Skip to content

Priests बद्दल बायबलमधील वचने

407 वचने · 86 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याव्यतिरिक्त याजकांचे सर्व पुढारी आणि लोक अधिकच अविश्वासू झाले, त्यांनी इतर राष्ट्रांच्या सर्व घृणास्पद प्रथांचे पालन केले आणि यरुशलेममध्ये पवित्र केलेले याहवेह यांचे मंदिर त्यांनी अशुद्ध केले.

  2. याजकांचे वंशज: यदायाहचे (येशूआच्या पितृकुळातील) 973,

  3. इम्मेरचे 1,052,

  4. पशहूरचे 1,247,

  5. हारीमचे 1,017,

  6. यांनी आपल्या वंशावळींचा शोध घेतला, परंतु त्यांना ते सापडले नाही, म्हणून त्यांना अशुद्ध म्हणून याजकपदातून वगळण्यात गेले.

  7. जेव्हा ते यरुशलेमात याहवेहच्या मंदिरात आले, काही कुलप्रमुखांनी परमेश्वराच्या भवनाची पुनर्बांधणी करण्यास त्या जागीच स्वेच्छेने दाने दिली.

  8. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार जितके देणे शक्य होते तितके दिले. या कामासाठी 61,000 दारिक सोने, 5,000 मीना चांदी व 100 याजकीय झगे भांडारात आणले.

  9. यांनी आपल्या वंशावळींचा शोध घेतला, परंतु त्यांना ते सापडले नाही, म्हणून त्यांना अशुद्ध म्हणून याजकपदातून वगळण्यात गेले.

  10. त्यांच्यातील काही पुढार्‍यांनी कामासाठी देणग्या दिल्या. राज्यपालाने 1,000 दारिक सोने, धार्मिक विधींसाठी लागणारे 50 कटोरे, आणि याजकांसाठी पोशाखांचे 530 संच दिले.

  11. बाकीच्या लोकांनी 20,000 दारिक सोने, 2,000 मीना चांदी आणि याजकांसाठी 67 झगे दिले.

  12. “याशिवाय आमच्या परमेश्वराच्या भवनातील कोठारासाठी याजकाकडे प्रथम दळलेले पीठ, आमचे धान्यार्पण व फलार्पण, नवा द्राक्षारस आणि जैतुनाच्या तेलाचा पहिला हिस्सा आणू. आम्ही आमच्या प्रत्येक उत्पन्नाचा एक दशांश लेव्यांना देण्याचे वचन दिले, कारण आम्ही जिथे काम करतो त्या सर्व नगरातून दशांश जमा करण्याची जबाबदारी लेव्यांची होती.

  13. लेवी दशांश गोळा करीत असताना, त्यांच्याबरोबर अहरोनाच्या वंशातील एक याजक असावा व लेव्यांनी दशांशाचा दशांश परमेश्वराच्या भवनामध्ये समर्पित करून मंदिराच्या कोठारात जमा करावा.

  14. आणि हे सुद्धा मद्य पिऊन लटपटतात आणि मद्यापासून झोकांड्या देतात: याजक आणि संदेष्टे मद्यामुळे डगमगतात आणि द्राक्षमद्याने अस्थिर होतात. आणि मद्यापासून झोकांड्या देतात ते दृष्टान्त पाहत असताना लटपटतात, निर्णय देताना ते अडखळतात.

  15. “त्यांच्यातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण लोभी आहेत; संदेष्टे आणि याजक सर्व एकसारखेच, कपटी व्यवहार करतात.

  16. नगराबाहेर जाऊन पाहावे तर, मी तलवारीला बळी पडलेल्यांची प्रेते बघतो; नगरातून गेलो तर उपासमारीला बळी पडलेले दिसतात. संदेष्टे व याजक त्यांना माहीत नसलेल्या देशात गेले आहेत.’ ”

  17. “याहवेहने म्हटल्याप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल आला व त्याने तुरुंगात माझी भेट घेतली. तो मला म्हणाला, ‘बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील माझे शेत विकत घे, कारण कायद्याप्रमाणे ते सोडवून त्याची मालकी घेण्याचा प्रथम हक्क तुझा आहे, म्हणून ते तुझ्यासाठी तू विकत घे.’ “तत्काळ माझी खात्री झाली की हा संदेश खरोखर याहवेहकडून आला होता;

  18. मग मी माझा चुलतभाऊ हानामेलला सतरा शेकेल चांदी देऊन अनाथोथ येथील ते शेत विकत घेतले.

  19. याहवेह, बघा व विचार करा: तुम्ही कधी तरी कोणालाही असे वागविले आहे का? ज्या मातांनी आपल्या मुलांचे संगोपन केले, त्या मातांनी ही आपली पोटची फळे खावीत काय? प्रभूच्या मंदिरातच त्यांचे याजक आणि संदेष्ट्यांचा संहार व्हावा काय?

  20. लोक आहेत तिथे बाहेरील अंगणात जेव्हा ते जातात, तेव्हा जी वस्त्रे घालून ते सेवा करीत होते ते काढून पवित्र खोलीत ते ठेवावे आणि दुसरे कपडे घालावे, म्हणजे त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करून लोकांनी पवित्र होऊ नये.

  21. आतील अंगणात जाताना कोणत्याही याजकाने द्राक्षारस पिऊ नये.

  22. “याजकांच्या ओठात याहवेहसंबंधीचे ज्ञान साठविलेले असावे, कारण तो सर्वसमर्थ याहवेहचा संदेष्टा आहे आणि लोक त्याच्या मुखाद्वारे शिकवण शोधतात.

  23. पण तुम्ही पथभ्रष्ट झाला आहात व तुमच्या शिक्षणामुळे अनेकजण अडखळून पडले आहेत; तुम्ही लेव्याचा करार विपरीत केला आहे,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  24. तो परमेश्वराच्या मंदिरात गेला, त्याने आणि त्याच्या सोबत्यांनी समर्पित भाकरी खाल्या, हे नियमानुसार नव्हते, त्या केवळ याजकांसाठीच होत्या.

  25. यहूदीयाचा राजा हेरोद याच्या काळात तिथे जखर्‍याह नावाचा एक याजक होता, तो अबीयाच्या याजकवर्गातील होता; त्याची पत्नी अलीशिबासुद्धा अहरोनाच्या वंशाची होती.