Skip to content

Repentance बद्दल बायबलमधील वचने

343 वचने · 65 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आमच्या पूर्वजांपासून आजतागायत आमची अत्यंत घोर पापे झाली आहेत. आमच्या पातकांमुळेच, आम्ही, आमचे राजे, आमचे याजक, गैरयहूदी राजांच्या तलवारीने मारले गेले, आम्हाला कैद करण्यात आले, लुबाडण्यात आले व फजीत करण्यात आले. आजही आमची स्थिती अशीच आहे.

  2. “पण आता या थोड्या काळासाठी याहवेह आमच्या परमेश्वराने आमच्यावर कृपा करून आमच्यापैकी काही थोड्या लोकांना जिवंत राखले आणि त्यांच्या या पवित्रस्थानी आम्हाला स्थिर केले आहे. आमच्या परमेश्वराने आमच्या दृष्टीस प्रकाश दिला व आम्हाला गुलामगिरीतून थोडी विश्रांती दिली आहे.

  3. आम्ही गुलाम आहोत, पण आमच्या परमेश्वराने आम्हाला गुलामगिरीतही सोडून दिले नाही. त्याऐवजी पर्शियाच्या राजाच्या नजरेत आम्हाला अशी कृपा दिली आहे: आमच्या परमेश्वराच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी आम्हाला नवीन जीवन दिले आहे. आम्हाला यहूदीया आणि यरुशलेम येथे संरक्षणासाठी तटबंदी दिली आहे.

  4. “पण हे आमच्या परमेश्वरा, आता आम्ही तुमच्यापुढे काय बोलावे? कारण आम्ही तुमचे नियम मोडले आहेत.

  5. तुमचे सेवक संदेष्टे, त्यांनी आम्हाला आधीच इशारा देऊन ठेवला होता: ‘जो देश आम्हाला वतन म्हणून मिळेल, तो देश तिथे राहणार्‍या लोकांच्या भयंकर अमंगळ चाली व कृत्ये यांनी भ्रष्ट झालेला असेल. खरोखरच आज देशाच्या या टोकापासून तर त्या टोकापर्यत तो अपवित्रतेने भरलेला आहे.

  6. म्हणून आपल्या कन्या या राष्ट्रांच्या पुरुषांना देऊ नयेत आणि त्यांच्या कन्या तुमच्या पुत्रांना करून घेऊ नयेत. त्या राष्ट्रांशी कोणत्याही प्रकारे मैत्रीचा समेट करू नये. तरच तुम्ही सुदृढ होऊन तुम्हाला त्या भूमीचे उत्तम फळ लाभेल व ती समृद्धी आमच्या मुलाबाळांस सदासर्वकाळचे वतन म्हणून लाभेल.’

  7. “तर सत्य हे आहे की ही परिस्थिती केवळ आपल्याच वाईट कृत्यांमुळे आणि घृणास्पद अपराधांमुळे आपल्यावर आली आहे. असे असूनही, आमच्या परमेश्वराने आमच्या अपराधास योग्य शिक्षेपेक्षा कमी शिक्षा देऊन हा भाग आमच्या स्वाधीन केला आहेस

  8. तरी आमच्या दुष्टपणामुळे आम्ही पुन्हा तुमच्या आज्ञाचा भंग करून जे लोक अमंगळ कृत्ये करतात, त्यांच्याशी मिश्रविवाह करावे काय? खरोखर आता तुमचा संताप आम्हाला नष्ट करून आणि वाचून आलेले अवशिष्ट इस्राएली लोकही नष्ट होणार नाहीत काय?

  9. हे याहवेह, इस्राएलांच्या परमेश्वरा, तुम्ही नीतिमान आहात! आता आम्ही अवशेष असे उरलो आहोत. तुमच्या दृष्टीने आम्ही दोषी आहोत आणि आमच्या दोषांमुळेच तुमच्या समक्षतेत उभे राहणे आम्हांपैकी कोणालाही शक्य नाही.”

  10. पण तुम्ही माझ्याकडे परत याल, माझ्या आज्ञा पाळाल, तर जगाच्या अगदी टोकाच्या कोपर्‍यातही बंदिवासात असलात, तरी मी तुम्हाला गोळा करून जे ठिकाण मी माझ्या नामाच्या निवासासाठी निवडले आहे तिथे आणेन.’

  11. “जर तू आपले हृदय परमेश्वराकडे लावशील आणि त्यांच्याकडे आपले हात पसरशील,

  12. तुझ्या हाती असलेली पापे तू जर दूर करशील आणि आपल्या डेर्‍यात अन्याय राहू देणार नाहीस,

  13. तर दोषमुक्त असा, तू तुझे मुख वर करशील; तू स्थिर आणि निर्भय असा उभा राहशील.

  14. जर तू सर्वसमर्थाकडे परत वळून, आपल्या डेर्‍यातून दुष्टता काढून टाकशील: तर तू पुनर्स्थापित होशील.

  15. मग तो व्यक्ती प्रार्थना करेल आणि परमेश्वराचा अनुग्रह त्याच्यावर होईल, ते परमेश्वराचे मुख पाहतील आणि आनंदाचा गजर करतील; आणि परमेश्वर त्यांना सुयश देऊन, त्यांची पुनर्स्थापना करतील.

  16. मग ते जाऊन इतरांना जाहीर करून सांगतील, ‘मी पाप केले होते, जे सरळ ते मी विकृत केले, परंतु ज्यास मी पात्र होतो ते मला मिळाले नाही.

  17. परमेश्वराने मला त्या मृत्यूच्या गर्तेत जाण्यापासून वाचविले, आणि जीवनाच्या प्रकाशाचा आनंद उपभोगत मी जीवन जगेन.’

  18. “समजा कोणी परमेश्वराला म्हटले, ‘मी पापी आहे, परंतु मी यापुढे पाप करणार नाही.

  19. मी पाहू शकत नाही ते मला शिकवा; मी जर अपराध केला आहे, तर मी तो पुन्हा करणार नाही.’

  20. ते त्यांना सुधारणा ऐकून घेण्यास भाग पाडतात आणि त्यांनी केलेल्या पापांसाठी पश्चात्ताप करण्याची आज्ञा करतात.

  21. म्हणून मी माझाच तिरस्कार करतो, आणि धूळ व राखेत बसून पश्चात्ताप करतो.”

  22. सर्व राष्ट्रे याहवेहस स्मरण करतील; दिगंतरीचे लोक त्यांच्याकडे वळतील; आणि राष्ट्रातील सर्व कुटुंब त्यांच्यासमोर नतमस्तक होतील.

  23. वाईटाचा त्याग कर आणि चांगले ते कर; शांतीचा शोध घे व तिच्यामागे लाग.

  24. याहवेह भग्नहृदयी लोकांच्या अगदी जवळ असतात आणि जे पश्चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांचे ते तारण करतात.

  25. भग्न आत्मा हेच माझे अर्पण आहे, हे परमेश्वरा, पश्चात्तापी आणि अनुतप्त हृदय तुम्ही धिक्कारणार नाही.