मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्या पुरुषाचा भाता अशा बाणांनी भरलेला आहे, तो धन्य! असे पुरुष वेशीत आपल्या शत्रूशी न्यायालयात वाटाघाटी करतील, तेव्हा ते लज्जित होणार नाहीत.

  2. प्रवाशांचे आराधना गीत. जे याहवेहचे भय बाळगतात, आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, ते धन्य!

  3. तू आपल्या हातांनी केलेल्या श्रमाचे फळ खाशील; तू सुखी होशील व तुझे कल्याण होईल.

  4. तुझी पत्नी तुझ्या घरात सफल द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती जैतुनाच्या रोपांसारखी होतील.

  5. होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांना हाच आशीर्वाद असणार.

  6. याहवेह सीयोनातून तुला आशीर्वादित करो; तुझे आयुष्यभर तू यरुशलेमची समृद्धी बघशील.

  7. नातवंडाचे सुख लाभेल इतके दीर्घ आयुष्य तुला मिळो— इस्राएलास शांती लाभो.

  8. प्रवाशांचे आराधना गीत. “माझ्या किशोरावस्थेपासून त्यांनी माझ्यावर घोर अत्याचार केला आहे,” इस्राएल म्हणो;

  9. “माझ्या किशोरावस्थेपासून माझ्यावर घोर अत्याचार करण्यात आला आहे, तरीही त्यांना माझ्यावर विजय मिळविता आला नाही.

  10. शेतकर्‍याने नांगरल्याप्रमाणे त्यांनी माझ्या पाठीवर लांब लांब तासे काढली.

  11. परंतु याहवेह न्यायी आहेत; त्यांनी मला त्या दुष्टांच्या बंधनातून मुक्त केले.”

  12. सीयोनाचा द्वेष करणारे सर्व लाजिरवाणा पराजय होऊन परत जावोत.

  13. घरांच्या छपरावर उगविलेल्या गवतासारखे ते होवोत, जे अर्धवट वाढल्याबरोबर सुकून पिवळे पडते;

  14. कापणार्‍यांच्या हातात काहीही पडत नाही, की बांधणार्‍यांनाही पेंढ्या मिळत नाहीत.

  15. येणारे जाणारे लोक त्यांना असे न म्हणोत, “याहवेहचे आशीर्वाद तुम्हावर येवोत; आम्ही तुम्हाला याहवेहच्या नावाने आशीर्वाद देतो.”

  16. प्रवाशांचे आराधना गीत. याहवेह, खोल ठिकाणातून मी तुमचा धावा करीत आहे;

  17. माझा धावा ऐका; प्रभू, माझ्या कृपेच्या विनंतीकडे तुमचे कान लागोत.

  18. याहवेह, तुम्ही आमच्या पापांचा हिशोब ठेवला, तर प्रभू आमच्यापैकी कोण उभा राहील?

  19. पण तुम्ही क्षमाशील आहात; म्हणूनच आम्ही अत्यंत आदराने तुमची सेवा करू शकतो.

  20. मोठ्या अपेक्षेने माझा जीव याहवेहची वाट पाहतो, आणि मी माझी आशा त्यांच्या वचनावर टाकली आहे.

  21. पहारेकरी ज्या उत्कंठेने अरुणोदयाची वाट पाहतो, त्याहीपेक्षा अधिक उत्कंठेने मी माझ्या परमेश्वराची वाट पाहतो.

  22. हे इस्राएला, याहवेहची आशा धर, वात्सल्य याहवेहजवळच आहे; मनुष्यांचे संपूर्ण तारण त्यांच्याचकडेच आहे.

  23. ते स्वतः खंडणी भरून इस्राएलला सर्व पापांपासून मुक्त करतील.

  24. प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही, माझी नजर उन्मत्त नाही; मला समजत नाही अशा महान आणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो.

  25. दूध तुटलेले मूल जसे आपल्या आईजवळ शांत व गप्प असते; दूध तुटलेल्या मुलासारखा मी आता तृप्त होय.