मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आमच्या पूर्वजांच्या पातकांबद्दल आम्हाला दोषी धरू नका; तुमची कृपा लगेचच आमच्या वाट्याला येऊ द्या, कारण आमची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.

  2. हे आमच्या उद्धारक परमेश्वरा, तुमच्या नावाच्या गौरवाकरिता आम्हाला साहाय्य करा; तुमच्या नामाकरिता आमची पापक्षमा करा व आम्हाला मुक्त करा.

  3. इतर राष्ट्रांनी का म्हणावे, “यांचा देव कुठे आहे?” आमच्या डोळ्यादेखत या राष्ट्रांना प्रगट करा, की तुमच्या लोकांच्या या भीषण कत्तलीचा तुम्ही सूड घेता.

  4. बंदिवानांचे उसासे तुम्ही ऐका; मरणदंड झालेल्याची सुटका करून तुम्ही आपल्या सामर्थ्याची थोरवी सिद्ध करा.

  5. हे प्रभू, तुमची निंदा करणार्‍या या शेजार्‍यांचा सातपट सूड त्यांच्या झोळीत घाला.

  6. मग आम्ही तुमचे लोक, तुमच्या कळपातील मेंढराप्रमाणे असलेले, सदासर्वकाळ तुमचा धन्यवाद करू; एका पिढीपासून अनेक पिढ्यांपर्यंत, आम्ही तुमचे उपकारस्मरण करीत राहू.

  7. आसाफाचे एक स्तोत्र. परमेश्वराने महासभेत आपले स्थान ग्रहण केले आहे; त्यांनी “दैवतांसमोर” आपला न्याय जाहीर केला आहे:

  8. तुम्ही कुठवर दुष्टांचे समर्थन करणार, अन्यायी लोकांसाठी पक्षपात करत राहणार? सेला

  9. दुबळे आणि पितृहीनांचे समर्थन करा, गरीब आणि पीडलेल्यांना यथायोग्य न्याय द्या.

  10. दुर्बल आणि गरजवंत लोकांना वाचवा; दुष्टांच्या तावडीतून त्यांना सोडवा.

  11. इतर “दैवतां” ना काहीही कळत नाही, काहीही समजत नाही. ते अंधकारात चालतात; पृथ्वीचे सर्व पाये डळमळीत झाले आहेत.

  12. “मी म्हटले, ‘तुम्ही “दैवते” आहात; तुम्ही सर्वोच्च परमेश्वराचे पुत्र आहात.’

  13. परंतु तुम्ही मर्त्य मानवांप्रमाणेच मराल; आणि इतर शासकाप्रमाणे तुमचे पतन होईल.”

  14. हे परमेश्वरा, उठा आणि जगाचा न्याय करा, कारण समस्त राष्ट्र तुमचे वतन आहे.

  15. संगीत निर्देशकाकरिता. गित्तीथ वर आधारित. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. हे सर्वशक्तिमान याहवेह, तुमचे निवासस्थान किती रम्य आहे!

  16. याहवेह तुमच्या अंगणाच्या उत्कंठेने मी, मूर्छित होईपर्यंत आतुर झालो आहे; माझा जीव व माझा देह जिवंत परमेश्वराला आरोळी मारीत आहे.

  17. हे सर्वशक्तिमान याहवेह, माझ्या राजा आणि माझ्या देवा, तुमच्या वेद्यांजवळ चिमणीला घरटी बांधण्याचे, व निळवीला देखील आपली पिल्ले ठेवण्याचे ठिकाण सापडले आहे.

  18. जे तुमच्या मंदिरात राहू शकतात, ते किती धन्य आहेत; ते निरंतर तुमचे स्तवन करतात. सेला

  19. ज्या मनुष्याच्या सामर्थ्याचा उगम तुम्हीच आहात, ते किती धन्य आहेत, ज्यांचे अंतःकरण तुमच्या मार्गाचे यात्रेकरू आहेत.

  20. ते बाका दरीतून जात असताना, ती त्यांना झर्‍यांचे स्थान होईल; शरदॠतूतील पाऊसही तिला आशीर्वादाने झाकून टाकील.

  21. सीयोनात परमेश्वराच्या समोर प्रत्येकजण उपस्थित होईपर्यंत, त्यांचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढेल.

  22. याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका; याकोबाच्या परमेश्वरा, माझे ऐका. सेला

  23. हे परमेश्वरा, तुम्ही आमच्या ढालीवर दृष्टी टाका; आपल्या अभिषिक्तावर कृपादृष्टी करा.

  24. तुमच्या अंगणात घालविलेला एक दिवस, इतर कुठेही घालविलेल्या सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या मंडपात राहण्यापेक्षा, माझ्या परमेश्वराच्या भवनाचा द्वारपाल होऊन राहण्यात मला अधिक आनंद आहे.

  25. कारण याहवेह परमेश्वर आमचा सूर्य आणि आमची ढाल आहेत; ते आम्हाला कृपा व गौरव देतात; जे निष्कलंक असतात, त्यांच्यापासून ते कोणतीही उत्तम गोष्ट रोखून धरणार नाहीत.