मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे इस्राएला, तू देखील शांतपणे, आता आणि सर्वदा, याहवेहवर आशा ठेव.

  2. प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते, जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात,

  3. ते अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या मोलवान तेलासमान, त्याच्या दाढीवर ओघळलेल्या, अहरोनाच्या दाढीवर ओघळलेल्या, झग्याच्या काठापर्यंत आलेल्या सुगंधी तेलाप्रमाणे आहे.

  4. हे जणू सीयोन पर्वतावर पडणार्‍या हर्मोनातील दवबिंदूप्रमाणे आहे. कारण हे ते स्थान आहे, ज्याला सार्वकालिक आशीर्वाद देण्याचा याहवेहनी संकल्प केला आहे.

  5. प्रवाशांचे आराधना गीत. अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा. तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता.

  6. पवित्रस्थानात तुम्ही आपले हात उंच करा आणि याहवेहचे स्तवन करा.

  7. स्वर्ग व पृथ्वी यांचे निर्माणकर्ते याहवेह, तुम्हाला सीयोनातून आशीर्वाद देवो.

  8. आम्ही बाबेलच्या नदीकाठावर बसलो आणि सीयोनाची आठवण करीत रडलो.

  9. आम्ही आमच्या वीणा वाळुंजाच्या फांद्यावर टांगल्या,

  10. कारण आम्हाला कैद करणाऱ्यांनी आम्हाला गात गाण्यास सांगितले, आमचा छळ करणार्‍यांनी आनंद गीते गाण्याची मागणी केली, ते म्हणाले, “आमच्या करमणुकी करिता सीयोनाचे एखादे गीत गाऊन दाखवा!”

  11. या परदेशात आमच्या याहवेहचे स्तवनगीत गाणे आम्हाला कसे शक्य आहे?

  12. हे यरुशलेम, मी तुला विसरलो, तर माझा उजवा हात त्याचे कौशल्य विसरो;

  13. जर मी यरुशलेमला माझा सर्वोच्च आनंद मानत नसेन, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.

  14. हे याहवेह, माझ्या देवा, यरुशलेमचा पाडाव झाला त्या दिवशी एदोमाच्या वंशजांनी काय केले याचे स्मरण करा. ते आरोळ्या मारत होते, “तिला जमीनदोस्त करा, तिचा पाया देखील ढासळून टाका.”

  15. अगे बाबेलच्या कन्ये, तुझा नाश निश्चित आहे; तू जसा आमचा नाश केलास, तसा तुझी परतफेड करणारा धन्य होईल.

  16. जो तुझी तान्ही बालके घेऊन, त्यांना खडकावर आपटेल, तो धन्य!

  17. दावीदाचे स्तोत्र. हे याहवेह, मी माझ्या अंतःकरणापासून तुमचे उपकारस्मरण करेन; मी तुमची स्तुतिस्तोत्रे “दैवतांच्या” पुढे गाईन.

  18. उपासना करीत असताना, तुमच्या मंदिराकडे मी नतमस्तक होईन, आणि तुमच्या सर्व दयामय प्रीतीबद्दल आणि विश्वासूपणाबद्दल, तुमची उपकारस्तुती करेन, कारण तुम्ही तुमच्या वचनाला तुमच्या किर्तीपेक्षा उंच केले आहे.

  19. जेव्हा मी हाक मारली, तुम्ही प्रत्युत्तर दिले; मला शक्ती देऊन खूप धैर्य दिले.

  20. हे याहवेह, पृथ्वीवरील सर्व राजे तुमचे उपकारस्मरण करतील, कारण यातील प्रत्येकजण तुमच्या मुखाचे निर्णय ऐकतील.

  21. ते याहवेहच्या गौरवशाली मार्गाचे गुणगान करतील, कारण याहवेहचे गौरव अतिथोर आहे.

  22. याहवेह महान असले तरी ते दीनांची दयेने काळजी घेतात; गर्विष्ठ लोकांना मात्र ते दुरूनच ओळखतात.

  23. मी संकटांनी वेढलेला असलो, तरी तुम्ही मला त्यातून सुखरुपपणे सोडविता; माझ्या संतापलेल्या शत्रूंवर तुम्ही आपला हात उगारता; तुमचा उजवा हात माझा बचाव करतो.

  24. याहवेह माझे निर्दोषत्व सिद्ध करतील; परमेश्वरा, तुमची करुणा सनातन आहे— आपल्या हस्तकृतीचा त्याग करू नका.

  25. संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र. याहवेह, मला दुष्ट लोकांपासून सोडवा; हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा.