मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते रोगशय्येवर असता याहवेह त्यांना सांभाळतात; ते आजारी असता त्यांना आरोग्य देऊन त्यांचे अंथरूण बदलतात.

  2. मी म्हणालो, “याहवेह, माझ्यावर दया करा; मला रोगमुक्त करा, कारण मी तुमच्याविरुद्ध पातके केली आहेत.”

  3. माझे शत्रू माझ्याविषयी अभद्र बोलून म्हणतात, “तो केव्हा मरणार आणि त्याचे नाव विसरले जाणार?”

  4. जेव्हा त्यांच्यापैकी कोणी मला भेटायला येतो, तेव्हा तो पोकळपणा दर्शवितो, तो अंतःकरणात वाईटाचा संग्रह करतो; तो बाहेर जाऊन या गोष्टीचा प्रचार करतो.

  5. माझे सर्व शत्रू एकत्र मिळून माझ्याविरुद्ध कुजबुज करतात; माझ्याबाबतीत वाईट बेत आखतात.

  6. “त्याला असाध्य रोग झालेला आहे; तो आता या रोगशय्येवरून पुन्हा उठणार नाही,” असे ते म्हणतात.

  7. प्रत्यक्ष माझा जिवलग मित्रदेखील, ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता, ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.

  8. परंतु याहवेह, मजवर कृपा करून मला पुन्हा उठवा; म्हणजे मला त्यांचा सूड घेता येईल.

  9. तुम्ही माझ्याविषयी संतुष्ट आहात, म्हणून माझे शत्रू माझ्याविरुद्ध जयोत्सव करीत नाही.

  10. तुम्ही मला माझ्या प्रामाणिकपणामुळे स्थिर ठेवा आणि सदैव तुमच्या समक्षतेत ठेवा.

  11. इस्राएलचे परमेश्वर, याहवेह, जे अनादिकालापासून अनंत काळापर्यंत आहेत त्यांची स्तुती असो.

  12. संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांचे मासकील. हरणी जशी पाण्यासाठी उत्कट लालसा करते, तसा हे परमेश्वरा, माझा जीव तुमच्यासाठी उत्कट लालसा करीत आहे.

  13. माझा जीव परमेश्वराकरिता, जिवंत परमेश्वराकरिता तहानलेला आहे. मी केव्हा परमेश्वरासमोर येऊन त्यांचे दर्शन करणार?

  14. रात्र आणि दिवस, माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. मला लोक सतत असे विचारीत आहेत. “कुठे आहे तुझा परमेश्वर?”

  15. या गोष्टींची आठवण करून माझा आत्मा तुटत आहे: कसे मी परमेश्वराच्या भवनाकडे जाणार्‍या विशाल गर्दीचे नेतृत्व करीत होतो. त्यावेळी उत्सवाच्या वातावरणात आनंद, जयघोष आणि आभार यांचा आवाज प्रतिध्वनित होत होता.

  16. हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? आतल्याआत का तू तळमळत आहेस? परमेश्वराची आशा धर. मी अजूनही माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती पुनः करेन.

  17. माझ्या परमेश्वरा, माझा जीव माझ्याठायी उदास झाला आहे; तेव्हा मी यार्देन प्रदेशातून आणि हर्मोनाच्या शिखरावरून, मिसहार पर्वतावरून तुमचे स्मरण करणार.

  18. तुमच्या गर्जणार्‍या धबधब्याप्रमाणे, सागर सागराला आव्हान करतो; तुमच्या सर्व लाटा व त्यांचा कल्लोळ माझ्यावर झपाटून आदळत आहेत.

  19. तरी देखील याहवेह आपल्या अढळ प्रीतीचा वर्षाव दिवसा माझ्यावर करतात, मला जीवन देणार्‍या परमेश्वराची मी रात्रभर गीते गातो, प्रार्थना करतो.

  20. मी आरोळी मारून म्हणतो, “हे परमेश्वरा, माझ्या आश्रयाचे खडक, तुम्ही मला का विसरलात? शत्रूंच्या हल्ल्यामुळे शोकाकुल होऊन मी का फिरावे?”

  21. माझे शत्रू दिवसभर थट्टेने मला विचारतात, “तुझा परमेश्वर कुठे आहे?” यामुळे माझ्या हाडांना नश्वर वेदना होत आहे.

  22. हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास? आतल्याआत का तळमळत आहेस? परमेश्वरावर आपली आशा ठेव, मी पुनः माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.

  23. परमेश्वर, मला निर्दोष ठरवा आणि भक्तिहीन पिढीविरुद्ध माझ्या बाजूने निकाल द्या. या दुष्ट आणि कपटी लोकांपासून माझा बचाव करा.

  24. कारण परमेश्वर तुम्हीच माझे बळकट दुर्ग आहात; तुम्ही माझा त्याग का केला? शत्रूंद्वारे होणार्‍या छळामुळे मी का दुःखी व्हावे?

  25. तुमचा प्रकाश आणि तुमचे सत्य मला लाभोत; तीच मला मार्ग दाखवोत; तुमच्या पवित्र पर्वतावरील, तुमच्या निवासमंडपात, तीच मला घेऊन जावोत.