- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Psalms बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल! जेव्हा परमेश्वर त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील, तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो!
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दावीदाचे मासकील. जेव्हा जिफी लोकांनी जाऊन शौलाला कळविले: “दावीद आमच्याजवळ लपला आहे.” परमेश्वरा, तुम्ही आपल्या नावाने माझे तारण करा; आपल्या सामर्थ्याने मला निर्दोष जाहीर करा.
परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका. माझ्या मुखातील शब्दांकडे कान द्या.
कारण परकी माणसे माझ्याविरुद्ध उठली आहेत; परमेश्वराचा आदर न करणारे निर्दयी लोक— माझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सेला
परंतु परमेश्वर निश्चितच माझे साहाय्यकर्ता आहेत; परमेश्वरच आहेत, जे मला मदत करतात.
माझ्या शत्रूंच्या दुष्ट कृत्त्यांचा मोबदला त्यांना मिळो; परमेश्वरा, तुम्ही आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश करा.
मी स्वेच्छेने माझे यज्ञ तुम्हाला अर्पण करणार; याहवेह, तुमच्या नावाची महिमा मी गाईन, कारण तुमचे नाव उत्तम आहे.
तुम्ही मला माझ्या सर्व संकटातून सोडविले आहे, आणि माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पहिला आहे.
संगीत दिग्दर्शकासाठी. “दूरच्या एला वृक्षावर बसलेला कबुतर” या चालीवर आधारित. दावीदाची मिक्ताम गाण्याची रचना. पलिष्ट्यांनी गथ देशात दावीदाला धरले, त्या घटनेचा हा संदर्भ आहे. हे परमेश्वरा, मजवर दया करा, कारण शत्रू त्वेषाने माझा पाठलाग करीत आहे; दिवसभर निकराने ते माझ्यावर हल्ले करीतच असतात.
माझे शत्रू दिवसभर माझा पाठलाग करीत आहेत; माझ्यावर गर्वाने प्रहार करणारे अनेकजण आहेत.
परंतु ज्यावेळी मला भय वाटेल, त्यावेळी मी तुमच्यावर भरवसा टाकेन.
परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन. मी परमेश्वरावर विसंबून आहे आणि मी भिणार नाही. मर्त्य मानव माझे काय करणार?
दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरीत अर्थ काढतात; माझा पाडाव कसा करावा, यासंबंधीचाच ते विचार करीत असतात.
ते एकत्र जमून कट रचतात, दबा धरतात; माझ्या पावलांचा कानोसा घेत, मला ठार करण्याच्या संधीची वाट पाहतात.
त्यांच्या दुष्टतेमुळे त्यांना निसटून जाऊ देऊ नका; परमेश्वरा, आपल्या संतापाने त्या राष्ट्रांना पाडून टाका.
तुम्ही माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत; तुम्ही माझे अश्रू तुमच्या कुपीमध्ये ठेवले आहेत; तुमच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत त्यांची नोंद नाही काय?
ज्यावेळेस मी तुमचा मदतीसाठी धावा करेन. माझे शत्रू मागे फिरून पळ काढतील; त्यावरून हे प्रमाणित होणार की परमेश्वर माझ्या पक्षाचे आहेत.
परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन, याहवेहमध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन—
मी परमेश्वरावरच आपला भरवसा ठेवणार आणि मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार?
माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला नवस केला आहे; मी तुम्हाला उपकारस्तुतीची अर्पणे करेन.
कारण तुम्ही माझा जीव मृत्यूपासून सोडविला आहे आणि माझे पाय घसरण्यापासून सावरले आहेत; जेणेकरून मला परमेश्वरासमोर जीवनाच्या प्रकाशात चालता यावे.
संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीद शौलाच्या उपस्थितीपासून निसटून गुहेत लपून बसला त्या संदर्भाचे आहे. माझ्या परमेश्वरा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा. कारण मी तुमचा आश्रय घेतला आहे; संकटे जाईपर्यंत मी तुमच्या पंखांच्या छायेखाली आश्रय घेईन.
जे मला निर्दोष ठरवितात, त्या सर्वोच्च परमेश्वराचा मी धावा करेन.
ते स्वर्गातून साहाय्य पाठवून माझे तारण करतील; जे माझा पाठलाग करतात त्यांचा ते तिरस्कार करतात; सेला परमेश्वर त्यांची प्रीती आणि विश्वासूपणा पाठवून देतील.
सिंहांनी मला घेरले आहे; ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवार आहे अशा हिंसक स्वभावाच्या मनुष्यांमध्ये मी पडलो आहे.