मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. राजांना विजय तुमच्यामुळेच प्राप्त होतो, आणि तुमचा सेवक दावीदाला सुरक्षा प्रदान करणारे तुम्हीच आहात. घातकी तलवारीपासून

  2. मला सोडवा; ज्यांची मुखे लबाड्यांनी भरलेली आहेत, ज्यांचे उजवे हात फसविणारे आहेत. त्या परक्यांच्या हातून मला सोडवा.

  3. मग आमचे पुत्र, तारुण्यात जोपासलेल्या परिपक्व रोपांसारखे होतील; आमच्या कन्या, राजमहालाच्या सजावटीसाठी केलेल्या कोरीव स्तंभासारख्या होतील.

  4. आमची अन्नभांडारे सर्वप्रकारच्या वस्तूंनी भरलेली असतील, आमच्या कुरणात आमची मेंढरे सहस्त्रपट, दशसहस्त्रपट वाढतील.

  5. आमची सशक्त गुरे अवजड वाहने वाहतील. आमच्या तटबंदीला भगदाडे पडणार नाहीत, आम्ही पारतंत्र्यात जाणार नाही, आमच्या रस्त्यावर दुःखाच्या आरोळ्या ऐकू येणार नाहीत.

  6. ज्या लोकांना असे आशीर्वाद लाभतात ते सुखी होत; ज्या लोकांचा परमेश्वर याहवेह आहे, ते लोक धन्य आहेत.

  7. याहवेहचे स्तवन करा. आकाशमंडलातून त्यांचे स्तवन करा; ऊर्ध्वलोकी त्यांचे स्तवन करा.

  8. त्यांचे सर्व स्वर्गदूत, त्यांचे स्तवन करो; त्यांची सर्व स्वर्गीय सेना, त्यांचे स्तवन करो.

  9. सूर्य आणि चंद्रमा त्यांचे स्तवन करा; सर्व चमकत्या तारकांनो, त्यांचे स्तवन करा.

  10. हे सर्वोच्च आकाशांनो, आणि आकाशाच्याही वरील जलांनो, त्यांचे स्तवन करा.

  11. त्यांची निर्मिती याहवेहचे स्तवन करो, कारण त्यांनी आज्ञा दिली आणि ती अस्तित्वात आली.

  12. आणि त्यांनी त्यांची स्थापना सदासर्वकाळासाठी केली आहे— त्यांची राजाज्ञा कधीही रद्द केली जाणार नाही.

  13. पृथ्वीवर याहवेहचेच स्तवन होवो, खोल महासागर व त्यातील समस्त विशालकाय प्राण्यांनो,

  14. विजा व गारा, हिम व धुके, तसेच वादळी वारे, त्यांचे स्तवन करोत.

  15. अहो पर्वतांनो व सर्व टेकड्यांनो, फळझाडे व समस्त गंधसरू,

  16. हिंस्र पशू आणि सर्व गुरे, सूक्ष्म जीव व उडणारे पक्षी,

  17. पृथ्वीवरील राजे व सर्व राष्ट्रे, अहो अधिपती व त्यांच्या न्यायाधीशांनो,

  18. युवक व युवतींनो, वृद्ध व बालके.

  19. तुम्ही सर्व याहवेहचे स्तवन करा, कारण केवळ त्यांच्याच नामाला महिमा मिळो; त्यांचे ऐश्वर्य पृथ्वी आणि आकाशाहून महान आहे.

  20. त्यांनी त्यांच्या लोकांचे शिंग उभारले आहे, ते त्यांच्या सर्व नीतिमान भक्तांना, त्यांच्या अंतःकरणासमीप, त्यांना अत्यंत प्रिय अशा इस्राएली लोकांना स्तवन पात्र केले आहे. याहवेहचे स्तवन करा.

  21. याहवेहचे स्तवन करा. त्यांच्या मंदिरात त्यांचे स्तवन करा; त्यांच्या विशाल आकाशात त्यांचे स्तवन करा;

  22. त्यांच्या सामर्थ्यवान कृत्याबद्दल त्यांचे स्तवन करा; त्यांच्या अद्वितीय थोरवीकरिता त्यांचे स्तवन करा;

  23. कर्णा वाजवून त्यांचे स्तवन करा; सतार व वीणा वाजवून त्यांचे स्तवन करा;

  24. डफ वाजवून व नृत्य करून त्यांचे स्तवन करा; तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्यांचे स्तवन करा.

  25. खणखणणारे टाळ वाजवून त्यांचे स्तवन करा; झणझणणार्‍या झांजा वाजवून त्यांचे स्तवन करा.