Repentance बद्दल बायबलमधील वचने: Commanded by Christ
Commanded by Christ बद्दल वचने
तुम्ही कसे पतन पावलात याची आठवण करा! पश्चात्ताप करा आणि जी कृत्ये तुम्ही पूर्वी करीत होता ती करा. जर तुम्ही पश्चात्ताप करणार नाही, तर मी तुमच्याकडे येईन आणि तुमची समई तिच्या स्थानापासून दूर करेन.
यास्तव पश्चात्ताप कर! नाही तर, मी तुमच्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणार्या तलवारीने त्यांच्याविरुद्ध लढेन.
जे तुम्ही प्रथम ऐकले व स्वीकारले, त्याची आठवण करा आणि त्यावर दृढविश्वास ठेऊन पश्चात्ताप करा. कारण तुम्ही जागृत झाला नाही, तर जसा चोर येतो तसा मी येईन आणि मी कोणत्या घटकेस तुमच्याकडे येईन हे तुम्हाला मुळीच समजणार नाही.