Repentance बद्दल बायबलमधील वचने: Condition of God's favor
Condition of God's favor बद्दल वचने
“ ‘परंतु जर ते आपल्या पापांची व आपल्या वाडवडिलांच्या पापांची—त्यांच्या अविश्वासूपणाची आणि माझ्याविरुद्ध चालण्याची कबुली देतील,
ज्यामुळे मी त्यांचा शत्रू झालो व त्यांना शत्रूच्या भूमीत घेऊन गेलो—नंतर जेव्हा त्यांची सुंता न झालेली हट्टी अंतःकरणे नम्र होतील आणि त्यांच्या पापाची शिक्षा ते भोगतील,
तेव्हा मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याबरोबर केलेल्या कराराचे स्मरण करेन आणि त्या भूमीचे स्मरण करेन.
जर माझे लोक, ज्यांना माझ्या नावाने ओळखले जाते, ते जर स्वतःला नम्र करतील आणि प्रार्थना करतील, माझा शोध घेतील आणि त्यांच्या वाईट मार्गांपासून फिरतील, तेव्हा मी स्वर्गातून ऐकेन आणि त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांच्या भूमीला आरोग्य देईन.