मुख्य मजकुरावर जा

National Sins बद्दल बायबलमधील वचने: Testify against

8 वचने · 34 पैलू

"National Sins" साठी शोधा

Testify against बद्दल वचने

  1. आता जा, त्यांच्यासाठी ते एका पाटीवर लिहा, चर्मपत्राच्या गुंडाळीवर ते कोरून टाका, म्हणजे येणाऱ्या दिवसात ते सर्वकाळासाठी साक्षीदार असेल.

  2. कारण हे बंडखोर लोक आहेत, फसवणारी मुले आहेत, याहवेहची शिकवण ऐकायला तयार नसलेली मुले.

  3. “उंच स्वरात गर्जना करा, रोखून ठेऊ नका. रणशिंगाच्या निनादाप्रमाणे तुमचा आवाज उंच करा. माझ्या लोकांची बंडखोरी आणि याकोबाच्या वंशजांना त्यांची पापे जाहीर करा.

  4. तो म्हणाला, “हे मानवपुत्रा, ज्या राष्ट्राने माझ्याविरुद्ध बंड केले, अशा बंडखोर इस्राएल राष्ट्राकडे मी तुला पाठवित आहे; ते व त्यांचे पूर्वज यांनी आजपर्यंत माझ्याशी फितुरी केली आहे.

  5. ज्या लोकांकडे मी तुला पाठवित आहे ते उद्धट व हट्टी आहेत. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’

  6. ते ऐको किंवा न ऐकोत—कारण ते बंडखोर लोक आहेत—त्यांना कळेल की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा आहे.

  7. “मानवपुत्रा, तू तिचा न्याय करशील काय? या रक्तपाती शहराचा न्याय तू करशील काय? तर तिच्या सर्व अमंगळ कृत्यांविषयी तिचा निषेध कर

  8. “महान शहर निनवेहस जा आणि त्याविरुद्ध संदेश दे, कारण त्यांची दुष्टाई माझ्यासमोर आली आहे.”