- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Repentance बद्दल बायबलमधील वचने: Shame and confusion
Shame and confusion बद्दल वचने
आणि त्यांचा धावा करून म्हटले: “हे माझ्या परमेश्वरा, माझे मुख तुमच्याकडे वर करण्याची मला खरोखरच लाज व कलंकित झाल्यागत वाटते. आमच्या पातकांची रास आता आमच्या डोक्यावरून गेली आहे, कारण आमचे अपराध आकाशापर्यंत अमर्यादित झाले आहेत.
आमच्या पूर्वजांपासून आजतागायत आमची अत्यंत घोर पापे झाली आहेत. आमच्या पातकांमुळेच, आम्ही, आमचे राजे, आमचे याजक, गैरयहूदी राजांच्या तलवारीने मारले गेले, आम्हाला कैद करण्यात आले, लुबाडण्यात आले व फजीत करण्यात आले. आजही आमची स्थिती अशीच आहे.
“पण आता या थोड्या काळासाठी याहवेह आमच्या परमेश्वराने आमच्यावर कृपा करून आमच्यापैकी काही थोड्या लोकांना जिवंत राखले आणि त्यांच्या या पवित्रस्थानी आम्हाला स्थिर केले आहे. आमच्या परमेश्वराने आमच्या दृष्टीस प्रकाश दिला व आम्हाला गुलामगिरीतून थोडी विश्रांती दिली आहे.
आम्ही गुलाम आहोत, पण आमच्या परमेश्वराने आम्हाला गुलामगिरीतही सोडून दिले नाही. त्याऐवजी पर्शियाच्या राजाच्या नजरेत आम्हाला अशी कृपा दिली आहे: आमच्या परमेश्वराच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी आम्हाला नवीन जीवन दिले आहे. आम्हाला यहूदीया आणि यरुशलेम येथे संरक्षणासाठी तटबंदी दिली आहे.
“पण हे आमच्या परमेश्वरा, आता आम्ही तुमच्यापुढे काय बोलावे? कारण आम्ही तुमचे नियम मोडले आहेत.
तुमचे सेवक संदेष्टे, त्यांनी आम्हाला आधीच इशारा देऊन ठेवला होता: ‘जो देश आम्हाला वतन म्हणून मिळेल, तो देश तिथे राहणार्या लोकांच्या भयंकर अमंगळ चाली व कृत्ये यांनी भ्रष्ट झालेला असेल. खरोखरच आज देशाच्या या टोकापासून तर त्या टोकापर्यत तो अपवित्रतेने भरलेला आहे.
म्हणून आपल्या कन्या या राष्ट्रांच्या पुरुषांना देऊ नयेत आणि त्यांच्या कन्या तुमच्या पुत्रांना करून घेऊ नयेत. त्या राष्ट्रांशी कोणत्याही प्रकारे मैत्रीचा समेट करू नये. तरच तुम्ही सुदृढ होऊन तुम्हाला त्या भूमीचे उत्तम फळ लाभेल व ती समृद्धी आमच्या मुलाबाळांस सदासर्वकाळचे वतन म्हणून लाभेल.’
“तर सत्य हे आहे की ही परिस्थिती केवळ आपल्याच वाईट कृत्यांमुळे आणि घृणास्पद अपराधांमुळे आपल्यावर आली आहे. असे असूनही, आमच्या परमेश्वराने आमच्या अपराधास योग्य शिक्षेपेक्षा कमी शिक्षा देऊन हा भाग आमच्या स्वाधीन केला आहेस
तरी आमच्या दुष्टपणामुळे आम्ही पुन्हा तुमच्या आज्ञाचा भंग करून जे लोक अमंगळ कृत्ये करतात, त्यांच्याशी मिश्रविवाह करावे काय? खरोखर आता तुमचा संताप आम्हाला नष्ट करून आणि वाचून आलेले अवशिष्ट इस्राएली लोकही नष्ट होणार नाहीत काय?
हे याहवेह, इस्राएलांच्या परमेश्वरा, तुम्ही नीतिमान आहात! आता आम्ही अवशेष असे उरलो आहोत. तुमच्या दृष्टीने आम्ही दोषी आहोत आणि आमच्या दोषांमुळेच तुमच्या समक्षतेत उभे राहणे आम्हांपैकी कोणालाही शक्य नाही.”
मी भरकटल्यानंतर, मला पश्चात्ताप झाला; मला समज आल्यानंतर, मी दुःखातिशयाने ऊर बडवून घेतला. माझ्या तरुणपणाच्या दिवसात मी जे आचरण केले, त्यामुळे मी लज्जित व अपमानित झालो आहे.’
आणि तुझ्यापेक्षा थोरल्या व धाकट्या बहिणींचे तू स्वागत करशील, तेव्हा तुला तुझे मार्ग आठवतील व तुला लाज वाटेल. तुझ्याबरोबरच्या माझ्या करारानुसार नसले तरी मी त्यांना तुझ्या मुलींप्रमाणे तुला देईन.
तुझ्यासाठी व जे सर्व तू केले त्यासाठी मी जेव्हा प्रायश्चित करेन, तेव्हा तुला आठवण होईल व लाज वाटेल आणि अवमानामुळे पुन्हा कधी आपले मुख उघडणार नाहीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
“हे प्रभू, तुम्ही नीतिमान आहात, परंतु आज आम्ही लज्जित झालो आहोत; यहूदीयात राहणारे, यरुशलेमात राहणारे, जवळ व दूर राहणारे सर्व इस्राएली लोक आणि ज्यांना तुमच्याविरुद्ध केलेल्या अविश्वासाच्या कृत्यांमुळे सर्व देशांमध्ये तुम्ही घालवून दिले.
हे याहवेह, आम्ही, आमचे राजे, आमचे राजपुत्र, आणि आमचे पूर्वज फार लज्जित आहोत, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.