Skip to content

National Sins बद्दल बायबलमधील वचने

152 वचने · 34 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग याहवेहने म्हटले, “सदोम आणि गमोरा विरुद्ध आक्रोश खूप वाढला आहे आणि त्यांचे पाप गंभीर आहे.

  2. मोशे म्हणाला, “संध्याकाळी जेव्हा याहवेह तुम्हाला मांस आणि सकाळी जी भाकर तुम्हाला पाहिजे ती खायला देतील, कारण त्यांनी त्यांच्याविरुद्ध केलेली तुमची कुरकुर ऐकली आहे. आम्ही कोण आहोत? तुम्ही आमच्याविरुद्ध नाही, तर याहवेहच्या विरुद्ध कुरकुर करीत आहात.”

  3. मग मोशे याहवेहकडे परत गेला आणि म्हणाला, “अरेरे, या लोकांनी केवढे मोठे पाप केले आहे! त्यांनी आपल्या स्वतःसाठी सोन्याचे दैवत केले आहेत.

  4. परंतु आता कृपा करून त्यांच्या पापांची क्षमा करा—नाहीतर जे पुस्तक तुम्ही लिहिले आहे, त्यातून माझे नाव मिटवून टाका.”

  5. “ ‘अशा प्रकारच्या कोणत्याही अमंगळ गोष्टी करून तुम्ही स्वतःला अपवित्र करून घेऊ नये, कारण ज्या राष्ट्रात मी तुम्हाला पाठवित आहे, ती राष्ट्रे या गोष्टींनी भ्रष्ट झाली आहेत.

  6. भूमीसुद्धा भ्रष्ट झाली होती; म्हणून तिच्या पापाबद्दल मी तिला शिक्षा केली आहे, भूमीने तेथील रहिवाशांना देशाबाहेर ओकारीसारखे फेकून दिले आहे.

  7. “ ‘परंतु जर ते आपल्या पापांची व आपल्या वाडवडिलांच्या पापांची—त्यांच्या अविश्वासूपणाची आणि माझ्याविरुद्ध चालण्याची कबुली देतील,

  8. “ ‘तुम्ही राहत असलेला देश भ्रष्ट करू नका. रक्तपाताने देश भ्रष्ट होतो आणि ज्या देशात रक्तपात होतो त्याच्यासाठी ज्याने रक्तपात केला त्याच्या रक्ताशिवाय प्रायश्चित होऊ शकत नाही.

  9. ज्या देशात तुम्ही राहता व जिथे मी निवास करतो तो तुम्ही अशुद्ध करू नये, कारण मी याहवेह इस्राएली लोकांमध्ये निवास करतो.’ ”

  10. याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना तुमच्यापुढून घालवून दिल्यानंतर स्वतःशी म्हणू नका, “मी नीतिमान आहे, म्हणूनच याहवेहने हा देश वतन म्हणून घेण्यास मला मदत केली.” नाही! तसे मुळीच नाही, तर या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळेच याहवेह त्यांना तुमच्यापुढून घालवून देत आहेत.

  11. आणि त्यावेळी जर तुम्ही व तुमची मुले याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने आज मी तुम्हाला देत आहे त्या त्यांच्या आज्ञा पाळाल,

  12. लवकरच यशुरून स्वस्थ झाला आणि लाथा झाडू लागला; खाऊन पिऊन धष्टपुष्ट व आकर्षक झाला. उन्मत्त होऊन त्याने त्याच्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा तिरस्कार केला, आणि आपल्या तारणदुर्गाचा त्याग केला.

  13. तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहला आरोळी मारली, “आम्ही आमच्या परमेश्वराचा त्याग केला आणि बआलची सेवा करून तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.”

  14. परंतु इस्राएली लोकांनी याहवेहला म्हटले, “आम्ही पाप केले आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण आता आम्हाला सोडवा.”

  15. नंतर त्यांनी त्यांच्याजवळ असलेली परदेशी दैवते दूर टाकली आणि याहवेहची सेवा केली. याहवेहना इस्राएलची दैन्यावस्था सहन झाली नाही.

  16. आणि ते कैदेत असता त्यांच्या हृदयाचा पालट झाला व पश्चात्ताप करीत कैद करून नेलेल्यांच्या देशात आपल्याकडे असे म्हणत विनंती केली, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही विपरीत वागलो आहोत, आम्ही दुष्टतेने वागलो आहोत’;

  17. आणि त्यांना कैद करून नेलेल्या त्यांच्या शत्रूंच्या देशात ते जर त्यांच्या संपूर्ण हृदयाने व जिवाने आपणाकडे वळले, आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, जे शहर आपण निवडले आणि मी आपल्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील,

  18. यरोबोअमने स्वतःशी विचार केला, “राज्य कदाचित दावीदाच्या घराण्याकडे परत जाईल.

  19. जर या लोकांनी यरुशलेमात जाऊन याहवेहच्या मंदिरात यज्ञार्पणे केली व त्यांचा स्वामी यहूदीयाचा राजा रेहोबोअम याच्याप्रीत्यर्थ आपली निष्ठा पुन्हा दाखविली, तर ते मला जिवे मारतील व त्यांचा राजा रेहोबोअम याच्याकडे वळतील.”

  20. आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेतल्यानंतर, राजाने दोन सोन्याची वासरे बनविली. तो लोकांना म्हणाला, “तुम्ही वर यरुशलेमकडे जाणे तुम्हाला अतिशय कठीण आहे, हे इस्राएला, ही पाहा तुमची दैवते, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले.”

  21. एक वासरू त्याने बेथेलमध्ये व दुसरे दानमध्ये प्रतिष्ठापीत केले.

  22. आणि ही बाब पाप अशी झाली; एका वासराची उपासना करण्यासाठी काही लोक बेथेलात येत होते आणि दुसर्‍या वासराची उपासना करण्यासाठी काही दूर दानपर्यंत गेले.

  23. यरोबोअमने उच्च स्थानावर मंदिरे बांधली आणि जरी ते लेवी घराण्यातील नव्हते, प्रत्येक प्रकारच्या लोकांमधून याजक नेमले.

  24. आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, जसा यहूदीयामध्ये पाळला जात असे तसेच त्याने एका सणाची स्थापना केली. आणि वेदीवर यज्ञार्पणे केली. बेथेलमध्ये बनविलेल्या वासरांसाठी अर्पणे त्याने केली. बेथेलमध्ये यरोबोअमने बनविलेल्या पूजास्थानांवर सुद्धा त्याने याजक नेमले.

  25. आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, त्याने स्वतःच निवडलेल्या महिन्यात, त्याने बेथेलमध्ये बांधलेल्या वेदीवर यज्ञार्पणे केली. त्याने इस्राएली लोकांसाठी सण स्थापित करून वरती वेदीवर जाऊन अर्पणे सादर केली.