मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत; तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.

  2. माझ्या पावलांसाठी त्यांनी सापळा लावला आहे— संकटात मी वाकून गेलो होतो. माझ्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी खड्डा खणला होता— परंतु ते स्वतःच त्यात पडले आहेत. सेला

  3. हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे, माझे अंतःकरण खंबीर आहे; मी तुमची स्तुती करीत गायन आणि वादन करणार.

  4. हे माझ्या जिवा, जागृत हो! अगे सारंगी, आणि वीणे, जागृत व्हा! मी प्रातःकाळाला जागृत करेन.

  5. हे प्रभू, मी प्रत्येक राष्ट्रात तुमची स्तुती करेन, मी सर्व लोकात तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.

  6. कारण तुमचे वात्सल्य महान असून ते गगनमंडळाला भिडले आहे; तुमचे विश्वासूपण आकाशाला जाऊन पोहोचते.

  7. हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत; तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.

  8. संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. अहो सत्ताधीशांनो, तुमचे निकाल खरोखर योग्य असतात काय? तुम्ही लोकांचा न्याय प्रामाणिकपणे करता काय?

  9. नाही, विपरीत न्याय कसा करावा याचा तुम्ही आपल्या मनात शोध लावता आणि तुमचे हात पृथ्वीवर हिंसक कृत्ये पसरवितात.

  10. दुष्ट लोक जन्मतःच चुकीच्या मार्गांने जातात; गर्भात असतानाच ते लबाड्या करतात.

  11. त्यांचे विष सर्पाच्या विषासारखे आहे, ते कान बंद ठेवणार्‍या नागसर्पांसारखे आहेत,

  12. की गारुडी कितीही कुशल असला, तरी तो गारुड्याचा सूर ऐकणार नाही.

  13. हे परमेश्वरा, त्यांचे विषाचे दात पाडून टाका; याहवेह, या सिंहांच्या दाढा उपटून काढा.

  14. त्यांना पाण्यासारखे वाहू द्या आणि विलीन करा; जेव्हा ते धनुष्य रोखतात, तेव्हा त्यांचे बाण लक्ष्य गाठू नयेत.

  15. गोगलगायीप्रमाणे चिखलातच त्यांना विरघळून जाऊ द्या; सूर्याचे दर्शन न घेता मरण पावणार्‍या, अकाली जन्मणार्‍या गर्भासारखे ते होवोत.

  16. काटेरी झुडूपात लागलेल्या अग्नीची आच तुमच्या भांड्यांना लागण्यापूर्वी— ते हिरवे असो वा वाळलेले—दुष्टही लगेच नाहीसे होतील.

  17. जेव्हा दुष्टांचा सूड घेतला जाईल, तेव्हा नीतिमान लोक आनंद मानतील; दुष्ट लोकांच्या रक्ताने ते आपले पाय धुतील.

  18. तेव्हा लोक म्हणतील, “नीतिमानाला आताही निश्चितच प्रतिफळ मिळते; आणि खचित पृथ्वीवर यथार्थपणे न्याय करणारे परमेश्वर आहेत.”

  19. संगीत दिग्दर्शकासाठी. “शूशन एदूथ” कराराची कुमुदिनीच्या चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. हे शिकविण्यासाठी लिहिले गेले आहे. दावीद अराम-नहराईम आणि अराम-झोबाह देशांशी युद्ध करीत असतानाच्या परिस्थितीचा हा उल्लेख आहे. त्याचवेळी सेनापती योआब, क्षार खोर्‍यात परतला, त्याने बारा हजार एदोमाच्या सैनिकांचा नाश केला. हे परमेश्वरा, तुम्ही आमचा त्याग केला, आम्हाला फोडून टाकले आहे; तुम्ही आमच्यावर कोपला आहात—आता आम्हाला पूर्वस्थितीवर आणा!

  20. तुम्ही भूमी कंपित केली आहे आणि तुम्ही तिला दुभंगले आहे; आता तुम्हीच तिला नीटनेटके करा, कारण ती सर्वस्वी हादरली आहे.

  21. तुम्ही आमच्याबाबत अतिशय कठोर झाले आहात; तुम्ही आम्हाला झोकांड्या खावयास द्राक्षारस दिला आहे.

  22. परंतु तुम्ही आपल्या भय बाळगणार्‍यांकरिता एक झेंडा उंचाविला आहे की तो आमच्या शत्रुंविरुद्ध प्रदर्शित करू. सेला

  23. आम्हाला वाचवा आणि तुमच्या उजव्या हाताने मदत करा म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर प्रीती करता त्यांचे तारण होईल.

  24. परमेश्वराने त्यांच्या पवित्रस्थानी घोषणा केली: “मी विजयाने शेखेमचे विभाजन करेन, आणि सुक्कोथाचे खोरे मोजून त्याचे इतरांना वाटप करेन.

  25. गिलआद माझा आहे. मनश्शेह माझा आहे. एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे. यहूदाह माझा राजदंड आहे.