Skip to content

Priests बद्दल बायबलमधील वचने

407 वचने · 86 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. प्रथम चिठ्ठी यहोयारीबच्या नावे आली, दुसरी यदायाह,

  2. तिसरी हारीम, चवथी सोरीम,

  3. पाचवी मल्कीयाह, सहावी मियामीन,

  4. सातवी हक्कोस, आठवी अबीयाह,

  5. नववी येशूआ, दहावी शखन्याह,

  6. अकरावी एल्याशीब, बारावी याकीम,

  7. तेरावी हुप्पाह, चौदावी येशेबियाब,

  8. पंधरावी बिल्गाह, सोळावी इम्मेरा,

  9. सतरावी हेजीरा, अठरावी हप्पिसेसा,

  10. एकोणविसावी पथह्याह, विसावी यहेज्केल,

  11. एकविसावी याखीन, बाविसावी गामूल,

  12. तेविसावी दलायाह, चोविसावी माझियाह.

  13. त्या सर्वांचा पूर्वज अहरोनला याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराने नेमून दिलेली सेवा विधीनुसार पार पाडण्याची जशी आज्ञा होती, त्याप्रमाणे ते परमेश्वराच्या मंदिरात प्रवेश करीत.

  14. अहरोनाच्या संततीप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमेलेख आणि याजकांचे व लेव्यांचे पुढारी या सर्वांसमक्ष चिठ्ठ्या टाकून कामे वाटून देण्यात आली. सर्वात ज्येष्ठाच्या कुटुंबास व सर्वात कनिष्ठाच्या कुटुंबास सारखीच वागणूक देण्यात आली.

  15. त्याचा पिता दावीदच्या आदेशानुसार, याजकांची जबाबदारी पार पाडण्यासाठी याजक, आराधनेत नेतृत्व करण्यासाठी व याजकांना दररोजच्या कामात मदत करण्यासाठी लेव्यांचे गट बनविले. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आदेशानुसार विभागून आलेल्या भागातून त्याने वेगवेगळ्या फाटकांसाठी द्वार रक्षकांचीसुद्धा नेमणूक केली.

  16. परंतु उज्जीयाह सामर्थ्यवान झाल्यावर त्याचा गर्विष्ठपणा त्याला नाशाकडे घेऊन गेला. तो त्याचे परमेश्वर याहवेह यांच्याबरोबर अविश्वासू झाला आणि त्याने धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी याहवेहच्या मंदिरात प्रवेश केला.

  17. अजर्‍याह याजका बरोबर याहवेहचे इतर ऐंशी धैर्यवान याजक त्याच्यामागे आले.

  18. ते उज्जीयाह राजास भेटले आणि म्हणाले, “उज्जीयाह, याहवेहसाठी धूप जाळणे तुला योग्य नाही. धूप जाळण्यासाठी अहरोनाचे वंशज, याजकांचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. त्या पवित्रस्थानातून बाहेर पड, कारण तू विश्वासू राहिला नाहीस आणि परमेश्वर याहवेह यांच्याकडून तुझा सन्मान केला जाणार नाही.”

  19. उज्जीयाह धूप जाळण्यासाठी त्याच्या हातात धूपदान घेऊन तयार होता, तो याजकांवर रागावला. याहवेहच्या मंदिरातील धूपवेदीसमोर पुजाऱ्यांवर तो रागावत असताना त्याच्या कपाळावर कुष्ठरोग आला.

  20. जेव्हा अजर्‍याह मुख्य याजक आणि इतर सर्व याजक यांनी त्याच्याकडे पाहिले, तेव्हा त्यांना त्याच्या कपाळावर कुष्ठरोग झाल्याचे दिसले, म्हणून त्यांनी त्याला त्वरित बाहेर काढले. निश्चितच, तो स्वतःहून तिथून निघून जाण्यास तयार झाला होता, कारण याहवेहनी त्याला पीडले होते.

  21. उज्जीयाह राजाला त्याच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत कुष्ठरोग होता. एका वेगळ्या घरात तो राहत होता—कुष्ठरोगी असल्याने याहवेहच्या मंदिरात येण्यास त्याला बंदी होती. त्याचा पुत्र योथामकडे राजवाड्याचा कारभार होता आणि देशातील लोकांवर त्याने राज्य केले.

  22. तरीसुद्धा सर्व होमार्पणाची कातडी काढण्यासाठी याजक फारच कमी होते. म्हणून त्यांचे नातेवाईक लेवी लोकांनी त्यांना दिलेले काम पूर्ण होईपर्यंत आणि इतर याजकांचे शुद्धीकरण होईपर्यंत मदत केली, कारण लेवी लोक स्वतःचे शुद्धीकरण करण्यामध्ये याजकांपेक्षा अधिक प्रामाणिक होते.

  23. इस्राएलचा राजा दावीद आणि त्याचा पुत्र शलोमोनने लिहिलेल्या सूचनेप्रमाणे तुमच्या विभागातील कुटुंबानुसार तुम्ही स्वतःची तयारी करा.

  24. “तुमच्या बरोबरील प्रत्येक उपविभागासाठी लेव्यांच्या गटासह सामान्य इस्राएली लोकांच्या कुटुंबाबरोबर पवित्र ठिकाणी उभे राहा.

  25. वल्हांडणाची कोकरे कापली गेली आणि याजकांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त वेदीवर शिंपडले, त्यावेळेस लेवीय लोकांनी प्राण्यांची कातडी काढली.