मुख्य मजकुरावर जा

The Ox बद्दल बायबलमधील वचने

111 वचने · 73 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्हाला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तुम्ही वन्यप्राण्यांबरोबर राहाल; तुम्ही बैलाप्रमाणे गवत खाल आणि आकाशाच्या दवाने भिजून जाल. सात कालखंड संपेपर्यंत तुम्ही या स्थितीत राहाल आणि मग तुमचा असा विश्वास असेल की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला ही राज्ये देतात.

  2. जशी कालवड हट्टी असते, तसे इस्राएली लोक हट्टी आहेत. मग जशी कोकरे कुरणात चरतात, त्याप्रमाणे याहवेह त्यांना कुरणात कसे नेतील?

  3. एफ्राईम शिकविलेली कालवड आहे. तिला मळणी करण्याची आवड आहे; म्हणून मी तिच्या नाजूक मानेवर जू ठेवेन. मी एफ्राईमला नांगराला जुंपेन, यहूदाहला नांगरणी करणे व याकोबाला माती फोडणे आवश्यक आहे.

  4. शोमरोनच्या डोंगरावर राहणार्‍या बाशानच्या गाईंनो हे वचन ऐका, तुम्ही स्त्रिया, ज्या तुम्ही गरिबांवर अत्याचार करता आणि गरजवंतांना चिरडता आणि आपल्या नवर्‍यांना म्हणता, “आम्हाला काही पेय आणा!”

  5. तुम्ही हस्तिदंतांनी सजविलेल्या पलंगावर लोळता; आणि तुम्ही अंथरुणावर पडून राहतात. उत्तम कोकरे आणि चरबीयुक्त वासरे खाता.

  6. घोडे खडकाळ कडांवर पळतात काय? बैल घेऊन कोणी समुद्र नांगरतो काय? पण तुम्ही न्यायाला विषामध्ये आणि नीतिमत्तेच्या फळाला कडवटपणामध्ये बदलले आहे;

  7. अंजिरांची झाडे ना बहरली आणि द्राक्षलतांवर फळे राहिली नाहीत, जैतुनाचे सर्व पीक बुडाले आणि शेते नापीक झाली, जरी मेंढवाड्यात मेंढरे राहिली नाहीत, गोठ्यात गुरे नाहीत,

  8. “तेव्हा त्याने आणखी काही दास पाठविले, ‘ज्यांना आमंत्रित केले आहे त्यांना सांगा की मी मेजवानी तयार केली आहे, माझे बैल आणि पुष्ट गुरे कापली आहेत आणि सर्वकाही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या.’

  9. “दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, मी त्यांची तपासणी करावयास जातो, म्हणून क्षमा असावी.’

  10. कारण मोशेने नियमशास्त्रात लिहिले आहे: “बैल धान्याची मळणी करीत असताना त्याच्या तोंडाला मुसके बांधू नको.” आता परमेश्वराला बैलाची काळजी आहे एवढाच त्याचा अर्थ आहे काय?

  11. हे खात्रीने त्यांनी आपल्यासाठी म्हटले नाही का? होय, हे आमच्यासाठी लिहिण्यात आले आहे, कारण जो कोणी नांगरतो आणि मळणी करतो, त्यांनी हंगामाच्या पिकात वाटा मिळेल या आशेने करावी.