मुख्य मजकुरावर जा

National Sins बद्दल बायबलमधील वचने: Cause the withdrawal of privileges

5 वचने · 34 पैलू

Cause the withdrawal of privileges बद्दल वचने

  1. तिच्या वेशी जमिनीत धसल्या आहेत; त्यांच्या सळया मोडून नष्ट झाल्या आहेत. तिचे राजे आणि अधिपती इतर देशात बंदिवासात गेले आहेत, तिथे नियमशास्त्र राहिले नाही, आणि तेथील संदेष्ट्यांना आता याहवेहकडून दृष्टान्तही मिळत नाहीत.

  2. “असे दिवस येत आहेत,” सार्वभौम याहवेह घोषित करतात, “मी देशावर दुष्काळ आणेन— तो अन्नाचा दुष्काळ किंवा पाण्याची तहान नव्हे, तर याहवेहचे वचन ऐकण्याचा दुष्काळ पाडेन—

  3. “हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती.

  4. आणि पाहा! आताच तुझे घर ओसाड पडले आहे.

  5. मी तुला सांगतो की, ‘प्रभूच्या नावाने येणारे धन्यवादित असो, असे तू म्हणेपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही.’ ”