मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सर्वशक्तिमान याहवेह, जे लोक तुमच्यावर भाव ठेवतात, ते कितीतरी धन्य होत.

  2. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. एक गीत. त्यांनी पवित्र पर्वतावर त्यांच्या नगरीचा पाया घातला.

  3. याकोबाच्या सर्व नगरांपेक्षा, सीयोनाचे व्दार याहवेहला अधिक प्रिय आहे.

  4. परमेश्वराच्या नगरी, तुझ्याबद्दल या उत्कृष्ट गोष्टी कथन होतात: सेला

  5. “मी नोंद करेन की, राहाब आणि बाबिलोन हे देश माझे अस्तित्व मान्य करतात— पलेशेथ, सोर आणि कूश देखील असेच करतात— ते म्हणतील की, ‘हा सीयोनात जन्मलेला आहे.’ ”

  6. खरोखर, त्या दिवसात सीयोनाबाबत म्हटले जाईल, “हा आणि तो सीयोनात जन्मलेला आहे, आणि प्रत्यक्ष देवाधिदेव या शहराला प्रस्थापित करतील.”

  7. नागरिकांच्या नोंदवहीत याहवेह लिहितील: “याचा जन्म सीयोनात झाला आहे.” सेला

  8. संगीत समारंभात ते गातील, “माझे सर्व झरे तुमच्यामध्येच आहेत.”

  9. एक स्तोत्र. एक गीत. शब्बाथ दिवसासाठी निर्धारित. याहवेहची स्तुती गाणे, आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे.

  10. प्रातःकाळी तुमच्या करुणामय प्रीतीची, आणि सायंकाळी तुमच्या विश्वसनीयतेची घोषणा,

  11. दशतंत्री सारंगीच्या संगीताद्वारे, आणि वीणेच्या तालावर गायन-वादन करीत आहे.

  12. हे याहवेह, तुमच्या कृत्त्यांनी तुम्ही मला उल्हासित करता; तुमच्या हाताने केलेल्या कार्यांमुळे मी हर्षगीते गात आहे.

  13. हे याहवेह, तुमची कृत्ये किती महान आहेत! तुमचे विचार किती गहन आहेत!

  14. मतिमंद लोकांना त्याचे आकलन होत नाही; मूर्खांना हे समजत नाही की,

  15. दुष्ट लोक गवताप्रमाणे जरी भराभर उगवतात व त्यांची भरभराट होते, तरी त्यांच्यापुढे केवळ अनंतकालचा नाशच आहे.

  16. परंतु याहवेह तुम्ही सदासर्वकाळ सर्वोच्च आहात!

  17. हे याहवेह, तुमच्या सर्व शत्रूंचा, निश्चितच सर्व शत्रूंचा नाश होईल, आणि समस्त दुष्कर्म्यांची दाणादाण होईल.

  18. परंतु तुम्ही माझे शिंग रानबैलासारखे उंच केले आहे; नवीन तेलाने मला अभिषिक्त केले आहे.

  19. माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पाहिला; माझ्या विरोधकांची दाणादाण माझ्या कानांनी ऐकली.

  20. नीतिमान लोक खजुरीच्या झाडासारखे समृद्ध होतील, ते लबानोनातील गंधसरूसारखे अभिवृद्ध होतील;

  21. जे याहवेहच्या घरात रोपलेले, आणि परमेश्वराच्या अंगणात लावलेले आहेत, ते समृद्ध होतील.

  22. वृद्धापकाळातही ते फळे देतच राहतील, आणि ते टवटवीत व हिरवेगार राहतील.

  23. ते ही घोषणा करतील, “याहवेह नीतिमान आहेत; ते माझे खडक आहेत; त्यांच्यामध्ये दुष्टता नाही.”

  24. याहवेह राज्य करतात; ऐश्वर्याची वस्त्रे त्यांनी परिधान केली आहेत; याहवेहनी राजेशाही वस्त्रे परिधान केली आहेत आणि ते शक्तीने सुसज्जित आहेत; निश्चितच, त्यांनी पृथ्वी अत्यंत स्थिर व अढळ केलेली आहे.

  25. तुमचे सिंहासन अनादिकालापासून स्थापलेले आहे; तुम्ही अनंतकाळापासून आहात.