मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहूदीयाच्या रानात असताना रचलेले दावीदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुम्ही माझे परमेश्वर आहात, मी तुमचा कळकळीने शोध करतो; या कोरड्या आणि वैराण भूमीत माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला झाला आहे; माझे सर्वस्व तुमच्यासाठी किती उत्कंठित झाले आहे.

  2. तुमचे सामर्थ्य आणि गौरव मी तुमच्या पवित्रस्थानी पाहिले आहे.

  3. कारण तुमची प्रीती जीवनाहून उत्तम आहे, माझे ओठ तुमचे गौरव करतील.

  4. माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला धन्यवाद देईन आणि माझे हात तुमच्या नावाने उंच करेन.

  5. उत्कृष्ट भोजनाने व्हावे तसा मी तृप्त होईल; गीत गाणार्‍या ओठांनी मी तुमची स्तुती करेन.

  6. माझ्या बिछान्यावर मी तुमचे स्मरण करतो; रात्रीच्या प्रत्येक प्रहरी मी तुमचे मनन करतो.

  7. कारण तुम्ही माझे साहाय्य आहात, तुमच्या पंखांच्या सावलीत मी गीत गातो.

  8. मी तुम्हाला बिलगून राहतो; तुमचा उजवा हात मला सावरून धरतो.

  9. जे मला मारू इच्छितात त्यांचा नाश होईल; ते पृथ्वीच्या खोल रसातळी जातील.

  10. तलवारीच्या धारेने ते पडतील; कोल्ह्यांचे ते भक्ष्य होतील.

  11. परंतु राजा परमेश्वरामध्ये उल्हास करेल; जे लोक परमेश्वराची शपथ घेतात, ते सर्व त्याचे गौरव होईल; परंतु लबाडांची तोंडे बंद होतील.

  12. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझे गार्‍हाणे ऐका; शत्रूंच्या भयापासून माझ्या जिवास सुरक्षित ठेवा.

  13. दुष्टांच्या षडयंत्रापासून आणि गुन्हेगार टोळक्यांच्या कारस्थानापासून मला लपवा.

  14. तलवारीप्रमाणे ते आपल्या जिभांना धारदार करतात आणि बाणांप्रमाणे तीक्ष्ण असलेल्या कटुशब्दांनी लक्ष्य करतात.

  15. दबा धरून ते निरपराध्यांवर बाण सोडतात; ते निर्भयपणे अकस्मात त्यांच्यावर मारा करतात;

  16. दुष्कृत्य करण्यास ते एकमेकांना प्रोत्साहन देतात; सापळे आखण्यासाठी ते गुप्तपणे एकत्र जमतात; ते म्हणतात, “ते कोण पाहणार?”

  17. ते कुटिल योजना बनवून म्हणतात, “आता आम्ही उत्तम योजना तयार केली आहे!” मानवी अंतःकरण आणि हृदय समजणे कठीण आहे.

  18. परंतु स्वतः परमेश्वरच त्यांचा बाण मारतील; अचानक ते घायाळ होतील.

  19. परमेश्वर त्यांची जीभ त्यांच्याच विरुद्ध करतील आणि त्यांचा नाश करतील. जे सर्व त्यांना पाहतील, ते उपहासाने आपले डोके हालवतील.

  20. मग सर्व मानव घाबरतील; ते परमेश्वराच्या कृत्यांची थोरवी गातील; आणि त्यांनी केलेल्या चमत्काराविषयी मनन करतील.

  21. पण नीतिमान लोक याहवेहमध्ये आनंद करतील व त्यांचा आश्रय घेतील, सरळ हृदयाचे त्यांचे स्तवन करतील!

  22. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. एक गीत. हे परमेश्वरा, तुमची स्तुती सीयोनेत अपेक्षित आहे; तुम्हाला केलेला नवस तिथे पूर्ण करण्यात येईल.

  23. तुम्हीच प्रार्थनेचे उत्तर देता, म्हणून तुमच्याकडे सर्व लोक येतील.

  24. आमची अंतःकरणे पापांनी भरलेली असली, तरी तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली.

  25. तुमच्या अंगणात येऊन राहण्यासाठी तुम्ही ज्यांची निवड केली, ते धन्य! आम्ही तुमच्या मंदिरातील पवित्रस्थानाच्या उत्कृष्ट पदार्थांनी संतुष्ट होऊ.