- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
The Ox बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
पण आपला बैल मारका आहे हे त्या बैलाच्या मालकाला माहिती असूनही, त्याने त्या बैलाला बांधले नाही, तर त्याच्या धन्याने जनावराबद्दल भरपाई करावी व मेलेले जनावर घ्यावे.
त्याने चोरलेले बैल, गाढव किंवा मेंढरू त्याच्याजवळ जिवंत सापडले; तर त्याने त्याची दुपटीने भरपाई करावी.
एखादे बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र किंवा एखादी हरवलेली वस्तू असे काहीही असो, ज्याबद्दल कोणी कलहाने बेकायदेशीरपणे म्हणतो की, ‘हे माझे आहे,’ तर त्या दोघांचाही वाद न्यायाधीशासमोर आणावा. ज्या कोणाला न्यायाधीश दोषी ठरवेल त्याने दुसर्याला दुपटीने परत करावे.
“जर कोणी आपले गाढव, बैल, मेंढरू किंवा कोणतेही जनावर आपल्या शेजार्याकडे सुरक्षित राहावे म्हणून ठेवले आणि ते मेले किंवा त्याला काही इजा झाली किंवा त्याच्यावर नजर नसताना त्याला कोणी घेऊन गेले,
तर शेजार्याने दुसर्याच्या जनावरावर हात टाकला नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याने याहवेहसमोर शपथ घ्यावी. मालकाला यावर विश्वास ठेवावा लागणार आणि त्यासाठी कोणतीही रक्कम भरून द्यायची गरज नाही.
पण ते जनावर जर शेजार्याकडून चोरीला गेले, तर त्याने मालकाला भरपाई करून द्यावे.
जर एखाद्या जंगली श्वापदाने ते जनावर फाडून टाकले, तर त्या शेजार्याने त्या जनावराचे पार्श्वशरीर पुरावा म्हणून समोर आणावे आणि त्या फाडलेल्या जनावराची फेड करून देऊ नये.
“तुमच्या वैर्याचा बैल किंवा गाढव भटकलेला असा तुमच्या नजरेस पडला, तर ते तुम्ही अवश्य माघारी आणून परत करावे.
“सहा दिवस आपले काम करावे, पण सातव्या दिवशी काम करू नये, अशासाठी की तुमच्या बैलांना व गाढवांना विसावा मिळावा, तसेच तुमच्या घरात जन्मलेले गुलाम आणि तुमच्यामध्ये राहणारा परदेशी सुद्धा ताजेतवाने होऊ शकेल.
“प्रत्येक उदरातील प्रथम जन्मलेला, तुमच्या गुरातील सर्व प्रथम जन्मलेले नर, मग ते खिल्लारातील असो किंवा मेंढरांतील असो माझे आहेत.
“इस्राएली लोकांस सांग: तुम्ही बैलांची, मेंढरांची किंवा शेळ्यांची चरबी खाऊ नये.
त्यांनी याहवेहपुढे भेटी म्हणून आणले ते हे—आच्छादन असलेल्या सहा गाड्या व बारा बैल; प्रत्येक पुढार्यामागे एक बैल आणि दोन पुढार्यांमागे एक गाडी. हे सर्व त्यांनी निवासमंडपासमोर सादर केले.
गाईचे, मेंढीचे व शेळीचे प्रथमवत्स यांची तू खंडणी भरू नये; ते पवित्र आहे. त्यांचे रक्त वेदीवर शिंपडावे आणि त्यांची चरबी अन्नार्पण म्हणून जाळावी. हा याहवेहला संतोषविणारा सुगंध आहे.
“याहवेहने आज्ञापिलेल्या कराराचा हा एक नियम आहे: इस्राएली लोकांस सांग की, जी अव्यंग किंवा निर्दोष आणि जिच्यावर कधीही जू घातले नाही अशी तांबड्या रंगाची कालवड त्यांनी तुमच्याकडे आणावी.
मोआबी लोकांनी मिद्यान्यांच्या वडील लोकांना म्हटले, “जसा बैल शेतातील गवत चाटून फस्त करतो, त्याप्रमाणे हा मोठा जमाव आमच्या सभोवती असलेले सर्वकाही चाटून घेईल.” तेव्हा सिप्पोरचा पुत्र बालाक, जो त्यावेळी मोआबाचा राजा होता,
हा प्रांत जो याहवेहने इस्राएली लोकांपुढे कब्जा केला आहे, तो गुरांसाठी उत्तम आहे आणि तुझ्या सेवकांजवळ गुरे आहेत.”
परंतु सातवा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वराचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये. तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे बैल, गाढव, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी, तुमचा दास आणि दासी यांनी देखील तुमच्यासह त्या दिवशी विश्रांती घ्यावी.
तुमच्या शेजार्याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका. त्याच्या घराचा किंवा भूमीचा, त्याच्या दासाचा किंवा दासीचा, त्याच्या बैलाचा किंवा गाढवाचा किंवा शेजार्याच्या मालकीच्या कशाचाही लोभ करू नका.”
ते तुम्हावर प्रीती करतील, तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्हाला बहुगुणित करतील. तुमच्या पूर्वजांना देऊ केलेल्या वचनदत्त देशात ते तुमच्या पोटच्या फळाला, तुमच्या जमिनीतील पीक—तुमच्या धान्याला, नव्या द्राक्षारसाला, जैतुनाच्या तेलाला—तुमच्या गुरांची वासरे आणि तुमच्या कळपातील कोकरे यांनाही ते आशीर्वाद देतील.
तुम्ही हे प्राणी खाऊ शकता: बैल, मेंढरे व शेरडे,
सांबर, हरिण, भेकर, रानबोकड, रोही, गवा व डोंगरी मेंढा.
आपल्यापैकी एखाद्या इस्राएली मनुष्याचा बैल अथवा मेंढरू दूरवर भटकलेला तुम्ही पाहिला, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये; त्याला त्याच्या मालकाकडे घेऊन जावे.
जर मालक तुमच्याजवळ राहत नसतील किंवा तो कोण आहे हे तुम्हाला ठाऊक नसेल, तर तो तुम्ही तुमच्या घरी न्यावा व त्याचा मालक त्याला शोधीत तिथे येईपर्यंत त्याला ठेवावे. मग त्याच्या मालकाला तो परत करावा.
जर तुमच्या इस्राएली बांधवाचे गाढव किंवा बैल मार्गात घसरून पडलेले दिसले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याला आपल्या पायांवर उभे करण्यास त्याच्या मालकाला मदत करावी.
एकाच नांगराला बैल व गाढव यांना एकत्र जुंपून नांगरणी करू नये.