मुख्य मजकुरावर जा

National Sins बद्दल बायबलमधील वचने

152 वचने · 34 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी त्यांच्या पुढार्‍यांकडे जाईन व त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना निश्चितच याहवेहचे मार्ग ठाऊक आहेत. त्यांना त्यांच्या परमेश्वराची अपेक्षा काय आहे हे ठाऊक आहे.” पण त्या सर्वांनी एकमताने माझे जू झिडकारून टाकले आहे. आणि माझी बंधने तोडून टाकली आहेत.

  2. हे सर्व पाहून मी त्यांना शिक्षा करू नये काय? ही याहवेहची जाहीर वाणी आहे. अशा दुष्ट राष्ट्राचा मी स्वतः प्रतिकार करू नये काय?

  3. “त्यांच्यातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण लोभी आहेत; संदेष्टे आणि याजक सर्व एकसारखेच, कपटी व्यवहार करतात.

  4. हे पृथ्वी तू ऐक: मी या लोकांवर महासंकट आणत आहे, त्यांच्याच कारस्थानाचे फळ, कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाही आणि माझे नियम नाकारले.

  5. शबाहून आणलेल्या सुगंधी धूपाचा मला काय उपयोग किंवा दूरदेशातील मोलाच्या द्रव्याचा काय उपयोग? तुमची होमार्पणे मला संतुष्ट करीत नाही; तुमचे यज्ञबली मला प्रसन्न करीत नाहीत.”

  6. “मी तुला धातूंची पारख करणारा केले आहे. आणि माझ्या लोकांना अशुद्ध धातू, जेणेकरून तू त्यांना पारखावे, व त्यांच्या मार्गाची परीक्षा करावी.

  7. ते सर्व कठोर बंडखोर आहेत, निंदा करीत फिरत आहेत. ते कास्य आणि लोखंडासारखे; त्या सर्वांची वर्तणूक दूषित आहे.

  8. भट्टीचा भाता भयानकपणे वाजत आहे. शुद्ध करणारा अग्नी शिसे भस्म करीत आहे, परंतु हे शुद्धीकरण व्यर्थ होत आहे, दुष्ट मार्गानी चालणारे पूर्णपणे शुद्ध होत नाहीत.

  9. ते अशुद्ध चांदीसारखे नाकारलेले आहेत, कारण याहवेहने त्यांचा त्याग केला आहे.”

  10. “ ‘तुम्ही चोरी, वध, व्यभिचार, खोट्या शपथा घेतल्या, बआल दैवत व तुम्हाला माहीत नसलेली इतर दैवते यांचे अनुसरण करून,

  11. आणि मग येथे येऊन, ज्या मंदिराने माझे नाव धारण केले आहे, त्या मंदिरात माझ्यासमोर उभे राहता व म्हणता “आम्ही सुरक्षित आहोत;” हे सर्व दुष्कृत्य करण्यासाठी सुरक्षित आहात काय?

  12. हे मंदिर ज्याने माझे नाव धारण केले आहे, तुमच्यासाठी लुटारूंची गुहा झाली आहे काय? परंतु मी त्याच्याकडे लक्ष दिले आहे! अशी याहवेह घोषणा करीत आहेत.

  13. “ ‘शिलोह नगरात जा, जिथे मी सर्वप्रथम माझ्या नावाचे निवासस्थान केले, आणि माझ्या इस्राएली लोकांच्या दुष्टाईमुळे मी काय केले ते पाहा.

  14. याहवेह म्हणाले, तुम्ही ही सर्व दुष्कृत्ये करीत असताना, मी तुमच्याशी वारंवार बोललो, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हाला हाक मारली, पण मला उत्तर दिले नाही.

  15. म्हणून माझे नाव धारण केलेले मंदिर, ज्याच्यावर तुम्ही भरवसा ठेवता, जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले होते, आता त्या मंदिराचे, मी शिलोहचे केले तसेच करेन.

  16. परंतु माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारणार्‍या राष्ट्राला मी पूर्णपणे मुळासकट उपटून टाकेन व नष्ट करेन,” असे याहवेह जाहीर करतात.

  17. जर तुम्ही माझे ऐकले नाही, तर मी एकांतात अश्रू ढाळेन तुमच्या गर्विष्ठपणामुळे; माझे डोळे घोर रुदन करतील, माझ्या अश्रूंचा पूर लोटेल, कारण याहवेहच्या कळपाला बंदिवान करून नेण्यात येईल.

  18. तेव्हा ज्यास मी सावध केले त्या राष्ट्राने आपल्या कुमार्गाबद्दल पश्चात्ताप केला, तर मी त्यांच्यावर दया करेन व माझ्या योजनेप्रमाणे त्यांचा नाश करणार नाही.

  19. जर ते माझ्या समक्षतेत उभे राहिले असते, तर त्यांनी माझ्या लोकांना माझे वचन जाहीर केले असते आणि ते दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले असते व त्यांच्या दुष्टकर्मापासून दूर झाले असते.

  20. “गुलामगिरीची ही सत्तर वर्षे संपल्यानंतर, मी बाबेलचा राजा व त्याचे लोक यांना त्यांच्या अपराधांबद्दल शासन करेन; मी खाल्डियनांचा देश कायमचा ओसाड करेन,

  21. “अगदी बालपणापासून मोआब सुखात राहिली. गाळावर स्थिर वसलेल्या द्राक्षारसाप्रमाणे, तरी तिला या पात्रातून त्या पात्रात ओतले गेले नाही— ती बंदिवासात गेलेली नाही. म्हणून ती पूर्ववत चवदारच आहे, आणि तिचा सुवासही बदललेला नाही.

  22. “आम्ही मोआबच्या गर्वाविषयी ऐकले आहे— तिचा गर्व किती मोठा आहे— तिचा उर्मटपणा, तिचा उन्मत्तपणा, तिचा अहंभाव आणि तिच्या अंतःकरणाची मग्रुरीही सर्व आम्हाला माहीत आहे.

  23. याहवेहने जाहीर केले, मला मोआब भूमीचा उद्धटपणा माहीत आहे, परंतु तो व्यर्थ आहे, तिच्या फुशारक्यांनी काहीही प्राप्त होत नाही.

  24. “बाबेलमधून पलायन करा! आपला जीव वाचविण्यास पळा! तिच्या पापांमुळे तुम्ही तुमचा नाश करून घेऊ नका. हा याहवेहचा सूड घेण्याचा समय आहे; ज्यास ती पात्र आहे, त्याचा मोबदला ते तिला देतील.

  25. तुम्ही, जे बऱ्याच जलाशयाकाठी वास करता, आणि अतिसंपन्न आहात, तुमचा अंत जवळ आला आहे, तुमचा नाश होण्याचा समय आला आहे.