मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आपले शिंग स्वर्गाविरुद्ध उंचावू नका; आपले मस्तक उंच करून बोलू नका.’ ”

  2. पूर्वेकडून, पश्चिमेकडून किंवा जंगलातून मनुष्याला स्वतःची उन्नती करता येत नाही.

  3. मात्र परमेश्वरच न्याय करणारे आहेत: ते एकाला खाली पाडतात आणि दुसर्‍यास उंच करतात.

  4. कारण याहवेहच्या हातात मसाला मिश्रित फेसाळलेल्या द्राक्षारसाचा प्याला आहे; तो प्याला म्हणजे पृथ्वीवरील दुष्ट लोकांवर त्यांनी ओतलेला न्यायच आहे; सर्व दुष्टांना तो गाळासह निथळून प्यावा लागेल.

  5. मी तर ही घोषणा सर्वदा करीत राहीन; मी याकोबाच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाईन.

  6. ते म्हणतात, “सर्व दुष्टांची शिंगे मी तोडून टाकीन, परंतु नीतिमान लोकांची शिंगे उंच करेन.”

  7. संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत. परमेश्वर यहूदीयात प्रसिद्ध आहेत; इस्राएलमध्ये त्यांचे नाव थोर आहे.

  8. त्यांचा मंडप शालेम येथे आहे, त्यांचे निवासस्थान सीयोन येथे आहे.

  9. तिथे त्यांनी चमकणारे बाण, ढाली आणि तलवारी, युद्धाची शस्त्रे मोडली. सेला

  10. तुम्ही प्रकाशाने तेजस्वी आहात, प्राण्यांनी समृद्ध असलेल्या पर्वतांपेक्षा अधिक वैभवी.

  11. प्रबळांची लूटमार झाली आहे, ते मृत्यूची निद्रा घेत आहेत; त्यांच्यातील एकाही योद्ध्याला हात उचलता येत नाही.

  12. हे याकोबाच्या परमेश्वरा, तुम्ही फटकारल्यावर घोडे आणि स्वार गाढ झोपेत गेले आहेत.

  13. तुम्हीच एकटेच भयास योग्य आहात. जेव्हा आपण रागावता, तेव्हा आपल्यासमोर कोण उभा राहू शकतो?

  14. स्वर्गातून तुम्ही आपला निर्णय जाहीर केला, तेव्हा पृथ्वीचा थरकाप उडाला आणि ती स्तब्ध झाली—

  15. पृथ्वीवरील पीडितांचे रक्षण करण्यासाठी, परमेश्वर उठून उभे राहिले तेव्हा असे झाले. सेला

  16. खचित तुमचा मनुष्यावरचा क्रोध तुमच्या स्तुतीस कारणीभूत होईल, आणि तुमच्या रोषाने उर्वरितांना रोखण्यात आले.

  17. तुमचे परमेश्वर याहवेह यांना केलेले सर्व नवस तुम्ही फेडा; शेजारच्या प्रत्येक राष्ट्राने त्यांच्यासाठी भेटी आणाव्यात; त्यांच्याबद्दल आदर आणि भीती बाळगावी.

  18. कारण ते अधिपतींचा अभिमान नष्ट करतील; पृथ्वीवरील राजांकरिता ते भयावह आहेत.

  19. आसाफाचे एक स्तोत्र. हे परमेश्वरा, इतर राष्ट्रांनी तुमच्या वतनावर आक्रमण केले आहे; त्यांनी तुमचे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे, आणि यरुशलेम नगरी नासधुशीचा ढीग झाली आहे.

  20. तुमच्या सेवकांचे मृतदेह उघड्यावर पडून आहेत, ते पक्ष्यांचे भक्ष्य झाले आहेत, तुमच्या भक्तांचे मास वन्यपशूंचा आहार झाला आहे.

  21. त्यांनी लोकांचे रक्त यरुशलेमच्या सभोवती पाण्याप्रमाणे वाहविले आहे, मृतांना पुरण्यासाठी कोणीही जिवंत नाही.

  22. आमच्या शेजार्‍यांसाठी व सभोवती असणार्‍यांसाठी, आम्ही तिरस्काराचे, तुच्छतेचे आणि उपहासाचे पात्र झालो आहोत.

  23. हे याहवेह, किती काळ? तुम्ही आमच्यावर सदासर्वकाळ संतप्त राहाल काय? तुमचा क्रोधाग्नी केव्हापर्यंत पेटलेला राहणार आहे?

  24. अशा राष्ट्रांवर, जी राज्ये तुमची प्रार्थना करण्याचे नाकारतात, जे तुमच्या नावाचा धावा करीत नाहीत; अशा राष्ट्रांवर तुमच्या क्रोधाचा वर्षाव करा.

  25. त्यांनी याकोबाला गिळंकृत केले आहे आणि त्याच्या मातृभूमीचा विध्वंस केला आहे.