Skip to content

Repentance बद्दल बायबलमधील वचने

343 वचने · 65 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण ते आपले परमेश्वर आहेत. आपण त्यांच्या कुरणातील प्रजा आणि त्यांचा संरक्षित मेंढरांचा कळप आहोत. आज जर तुम्ही त्यांची वाणी ऐकली, तर किती बरे!

  2. “मरीबाह येथे असताना केली तशी, जसे मस्सा च्या दिवशी तुम्ही रानामध्ये केले तसे, तुमची अंतःकरणे कठीण करू नका.

  3. त्यांच्याकरिता त्यांनी आपल्या कराराचे स्मरण केले, आणि त्यांच्या महान प्रीतीमुळे त्यांचे अंतःकरण द्रवले.

  4. याहवेहने जी शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहेस.”

  5. कारण याहवेह आपल्या लोकांना निर्दोष प्रमाणित करतील, आणि आपल्या सेवकांवर करुणा करतील.

  6. भग्नहृदयी लोकांना ते बरे करतात, आणि त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतात.

  7. “अहो भोळ्यांनो, तुमच्या भोळेपणावर तुम्ही किती दिवस प्रीती करणार? कुचेष्टा करणारे तुम्ही कुचेष्टा करण्यात किती वेळ आनंद करणार आणि मूर्खांनो, किती काळ तुम्ही ज्ञानाचा द्वेष करणार?

  8. मी केलेली कान उघाडणी लक्षात घेऊन आणि पश्चात्ताप करा! तेव्हा मी माझे विचार तुम्हाला कळवेन, तुम्हाला माझ्या शिक्षणाची माहिती करून देईन.

  9. परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले, आणि जेव्हा मी माझे हात पुढे केले, तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही.

  10. कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत,

  11. यामुळेच मी देखील तुमच्या संकटकाळी तुम्हाला हसेन; जेव्हा तुमच्यावर आपत्ती येईल तेव्हा मी चेष्टा करेन—

  12. जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल, जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल, जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील.

  13. “तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही; ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही,

  14. कारण त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला, आणि याहवेहचे भय धरणे निवडले नाही.

  15. ते माझा सल्ला स्वीकारणार नाहीत; आणि माझ्या दटावणीला झिडकारतील म्हणून,

  16. त्यांना त्यांच्या मार्गाचे प्रतिफळ मिळेल, आणि त्यांच्या वाईट कृत्यांचे पुरेपूर परिणाम मिळतील.

  17. कारण भोळ्यांचा हट्टीपणा त्यांना मारून टाकेल, आणि मूर्खांचा स्वच्छंदीपणा त्यांचा नाश करेल;

  18. परंतु जे माझे ऐकतात ते सर्वजण सुरक्षित राहतील, आणि निर्भयतेने स्वस्थ जीवन जगतील.”

  19. तुमचे साधेभोळेपण सोडून द्या म्हणजे तुम्ही जगाल; अंतर्ज्ञानाच्या मार्गाने चला.”

  20. उद्याविषयी आज बढाई मारू नका; कारण उद्या काय घडेल ते तुम्हाला ठाऊक नाही.

  21. जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही, परंतु जो अपराध कबूल करून ते करण्याचे सोडून देतो त्याला कृपा प्राप्त होते.

  22. “धुऊन तुम्ही स्वतःला स्वच्छ करा. तुमची दुष्कृत्ये माझ्या दृष्टीबाहेर करा; वाईट कृत्ये करणे थांबवा.

  23. योग्य तेच करण्यास शिका; न्यायीपणाचा शोध घ्या. पीडितांचे संरक्षण करा. पितृहीनांच्या बाजूचे समर्थन करा; विधवांची बाजू मांडा.

  24. याकोबाचा राहिलेला प्रत्येकजणही परत येईल, सर्वसमर्थ परमेश्वराकडे परत येईल.

  25. प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, रडण्यासाठी आणि आक्रोश करण्यासाठी, तुमचे केस मुंडविण्यासाठी आणि गोणपाट घालण्यासाठी, त्या दिवशी तुम्हाला बोलावतील.