मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मोआब माझे हात धुण्याचे गंगाळ आहे, आणि एदोमावर मी माझी पादत्राणे फेकेन; पलेशेथावर मी विजयाचा जयघोष करेन.”

  2. मला तटबंदीच्या नगरात कोण आणेल? मला एदोम प्रांतात कोण नेईल?

  3. परमेश्वरा, तुम्हीच आम्हाला नाकारले आहे ना, आणि आता तुम्ही आमच्या सैन्याबरोबरही जात नाही?

  4. शत्रूविरुद्ध तुम्ही आमचा पुरवठा करा, कारण मानवाचे साहाय्य व्यर्थ आहे.

  5. परमेश्वराच्या साहाय्याने आमचा विजय सुनिश्चित आहे, आणि तेच आमच्या शत्रूंना पायदळी तुडवतील.

  6. संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्याच्या साथीने गायचे दावीदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझा धावा ऐका, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष द्या.

  7. दिगंतापासून मी तुमचा धावा करतो माझे हृदय व्याकूळ झाले असताना; तुम्हीच मला उंच खडकावर न्या.

  8. कारण तुम्हीच माझे आश्रयस्थान, शत्रूविरुद्ध उंच बुरूज आहात.

  9. तुमच्या मंडपात सदासर्वकाळ राहण्यास आणि तुमच्या पंखांच्या सावलीखाली आश्रय घेण्यास मी उत्कंठित आहे. सेला

  10. कारण परमेश्वरा, मी तुम्हाला केलेला नवस तुम्ही ऐकला आहे आणि तुमच्या नावाचे भय धरणार्‍यांचे वतन तुम्ही मला दिले आहेत.

  11. तुम्ही राजाचे आयुष्य वाढवा; ते अनेक पिढ्यांमधील पूर्ण भरलेल्या वर्षाप्रमाणे होवो.

  12. तो परमेश्वराच्या समोर सदासर्वकाळ राहो. तुमची प्रीती आणि सत्य त्याच्या रक्षणाकरिता प्रकट करा.

  13. म्हणजे मी तुमच्या नावाला सतत धन्यवाद देईन आणि दररोज माझी शपथ पूर्ण करेन.

  14. संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनाच्या चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र. परमेश्वरामध्ये निश्चितच माझ्या जिवास विश्रांती आहे; माझे तारण त्यांच्याकडून येते.

  15. फक्त तेच माझे खडक आणि माझे तारण; तेच माझा दुर्ग आहेत, माझे ढळणे अशक्य आहे.

  16. तुम्ही सर्वजण या एका मनुष्याला खाली पाडावयास, कुठपर्यंत माझ्यावर प्रहार करीत राहणार? मी तर एका वाकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे.

  17. मला उच्च स्थानावरून खाली पाडण्याचा त्यांचा बेत आहे; त्यांना खोटे बोलणे आवडते; ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, परंतु मनातून शाप देतात. सेला

  18. तरीही माझा आत्मा परमेश्वरामध्ये शांती पावेल; माझी आशा त्यांच्यापासून आहे.

  19. खरोखर तेच माझे खडक, तेच माझे तारण, तेच माझे दुर्ग आहेत; मी ढळणार नाही.

  20. माझे तारण आणि माझा सन्मान परमेश्वरावर अवलंबून आहे; तेच माझे भक्कम खडक, माझे आश्रय आहेत.

  21. माझ्या लोकांनो, तुम्ही सर्वकाळ त्यांच्यावर भरवसा ठेवा; आपले हृदय त्यांच्यापुढेच मोकळे करा, कारण परमेश्वरच आमचे आश्रयस्थान आहेत. सेला

  22. साधारण मानव श्वासमात्र आहेत; विशिष्ट मानव फक्त मिथ्या आहेत; तराजूत वजन केले की ते हलकेच भरतील; ते सर्व श्वासमात्र आहेत.

  23. पिळवणूकीच्या धनावर विश्वास ठेवू नका किंवा चोरी केलेल्या वस्तूंवर व्यर्थ आशा ठेवू नका; जरी तुमची संपत्ती वाढत असेल, तरी तिच्यावर मन लावू नका.

  24. परमेश्वर एकदा बोलले आहेत, मी दोनदा हे ऐकले आहे: “सामर्थ्य याहवेहचेच आहे,

  25. आणि प्रभू, तुमच्यामध्ये प्रेमदया सदैव असते;” आणि, “तुम्ही प्रत्येकाला त्याच्या कृत्यानुसार प्रतिफळ देता.”