळणार्‍या कालवडीप्रमाणे बागडता आणि घोड्यांसारखे खिंकाळत असाल,