मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते पाहा! माझ्या उजवीकडे मला साहाय्य करणारा कोणीही नाही; माझी कोणालाही पर्वा नाही. मला काहीच आश्रय नाही; माझ्या जिवाची कोणासही चिंता नाही.

  2. मी याहवेहचा धावा करतो; मी म्हटले, “तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात, जिवंतांच्या भूमीत तुम्हीच माझे विधिलिखित आहात.”

  3. माझा धावा ऐका, कारण मी अत्यंत निराशाजनक मनःस्थितीत आहे; माझा छळ करणार्‍यांपासून तुम्ही मला मुक्त करा, कारण ते माझ्यापेक्षा अत्यंत बलिष्ठ आहेत.

  4. मला बंदिवासातून मुक्त करा, म्हणजे मला तुमची उपकारस्तुती करता येईल; मग तुम्ही मला साहाय्य केले, म्हणून नीतिमान लोक माझ्याबरोबर आनंदोत्सव करतील.

  5. दावीदाचे एक स्तोत्र. हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका, कृपा करून माझ्या विनवणीकडे लक्ष द्या, तुमच्या विश्वासूपणा व नीतिमत्वास अनुसरून माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर द्या.

  6. आपल्या सेवकाचा न्याय करून त्याला शासन करू नका, कारण जीवितांमध्ये तुमच्यासमोर नीतिमान असा कोणीही नाही.

  7. माझ्या शत्रूने पाठलाग करून मला पकडले आहे; त्याने मला जमिनीवर तुडविले आहे; जसे दीर्घकाळाच्या मृतास ठेवावे, तसे त्याने मला अंधारात जखडून ठेवले आहे.

  8. माझा आत्मा निराशेने व्याकूळ झाला आहे; भीतीने मी हतबल झालो आहे.

  9. मला पुरातन काळचे स्मरण होत आहे; तुम्ही केलेल्या अद्भुत कृत्यांचे मी मनन करतो, आणि तुमचे हस्तकौशल्य माझ्या विचारांचा विषय आहे.

  10. मी माझे हात तुमच्यापुढे पसरतो; शुष्क भूमीसारखा माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला आहे. सेला

  11. हे याहवेह, त्वरेने मला उत्तर द्या; माझा आत्मा दुर्बल झाला आहे. तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका, नाहीतर मी अधोलोकात जाणार्‍यासारखा होईन.

  12. प्रातःकाळी तुमच्या वात्सल्याचा मला प्रेमसंदेश येऊ द्या, कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. माझे जीवन मी तुमच्या हातात सोपविले आहे, म्हणून मी कोणत्या मार्गाने चालावे ते मला दाखवा.

  13. याहवेह, मला माझ्या शत्रूच्या तावडीतून सोडवा, कारण मी तुमच्यामध्ये लपलो आहे.

  14. तुमच्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला साहाय्य करा, कारण तुम्हीच माझे परमेश्वर आहात; तुमचा उत्तम आत्मा मला नीतिमार्गाने नेवो.

  15. हे याहवेह, तुमच्या नावाचे गौरव व्हावे म्हणून माझे जीवन सुरक्षित ठेवा; तुमच्या नीतिमत्वास अनुसरून या संकटातून मला बाहेर काढा.

  16. माझ्यावरील तुमच्या अक्षय प्रीतीमुळे माझ्या शत्रूंचा नाश करा; माझ्या सर्व विरोधकांचा नायनाट करा, कारण मी तुमचा सेवक आहे.

  17. दावीदाचे स्तोत्र. याहवेहचे, माझ्या आश्रय खडकाचे स्तवन असो, ते माझ्या बाहूंना युद्धाचे व माझ्या बोटांना लढाईचे प्रशिक्षण देतात.

  18. तेच माझे प्रेमळ परमेश्वर आणि माझा दुर्ग, सुरक्षितेचा बुरूज आणि माझे मुक्तिदाता आहेत; तेच माझी ढाल, माझे आश्रयस्थान आहेत, ते माझ्या प्रजेला माझ्यासमोर नम्र करतात.

  19. हे याहवेह, मानव तो काय की तुम्ही त्याची काळजी घ्यावी, नश्वर मानव तो काय की त्याचा तुम्ही विचार करावा?

  20. कारण मानव केवळ श्वासवत आहे; सरणार्‍या सावलीप्रमाणे त्याचे आयुष्य आहे.

  21. हे याहवेह, स्वर्ग उघडून खाली या; पर्वतांना स्पर्श करा म्हणजे ते धुमसतील.

  22. विजांचे लोळ मोकळे सोडा आणि शत्रूंची दाणादाण उडवून द्या; आपल्या बाणांचा वर्षाव करून त्यांना उधळून टाका.

  23. स्वर्गातून आपला हात लांब करून मला मुक्त करा; जलप्रवाहाच्या तडाख्यापासून मला सोडवा, आणि परक्यांच्या सामर्थ्यापासून मला मुक्त करा.

  24. त्यांचे मुख असत्य वचनांनी भरलेले असते; त्यांचे उजवे हात कुकर्म करणारे आहेत.

  25. हे परमेश्वरा, मी तुमच्यासाठी एक नवे गीत गाईन; दशतंत्री वीणेवर मी तुमच्या स्तवनाचे संगीत बनवेन.